Advertisement
सरकारी योजना

उत्तर प्रदेश सरकार 10 रुपयांना खरेदी करणार गोमूत्र! पशुपालकांना होणार मोठा फायदा

उत्तर प्रदेश गोमूत्र खरेदी योजना: 10 रुपये लिटर दराने गोमूत्र खरेदी, पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्न

Advertisment

गोमूत्र खरेदी योजना

गोमूत्र खरेदी योजना
गोमूत्र खरेदी योजना

उत्तर प्रदेश मधील पशुपालकांसाठी सुरू केलेल्या योजनेची संपूर्ण देशभरामध्ये नव्हे तर जगामध्ये देखील चर्चा सुरू

Advertisement

झाली आहे आणि ही योजना आहे उत्तर प्रदेश सरकार प्रायोगिक

Advertisement

तत्त्वावर गोमूत्र खरेदी करणार आहे त्यामुळे पशुपालकांचा मोठा फायदा होणार आहे.

 

गोहत्या बंदी कायदा आणल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने एक अनोखी योजना आणली आहे.

यामध्ये दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे उत्तर प्रदेश सरकार गोमूत्र खरेदी करणार आहे.

याचा फायदा पशुपालकांना, शेतकऱ्यांना निश्चित होणार आहे. सविस्तर जाणून घेऊया ही योजना काय आहे.

 

गोमूत्र खरेदी योजना

 

उत्तर प्रदेशातील गावागावांमधील पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, गोमूत्राला उत्पन्नाचा स्रोत म्हणून विकसित

हेही वाचा-अश्वगंधेचे 10 जबरदस्त फायदे! रोज सेवन केल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या योग्य डोस आणि सावधानता

करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बुलंदशहरमधील एका प्रायोगिक प्रकल्पांतर्गत,

एका एफपीओमार्फत (FPO) गोमूत्राची खरेदी, संकलन आणि प्रक्रिया करण्याची व्यवस्था केली जात आहे.

 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी योगी सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे,

ज्यामध्ये बुलंदशहरमधील एका शेतकरी उत्पादक संघटनेमार्फत प्रायोगिक तत्त्वावर गोमूत्र खरेदी करण्याचा नवीन उपक्रम सुरू

करण्यात आला आहे. या उपक्रमाचा फायदा शेतकऱ्यांना, पशुपालकांना होत आहे.

यामध्ये गोमूत्र दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे खरेदी करण्यात येईल.

बुलंदशहरमध्ये जर ही योजना यशस्वी झाली तर ही योजना संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहे.

यामुळे ग्रामीण कुटुंबातील शेतकऱ्यांना, पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार होईल.

 

गोमूत्र संकलनाचा नवीन उपक्रम सुरू केला

 

बुलंदशहर जिल्ह्यातील स्याना तालुक्यामधील नरसेना गावामध्ये हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा-WhatsApp वापरताना ‘या’ 4 चुका करू नका; नाहीतर क्षणात अकाउंट होऊ शकते बॅन!

या योजनेमध्ये जवळपासची 15 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

स्थानिक पातळीवर गोमूत्र संकलन केंद्रे उभी करण्यात आली आहेत, ज्यामध्ये दररोज 500 लिटर गोमूत्र गोळा केले जाते.

सध्या गोमूत्राला दहा रुपये प्रति लिटर एवढा दर मिळत आहे. जर मागणी वाढली तर हाच दर 20 रुपये प्रति लिटर करण्याचे

मानस आहे. हा प्रयोग डॉक्टर प्रवीण यांच्या नेतृत्वाखाली बुलंदशहरात व आसपासच्या खेड्यांमध्ये करण्यात येत आहे.

 

गावांमध्ये गोमूत्र संकलन कसे केले जाते

 

यासाठी या संघटनेमार्फत गावांमध्ये २०० लिटर क्षमतेच्या टाक्या बसवण्यात आल्या.

गोमूत्र सुरक्षितपणे साठवण्यासाठी गावांमध्ये २०० लिटर क्षमतेच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत.

यामुळे पशुपालकांना आपले मूत्र विकण्यासाठी दूरवर प्रवास करण्याची गरज भासत नाही.

आणि संकलन सुविधा गावातच उपलब्ध आहे.या उपक्रमात ग्रामीण महिलांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

 

गोमूत्र गोळा करण्यास मदत करणाऱ्या महिलांना प्रति लिटर २ रुपये कमिशन दिले जाते.

यामुळे त्यांना गावात राहून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते.

 

या योजनेमध्ये 300 महिला भागधारक

 

या योजनेचा दुसरा फायदा म्हणजे यामधून महिला सक्षमीकरणसुद्धा होणार आहे.

यासाठी 300 महिलांना भागधारक बनविण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांना संकलन प्रणाली

आणि त्यासंबंधित आर्थिक प्रारूप या दोन्हींमध्ये सहभागी होता येते. गोमूत्र संकलनातून त्यांना

कमिशन व अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो व आपल्या गावातच राहून आर्थिक उत्पन्न चांगले करता येते.

 

गोमूत्राचा उपयोग कशासाठी केला जातो

गाईचे मूत्र आणि औषधी वनस्पतींपासून बनवलेले पदार्थ गोळा केलेल्या गोमूत्राचा उपयोग

शेतीसाठी उपयुक्त उत्पादने तयार करण्यासाठी केला जात आहे. कृषी उत्पादने तयार करण्यासाठी त्यात

विविध औषधी वनस्पती मिसळल्या जातात, ज्यावर नंतर समित्यांकडून प्रक्रिया केली जाते.

या उपक्रमाचा उद्देश शेतीमध्ये रासायनिक उत्पादनांना पर्याय म्हणून गोमूत्रावर आधारित

नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आहे. यामुळे एकीकडे गोपाळांच्या संसाधनांचा

अधिक चांगला वापर होईल आणि दुसरीकडे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळेल.

तयार उत्पादनांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठा विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

 

दुधासोबत अतिरिक्त उत्पन्न

दुधासोबतच गोमूत्रानेही उत्पन्न वाढेल. पशुपालकांना फक्त दूध संबंधित उत्पादनावर आर्थिक फायदा होतो,

पण आता अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून गोमूत्राकडे पाहिले जात आहे.

तर ही योजना यशस्वी झाली आणि गोमूत्राची मागणी जर वाढली तर

वीस रुपये प्रति लिटर देखील गोमूत्र खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

सध्या तरी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर आहे. गोहत्या रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे जाणकारांचे

मत आहे. आता हे पाहावे लागेल की ही योजना यशस्वी होते काय.

जर ही योजना यशस्वी झाली आणि उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यामध्ये लागू केली

तर महाराष्ट्र शासनानेदेखील अशा प्रकारची योजना सुरू केल्यास याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button