Advertisement
आध्यत्म

अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग स्वतःहून कसे तयार होते? विज्ञानालाही पडला प्रश्न

३ जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात; बर्फाच्या शिवलिंगामागील धार्मिक श्रद्धा, वैज्ञानिक कारणे आणि 'अमर कथा'चे रहस्य जाणून घ्या.

Advertisment

अमरनाथ गुहेचा इतिहास

अमरनाथ गुहेत दरवर्षी आपोआप बर्फाचे शिवलिंग कसे तयार होते? विज्ञान आणि पुराणात काय सांगितले आहे?

अमरनाथ गुहेचा इतिहास
अमरनाथ गुहेचा इतिहास

अमरनाथ यात्रा म्हटली की डोळ्यांसमोर उभे राहते ते हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत,

Advertisement

हजारो शिवभक्तांचा जयघोष आणि गुहेत नैसर्गिकरित्या तयार होणारे दिव्य बर्फाचे शिवलिंग.

Advertisement

यंदा ३ जुलैपासून यात्रेला सुरुवात होत असून लाखो भाविक बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी सज्ज झाले आहेत.

मात्र, दरवर्षी भाविकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो—हे बर्फाचे शिवलिंग नेमके कसे तयार होते?

 

अमर कथा म्हणजे काय?

 

पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिवाकडून अमरत्वाचे रहस्य जाणून

घेण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाला माहित होते की, जर दुसऱ्या कोणी अमरत्वाची कथा ऐकली,

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5

तर ते देखील मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन पृथ्वीवर अमर होतील. म्हणूनच भगवान

शिवाने देवी पार्वतीला कथा सांगण्यासाठी एका एकांत स्थळाची निवड केली. या स्थळाला

अमरनाथ गुहा म्हटले जात होते. कथा सांगण्यापूर्वी, भगवान शिवाने देवी

पार्वतीला हे लक्षात ठेवण्यास सांगितले की ही कथा गुप्त नाही.

ऐकताना तुमच्यासोबत कोणीही नसावे. मग भगवान शिव माता पार्वतीला गोष्ट सांगू लागले,

ज्यामुळे ती ऐकत ऐकत झोपी गेली. जेव्हा महादेवांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले

की तिथे कबुतरांची एक जोडी बसली आहे, त्यांना राग आला. पण कबुतरांनी माफी मागितली

आणि भोलेनाथांनी त्यांना क्षमा करून जीवनदान दिले. त्यांनी असाही वर दिला की तुम्ही दोघे

कायमचे अमर झाला आहात आणि आता भगवान शिव आणि माता पार्वती

यांचे प्रतीक म्हणून याच ठिकाणी वास्तव्य कराल. आता असे म्हटले जाते

की श्रावण महिन्यात शिवलिंगाच्या आसपास कबुतरांची जोडी दिसते.

 

 

बर्फाचे शिवलिंग कसे तयार होते?

अमरनाथ गुहेच्या छतावरून सतत पाण्याचे थेंब खाली पडतात. गुहेतील अत्यंत थंड वातावरणामुळे

हे थेंब गोठत जातात आणि एकावर एक बर्फाचे थर साचून उभ्या आकाराचा हिमस्तंभ तयार होतो.

यालाच स्वयंभू बर्फाचे शिवलिंग म्हटले जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक

असून शिवलिंगाची उंची काही वर्षी १० ते १८ फूटांपर्यंत पोहोचते.

विज्ञानाचे स्पष्टीकरण काय?

वैज्ञानिकांच्या मते, अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे नैसर्गिक आइस स्टॅलेग्माइट (Ice Stalagmite) आहे.

गुहेतील तापमान, आर्द्रता, छतावरून झिरपणारे पाणी आणि सूक्ष्म हवामान यांचा

परिणाम म्हणून बर्फाचे थर तयार होत जातात. त्यामुळे शिवलिंगाचा आकार हळूहळू वाढतो.

तथापि, अनेक भाविकांसाठी हे केवळ नैसर्गिक घटना नसून भगवान शिवांच्या

दिव्य उपस्थितीचे प्रतीक आहे. म्हणूनच श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही दृष्टीकोनातून

अमरनाथचे बर्फाचे शिवलिंग आजही जगभरातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय आहे.

अमरनाथ यात्रेचे महत्त्व

अमरनाथ यात्रा ही भारतातील सर्वात कठीण आणि पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते.

हिमालयातील कठीण मार्ग पार करून लाखो भाविक बाबा बर्फानींचे दर्शन घेतात.

श्रद्धा, निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी

दरवर्षी देश-विदेशातील भाविक या यात्रेत सहभागी होतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button