पेट्रोल ₹5, डिझेल ₹3 स्वस्त! ‘या’ तेल कंपनीचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा
पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. त्यानंतर नायरा एनर्जीने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटर स्वस्त केले. मात्र सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप दरात कोणताही बदल केलेला नाही

Petrol Diesel Price Today
अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढलेला तणाव आणि झालेले युद्ध यामुळे पेट्रोल, डिझेल आणि
एलपीजीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते.
मात्र आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एका खाजगी कंपनीने पेट्रोलचे दर प्रति लिटर ५ रुपयांनी, तर
डिझेलचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी केले आहेत.(Petrol Diesel Price Today) नेमकी
ही कंपनी कोणती आहे आणि दर कमी होण्यामागचे कारण काय आहे, ते जाणून घेऊया.

पश्चिम आशियातील परिस्थितीचा परिणाम
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होत नव्हता.
त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. मात्र आता परिस्थिती काही प्रमाणात
शांत झाल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून त्याचा परिणाम इंधनाच्या दरांवर दिसू लागला आहे.
हेही वाचा-IndiGo चा मोठा धमाका! विमान तिकिटे झाली स्वस्त; ‘IndiGo Lite’ प्लॅनमुळे हवाई प्रवास आता सर्वांसाठी
नायरा एनर्जी या खाजगी तेल कंपनीने पेट्रोलचे दर प्रति लिटर ५ रुपयांनी,
तर डिझेलचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे निर्णय
नायरा एनर्जीने कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
मागील दोन वर्षांचा विचार केला तर, पहिल्यांदाच एखाद्या तेल कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात दर कमी केले आहेत.
हेही वाचा-लिंबूपाण्याने खरंच पोटावरील चरबी कमी होते का? फिटनेस तज्ज्ञांनी सांगितलेलं सत्य
समुद्रमार्ग खुला झाल्यामुळे कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
त्यामुळेच इंधनाचे दर कमी करण्यात आले आहेत. हे नवीन दर १ जुलैपासून लागू झाले आहेत.
सरकारी कंपन्यांनी किमती बदलल्या नाहीत
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल
कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
दिल्लीतील त्यांच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर,
तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर या जुन्याच दराने उपलब्ध आहे.
त्याचबरोबर, देशभरातील नायरा एनर्जीच्या ७,००० हून अधिक पेट्रोल पंपांवर १ जुलैपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
मार्चमध्ये वाढलेले दर आता कमी
मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर नायरा एनर्जीने
पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपये वाढ केली होती.
आता कंपनीने ती दरवाढ मागे घेतली आहे. नायरा एनर्जी गुजरातमधील वाडीनार येथे वार्षिक २० दशलक्ष टन क्षमतेची रिफायनरी चालवते.
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीचे संपूर्ण नेटवर्क पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एका खाजगी तेल कंपनीने दर कमी केले असले, तरी अद्याप सरकारी तेल कंपन्यांनी
कोणताही निर्णय घेतलेला नाही. कच्चे तेल आयात करून पेट्रोल आणि डिझेलची विक्री करत सरकारी कंपन्यांनी मोठा नफा कमावला आहे.
तरीही कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यानंतरही इंधनाचे दर कमी करण्यात आलेले नाहीत.
यावर सरकार किंवा विरोधी पक्षाकडूनही कोणतीही ठोस भूमिका मांडली जात
नसल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे की, नायरा एनर्जीप्रमाणे
सरकारी तेल कंपन्यांनीही लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत.
जेव्हा कच्च्या तेलाचे भाव वाढतात, तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर तात्काळ वाढवले जातात.
मात्र कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यानंतर दर कमी करण्यात होणाऱ्या विलंबावरही चर्चा होणे गरजेचे आहे.







