१ ऑक्टोबरपासून एसटीच्या सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी १ ऑक्टोबरपूर्वी कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन; QR कोड पावतीवरही मिळणार सवलतीचा लाभ

MSRTC NCMC Card
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डद्वारेच
मुंबई, दि. २६ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ
घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी येत्या १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड
अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच वितरित करण्याचा निर्णय एसटी
महामंडळाने घेतला असून, राज्यभरातील एसटी आगार आणि बसस्थानकांवर NCMC कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाकडून शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली
जाते. यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतींचा समावेश आहे. या सवलतीच्या
प्रवासाचे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
हेही वाचा-मोठी बातमी! महाराष्ट्रात दुष्काळाची अधिकृत घोषणा; २६५ तालुके दुष्काळग्रस्त
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच मिळणार असल्याने पात्र प्रवाशांनी त्यापूर्वी कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
ज्या प्रवाशांकडे कार्यरत (Active) NCMC कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
हेही वाचा-जेवताना मोबाईल फोन वापरताय? आरोग्यावर होऊ शकतात हे ५ गंभीर परिणाम
NCMC कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर मिळणारी QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे
तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे.
https://x.com/i/status/2103735794930417717
या कालावधीत प्रवाशांनी आपले NCMC कार्ड Active करून त्यामध्ये आवश्यक रक्कम Top-up करणे बंधनकारक राहणार आहे.
NCMC कार्डच्या नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानके, आगार तसेच
आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर NCMC कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी BHIM Appद्वारे Top-up करण्याची सुविधाही उपलब्ध करून
देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM App
च्या माध्यमातून स्कॅन करून कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.
आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे नोंदणी करताना अडचणी येणाऱ्या पात्र
लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या
आधारे NCMC कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.
सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड प्रणाली लागू करण्यात येत
आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.






