Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

JEE Advanced शिवाय IIT मध्ये प्रवेश! 14 विद्यार्थ्यांना IIT कानपूरमध्ये मिळाला थेट प्रवेश; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

JEE Advanced परीक्षा न देता IIT कानपूरमध्ये प्रवेश कसा मिळाला? ऑलिम्पियाड-आधारित प्रवेश योजना, पात्रता, निवड प्रक्रिया आणि उपलब्ध अभ्यासक्रमांची संपूर्ण माहिती.

Advertisment

JEE Advanced शिवाय IIT प्रवेश

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते

Advertisement

की त्यांचा IIT मध्ये नंबर लागावा आणि तेथे त्यांनी शिक्षण पूर्ण करावे.

Advertisement

यासाठी JEE Advanced परीक्षा देणे अनिवार्य आहे.

पण त्याबरोबरच एक असा मार्ग आहे की, JEE Advanced परीक्षा न देता सुद्धा IIT मध्ये प्रवेश

मिळविण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाद्वारे 14 विद्यार्थ्यांनी IIT

कानपूरमध्ये प्रवेश मिळविला. तो पर्याय काय आहे, ते पाहूया.

 

 

 

JEE Advanced शिवाय IIT प्रवेश

सध्या विद्यार्थ्यांचा वाढता कल हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याकडे आहे

आणि यामागे अनेक कारणे आहेत. जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या भारतामध्ये आल्या आहेत

आणि त्यामुळे इंजिनिअर्सची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारताबाहेरदेखील भारतीय

इंजिनिअर्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. JEE Advanced परीक्षा देताना प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते की

त्यांना IIT या संस्थेमध्ये प्रवेश मिळावा. मात्र, 14 विद्यार्थ्यांनी JEE Advanced परीक्षा न देता IIT मध्ये प्रवेश मिळविला.

हेही वाचा-40 वर्षे जपलेले चंदनाचे झाड पडले अन् 85 वर्षीय व्यक्ती झाला 28 लाखांचा मालक; कर्नाटकातील अनोखी घटना चर्चेत

IIT (Indian Institute of Technology) म्हणजे काय?

 

IIT (Indian Institute of Technology) या भारतातील अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणासाठीच्या सर्वोच्च

सरकारी संस्था मानल्या जातात. या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत कठीण समजली जाणारी

JEE Advanced परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. IIT मधील शिक्षण, संशोधन, आधुनिक प्रयोगशाळा, जागतिक दर्जाचे

प्राध्यापक आणि उत्कृष्ट प्लेसमेंट यामुळे या संस्थांची जगभरात ओळख आहे.

हेही वाचा-E-20 पेट्रोलबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण!जाणून घ्या 10 महत्त्वाची उत्तरे

सध्या भारतात 23 IIT संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी प्रमुख ठिकाणे म्हणजे

मुंबई, दिल्ली, चेन्नई, कानपूर, खरगपूर, रुरकी, गुवाहाटी, हैदराबाद,

वाराणसी (IIT-BHU), धनबाद, इंदूर, गांधीनगर, भुवनेश्वर, पटना, रोपर, मंडी,

जोधपूर, गोवा, पलक्कड, तिरुपती, जम्मू, धारवाड आणि भिलाई.

https://www.iitk.ac.in/

भारतातील टॉप 4 IIT महाविद्यालये (NIRF रँकिंगनुसार)

1. IIT Madras – चेन्नई, तामिळनाडू

2. IIT Delhi – नवी दिल्ली

3. IIT Bombay – मुंबई, महाराष्ट्र

4. IIT Kanpur – कानपूर, उत्तर प्रदेश

 

IIT मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतासह परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये

उच्च वेतनाच्या नोकरीच्या, तसेच संशोधन आणि उद्योजकतेच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होतात.

त्यामुळे IIT मध्ये प्रवेश मिळवणे हे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते.

 

JEE Advanced परीक्षेशिवाय IIT मध्ये प्रवेश

 

जर IIT मध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर JEE Advanced ही परीक्षा द्यावीच लागते,

हे आपल्याला माहिती आहे. पण JEE Advanced परीक्षा न देता सुद्धा IIT मध्ये प्रवेश मिळविता येतो.

 

काही प्रतिभावान विद्यार्थ्यांना JEE Advanced न देता ऑलिम्पियाड

ॲडमिशन स्कीम अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी IIT कानपूर येथे वेगवेगळ्या विषयांसाठी प्रवेश मिळाला.

