Advertisement
शेती

वराह पालनासाठी शेतकऱ्यांना ३० लाखांपर्यंत अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू

Advertisment

शेती व्यवसाय दिवसेंदिवस अधिक खर्चिक आणि त्यामध्ये नफा हा कमी होत आहे आणि त्यामुळे शेतकरी मात्र चांगला चिंतेत आहे निसर्गाची अवकृपा आणि शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतीचे आर्थिक गणित सध्या जुळत नाहीये शासन स्तरावर याविषयी अनेक घडामोडी घडतायेत पण त्याचा फारसा फायदा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही .यावर पर्याय एकच आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते आणि तो पर्याय आहे

शेतीसोबत जोडधंदा आणि यामध्ये प्रामुख्याने प्राणी पालन हा एक शेतीपूरक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे शेळी पालन,दुग्ध व्यवसाय,कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या प्राणीपालनांमधून शेतकरी चांगली आर्थिक प्रगती करताना दिसत आहे दिवसेंदिवस कमी होणारे कृषी चे क्षेत्र व वाढती लोकसंख्या यामुळे अन्नधान्याची तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेला प्राण्यांचे मांस हा एक पर्याय ठरू शकतो वर दिलेल्या प्राणी पालनासोबतच सध्या शेतकरी वराह पालनाकडे(डुक्कर पालन)(Pig farming)वळताना दिसत आहेत

Advertisement

हे हि वाचा-UNESCO listed forts of Maharashtra युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील गड किल्ले

Advertisement

पूर्वी .वराह पालना(Pig farming)बद्दल अनेक गैरसमज होते या प्राण्याकडे हिन दृष्टीने समाज पहात होता पण यामधून सुद्धा काही युवकांनी वराह पालन(Pig farming)करण्याचा निर्णय घेतला व आधुनिक पद्धतीनेवराह पालन(Pig farming)काम सुरू झाले.आज देशांमध्ये कित्येक व्यावसायिक आहेत की ज्यांनी वर्षाचा कोट्यावधी रुपयाचा नफा या व्यवसायातून कमवला आहे आता शासन स्तरावर देखील या व्यवसायासाठी भरघोस अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे आणि त्यामुळे या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल आता दिवसेंदिवस वाढत आहे


वराह च्या जाती व त्यांचे उत्पन्न(Breeds of boars and their production)
भारतामध्ये सध्याच्या स्थितीत वराहच्या(Pig farming)अनेक जाती उपलब्ध आहेत की ज्या जातींची वाढ ही झपाट्याने होते व त्यांचेत मासाचे प्रमाण देखील अधिक असते यामध्ये मुख्यतः लार्ज व्हाइट व यो यो शार्क या जाती उपयुक्त ठरतात तसेच लँडरेस यासोबतच स्वदेशी वराह(Pig farming)ची जात म्हणजे घुंगरू या जातीची सर्वप्रथम माहिती ही बंगालमधून मिळाली आहे ही जात भारतातील कोणत्याही प्रदेशांमध्ये राहू शकते साधारणता एका वेळेला सहा ते बारा पिल्ले मादा घुंगरू देत असते जन्मताना पिल्लांची वजन हे साधारणतः एक किलोच्या आसपास असते या मादीमध्ये काही निवडक माद्यांमध्ये पिल्लांचे प्रमाण हे 15 ते 18 च्या दरम्यान देखील मिळालेले आहे

हे हि वाचा-Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण
खाद्य व्यवस्थापन(Food management)
प्राणीपालनामध्ये सर्वात जास्त खर्च होतो तो खाद्यावर आणि परंपरागत वराहपालनामध्ये(Pig farming)खाद्य हे टाकाऊ अन्नपदार्थ हेच वऱहांचे मुख्य खाद्य समजले जायचे त्यामुळे हॉटेल मंगल कार्यालय यामधून उरलेले अन्न हे वराह पालनासाठी(Pig farming)वापरले जायचे आजही ती वापरले जाते पण त्यामुळे उग्र असा वास येतो आणि बऱ्याच संशोधनानंतर वऱ्हाला काही धान्य दिले जाऊ लागले यामध्ये मुख्यतः मका चारा जव गहू तांदूळ बाजरी अशा पद्धतीचे धान्य त्याचे मिश्रण करून वऱ्हांना दिले जाऊ लागले यामुळे त्यांची वजन हे झपाट्याने वाढल्याचे कळाले तसेच प्रत्येक प्राण्यांना प्रोटीन ची आवश्यकता असते याच्या पूर्तीसाठी तिळाची पेंड उरलेले माशांचे तुकडे अशा पद्धतीचे प्रोटीन देखील दिले जातात तसेच खाद्यामध्ये महत्वाचे खनिजे देखील पुरविले जातात अलीकडच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी वराह पालनासाठी एक सुपर फूड देखील तयार केले आहे त्यामुळे पिल्लांची वाढ ही झपाट्याने होत आहे त्यामुळे वराह पालन(Pig farming)हा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे आणि यामध्ये सर्वात मोठी समस्या असलेली उग्र वास यायची ती सुद्धा समस्या संपल्यात जमा आहे

