शिंदे गटाच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका! आमदारकी धोक्यात? नेमकं प्रकरण काय?
अमोल खताळ यांची SLP सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; आता हायकोर्टात होणार निर्णायक सुनावणी, निवडणूक रद्द होणार का?

आज सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची सुनावणी होणार अशी शक्यता आहे?
तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिंदे गटाच्या आमदाराला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त झटका दिला आहे.
त्यामुळे या आमदाराची आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते?

आज सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/share/p/1V3E4bz71Q/
पण त्या आधीच शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाचे संगमनेर
विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये
विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली होती. ती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या निर्णयामुळे
अमोल खताळ यांची आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात
चुकीची व अपूर्ण माहिती दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता.
अमोल खताळ यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. पण ही याचिका सुरुवातीलाच फेटाळून लावावी,
हेही वाचा-ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका बंद! सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा, कोणत्या दिवशी कुठे बँक राहणार बंद?
अशी विनंती आमदार अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे केली होती. पण उच्च
न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली व रीतसर खटला चालविण्याचा आदेश दिला होता.
हेही वाचा-शाळांजवळ चिप्स, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट आणि जंक फूड विक्रीवर बंदी
खताळ यांनी न्यायालयाला सांगितले की, आपण त्या फर्मचे सध्या भागीदार नसल्याचे सांगितले व ती फर्म विसर्जित
झाल्याचा देखील दावा न्यायालयात करण्यात आला. मात्र, बाळासाहेब
थोरात यांनी न्यायालयात जीएसटी संकेतस्थळावर सदरील फर्म चालू असल्याचे दाखविले.
यामुळे न्यायालयाने आमदार अमोल खताळ यांचा बचाव ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाचा आमदार अमोल खताळ यांना दिलासा नाही?
उच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली व विशेष अनुमती
याचिका (SLP) दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाचा निकाल
कायम ठेवत आमदार अमोल खताळ यांची याचिका फेटाळून लावली.
आता उच्च न्यायालयामध्ये रीतसर खटला आणि सुनावणी चालणार असून,
आता सर्वांचे लक्ष हे उच्च न्यायालयाकडे लागले आहे. या कायदेशीर
लढाईमध्ये आमदार अमोल खताळ यांची आमदारकी रद्द होणार का?
सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब थोरात
यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
थोरात यांचे वकील ॲड. अमित कारंडे यांनी सांगितले की, आमदार अमोल खताळ
यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात व्यावसायिक भागीदारी आणि त्यासंबंधित
माहिती लपविल्याचा आरोप करत त्यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे.
या प्रकरणात अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीला स्थगिती मिळावी
म्हणून सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली होती. मात्र,
सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळल्याने आता प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होणार आहे.
ॲड. कारंडे यांनी सांगितले की, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, रकमेचा मुद्दा मोठा किंवा लहान नसून, निवडणूक प्रतिज्ञापत्रात
माहिती दडवली गेली असल्यास कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे.
“एक रुपयाची माहिती जरी लपवली असेल, तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘नीलकमल’ या भागीदारी संस्थेशी संबंधित व्यावसायिक
माहिती आणि सुमारे ५४ हजार रुपयांच्या प्रोफेशनल टॅक्सची थकबाकी
प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली नव्हती. ही बाब जाणीवपूर्वक लपविल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
आता उच्च न्यायालयातील सुनावणीत ही बाब निर्णायक ठरणार असून, याचिका
मंजूर झाल्यास अमोल खताळ यांची निवड रद्द होऊ शकते, असा दावा थोरात यांच्या
वकिलांनी केला आहे. या प्रकरणाचा निकाल पुढील सहा महिन्यांत लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव अमोल खताळ यांनी केला होता.
आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता.
आता सर्वांचे लक्ष हे न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. न्यायालयात नेमके काय होते,
आमदार अमोल खताळ यांची आमदारकी रद्द होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







