Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

सप्टेंबरच्या शेवटी सलग 5 दिवस बँका बंद? जाणून घ्या कारण आणि ग्राहकांनी काय करावे

26 आणि 27 सप्टेंबरच्या सुट्ट्यांनंतर 28, 29 आणि 30 सप्टेंबरला प्रस्तावित संप; बँकिंग कामांसाठी ग्राहकांनी आधीच नियोजन करण्याचे आवाहन

Advertisment

Bank Holiday September 2026

सप्टेंबर 2026 या महिन्याच्या शेवटचे पाच दिवस देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत?

Advertisement

याला कारण आहे बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला प्रस्तावित संप. यामुळे सलग पाच दिवस देशातील बँका बंद राहतील?

Advertisement
Bank Holiday September 2026
Bank Holiday September 2026

जर तुम्हाला बँकेतील कुठले काम असेल, तर लवकर ते आटपून घ्या, कारण

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे आणि याला कारण आहे बँक कर्मचाऱ्यांचा संप.

 

सलग पाच दिवस बँक बंद?

 

बँक कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने तीन दिवसांचा संप पुकारला आहे

आणि 26 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार, तर 27 सप्टेंबर रोजी रविवार आहे. त्यामुळे दोन दिवस बँका बंद राहतील.

हेही वाचा-पावसाळ्यात मिळणाऱ्या अंबाडीच्या पानांची भाकरी कधी खाल्ली आहे? फक्त 3 पदार्थांत बनवा ही चविष्ट रेसिपी

तसेच, 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप आहे.

त्यामुळे सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे

आपले बँकेतले कुठले काम असल्यास ते 25 सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करून घ्या.

 

पगार आणि निवृत्तीवेतन मिळवणाऱ्यांनी काय करावे?

 

जर तुमचा पगार किंवा पेन्शन तुमच्या बँक खात्यात जमा होत असेल,

तर संपापूर्वी तुमच्या खात्याच्या आवश्यकता तपासा. तुम्हाला काही देयके, धनादेश,

कागदपत्रे किंवा बँक शाखेतील कामांची आवश्यकता असल्यास, ती 25 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा-क्रिकेटमध्ये खळबळ! माजी कर्णधारावर ऑनलाइन सट्टेबाजीचा गंभीर आरोप

संपादरम्यान तुम्हाला पैशांची गरज भासल्यास, तुमच्या गरजा भागवण्यासाठी रोख रकमेची व्यवस्था आगाऊ करून ठेवा.

याचा लाभ घ्या. दैनंदिन खर्च आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी UPI, मोबाईल बँकिंग

आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करता येतो. तसेच, पगार किंवा पेन्शन जमा होण्यासंबंधीच्या कोणत्याही महत्त्वाच्या माहितीसाठी

तुमच्या बँकेचे डिजिटल चॅनेल तपासत राहा.

 

एटीएम आणि डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून काम सुरू राहील.

 

एसबीआयने ग्राहकांना बँकेच्या शाखांना भेट देण्याऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

आवश्यक असल्यास एटीएम आणि ऑटोमेटेड डिपॉझिट अँड विथड्रॉवल मशीन्स (ADWMs) वापरता येतील.

काही बँकिंग सेवांसाठी ग्राहक सेवा केंद्रे (CSPs) हा देखील एक पर्याय असू शकतो. पैसे हस्तांतरित करण्यासाठी, बिले

भरण्यासाठी आणि इतर दैनंदिन देयके देण्यासाठी UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर केला जाऊ

शकतो. SBI ग्राहक YONO ॲपद्वारे विविध बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात.

शाखा बंद असतानाही दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्यासाठी हे डिजिटल पर्याय मदत करू शकतात.

 

बँकिंग कामकाज सलग ५ दिवस का प्रभावित होऊ शकते?

 

यावेळी बँकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण हा संप आठवड्याच्या सुट्ट्यांच्या दिवशीच येत आहे.

२६ आणि २७ सप्टेंबर हे शनिवार आणि रविवार आहेत. यानंतर २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी तीन दिवसांच्या बँक संपाचा प्रस्ताव आहे.

 

याचा अर्थ असा की, या पाच दिवसांमध्ये बँकेच्या शाखांमधील सामान्य कामकाज सतत विस्कळीत होऊ शकते.

बँक प्रशासन अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल, परंतु चेक क्लिअरन्स, कागदपत्रे सादर करणे आणि ज्या

कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या थेट मदतीची आवश्यकता असते, त्या इतर कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे.

 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) हा तीन दिवसांचा संप पुकारला आहे.

बँक संघटनांनी भविष्यातील आंदोलन आणि संपाशी संबंधित कार्यक्रमांचेही प्रस्ताव दिले आहेत.

एसबीआयने ग्राहकांना गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध डिजिटल सेवांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

तथापि, कोणत्याही सेवेची उपलब्धता बँक आणि संबंधित प्रणालीवर अवलंबून असू शकते.

 

बँक कर्मचाऱ्यांचा हा संप प्रस्तावित आहे. जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या, तर हा संप मागेही घेतला जाऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button