शासकीय अनुदान(Government subsidy)
वराह पालनासाठी(Pig farming)सरकारी अनुदान : शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा

ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच प्राणीपालन हा मोठा आधार ठरत आहे. दुध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन या बरोबरच आता वराह पालन (डुक्कर पालन)(Pig farming)या व्यवसायाला विशेष प्रोत्साहन मिळत आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळतो. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी वराह पालनासाठी(Pig farming)अनुदान योजना सुरू करून ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

 

🐷 राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission – NLM)

केंद्र शासनाने राबविलेल्या राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळतो.

वराह पालनासाठी(Pig farming)५० मादी + ५ नर ते १०० मादी + १० नर युनिट उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध.

या प्रकल्पासाठी ₹१५ लाख ते ₹३० लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून nlm.udyamimitra.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागते.

जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून प्रकल्प तपासून अंतिम मान्यता केंद्र सरकार देते.

👉 या योजनेमुळे वराह पालन व्यवसायात नवे गुंतवणूकदार व शेतकरी उतरले आहेत.

 

💰 प्राणीपालन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF)

वराह पालन(Pig farming)व्यवसाय वाढविण्यासाठी शेड बांधकाम, थंड साठवण, प्रक्रिया यंत्रणा उभारण्यासाठी प्राणीपालन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF) उपयुक्त आहे.

शेतकऱ्यांना कर्जावर ३% व्याज सवलत (Interest Subvention) मिळते.

सरकारकडून कर्ज हमी सुविधा दिली जाते.

मोठ्या प्रमाणावर वराह पालन(Pig farming)फॉर्म उभारण्यासाठी हा निधी उपयुक्त.

 

🌱 राष्ट्रीय गोकुळ मिशन

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्राणीपालनाच्या विविध प्रकल्पांना ५०% पर्यंत अनुदान दिले जाते.

चांगल्या जातींचे वराह उपलब्ध करून देणे.

उत्पादन प्रक्रिया यंत्रणा उभारणे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे.

 

🏛️ राज्यस्तरीय योजना

अनेक राज्य सरकारांनीही वराह पालनासाठी योजना लागू केल्या आहेत.

मध्यप्रदेश : अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांसाठी नर वराह खरेदीवर ७५% अनुदान.

लाभार्थ्याला फक्त २५% खर्च करावा लागतो.

जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज प्रक्रिया केली जाते.

महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार यांसह इतर राज्यांतही वेळोवेळी अशा योजना राबवल्या जातात.

 

📑 अर्ज प्रक्रिया (Application process)

राष्ट्रीय पशुधन अभियानासाठी अर्ज nlm.udyamimitra.in या पोर्टलवर करावा.

राज्यस्तरीय योजनांसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा.

अर्जासोबत प्रकल्प अहवाल, जमीन कागदपत्रे, रहिवासी दाखला, जातीचा दाखला (लागू असल्यास) जोडावा.

बँक कर्ज + सरकारी अनुदान अशा पद्धतीने निधी मंजूर होतो.

 

📈 वराह पालनाचे आर्थिक फायदे (Economic benefits of boar farming)

कमी गुंतवणुकीत जास्त नफा.

मांसाची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मागणी मोठी.

उपउत्पादने (चामडे, केस, शेणखत) विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न.

एका मादीवराहापासून वर्षातून दोन वेळा ८ ते १२ पिल्ले मिळतात.

यामुळे शेतकऱ्यांचा वार्षिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

✅ निष्कर्ष

वराह पालन(Pig farming)हा ग्रामीण युवकांसाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग ठरतो आहे. केंद्र व राज्य सरकारांच्या वराह पालन(Pig farming)अनुदान योजना शेतकऱ्यांना मोठी संधी उपलब्ध करून देत आहेत. रोजगार निर्मिती, उत्पन्नवाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी वराह पालन हा नवा पर्याय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button