 

ऑलिम्पियाड योजनेद्वारे प्रवेश

 

IIT कानपूरने विज्ञान आणि गणितामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड-आधारित प्रवेश योजना सुरू केली आहे.

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये

आपली प्रतिभा सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

यावेळी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यासाठी एकूण 17 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

यांपैकी एक विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिला नाही, तर दोन विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. अखेरीस, 14 विद्यार्थ्यांची निवड झाली.

 

निवडीसाठी घेण्यात आली महत्त्वाची परीक्षा

 

ऑलिम्पियाड प्रवेशासाठी काही जागा राखीव असतात. त्यासाठी 24 जून रोजी IIT कानपूरच्या परिसरात एक परीक्षा घेण्यात

आली. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकूण 45 प्रश्न विचारण्यात आले.

त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तीन विषयांचे प्रत्येकी 15 प्रश्न होते.

याच परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

 

यामध्ये एकूण 14 विद्यार्थी यशस्वी झाले.

 

यशस्वी विद्यार्थ्यांनी कोणत्या कोर्सला प्रवेश घेतला?

 

ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी IIT कानपूरमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला. यामध्ये 6 विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर

सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयासाठी प्रवेश घेतला, तर 2 विद्यार्थ्यांनी बायोलॉजिकल

सायन्स अँड बायो इंजिनिअरिंग या विषयासाठी प्रवेश घेतला. उर्वरित विद्यार्थ्यांनी

मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, केमिस्ट्री, डेटा सायन्स आणि इतर संबंधित विषयांमध्ये प्रवेश घेतला.

 

नेमकी ही परीक्षा आहे तरी काय?

 

IIT कानपूरची ही एक विशेष प्रवेश परीक्षा आहे. मान्यताप्राप्त ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये चांगले गुण मिळविलेल्या

विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे JEE Advanced

परीक्षा न देता सुद्धा IIT कानपूरमधील काही विषयांसाठी थेट प्रवेश मिळविता येतो.

 

या परीक्षेसाठी कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात?

 

ऑलिम्पियाड प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये PCM (Physics, Chemistry, Mathematics)

हे विषय घेतलेले असावेत. विद्यार्थ्यांचे वय JEE Advanced परीक्षेसाठी निर्धारित वयोमर्यादेनुसार असावे.

याव्यतिरिक्त, विद्यार्थ्याने JoSAA समुपदेशनाद्वारे कोणत्याही IIT मध्ये

यापूर्वी कधीही प्रवेश घेतलेला नसावा, तसेच त्याचा पूर्वीचा IIT प्रवेश रद्द झालेला नसावा.

 

 

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IIT कानपूरमध्ये कोणत्या विषयांसाठी प्रवेश मिळतो?

 

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IIT कानपूरमध्ये खालील पाच विषयांसाठी प्रवेश मिळू शकतो.

 

1) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

2) बायोलॉजिकल सायन्स अँड बायो इंजिनिअरिंग

3) केमिस्ट्री

4) इकॉनॉमिक्स

5) मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स

या विषयांसाठी प्रवेश मिळू शकतो.JEE Advanced परीक्षेसोबतच हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो

 

प्रश्न-JEE Advanced परीक्षा न देता IIT मध्ये प्रवेश मिळू शकतो का?

उत्तर-होय. काही निवडक विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड

स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे IIT कानपूरच्या ऑलिम्पियाड-आधारित प्रवेश योजनेतून प्रवेश मिळू शकतो.

 

प्रश्न-IIT कानपूरच्या ऑलिम्पियाड प्रवेश योजनेसाठी कोण पात्र असतात?

उत्तर-बारावीमध्ये Physics, Chemistry आणि Mathematics

(PCM) विषय असलेले, निर्धारित वयोमर्यादा पूर्ण करणारे आणि यापूर्वी JoSAA द्वारे

कोणत्याही IIT मध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

तसेच संबंधित ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये पात्रता मिळवणे आवश्यक असते.

 

प्रश्न-ऑलिम्पियाड प्रवेश योजनेद्वारे IIT कानपूरमध्ये कोणत्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो?

उत्तर-या योजनेद्वारे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बायोलॉजिकल

सायन्स अँड बायो इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि मॅथेमॅटिक्स

अँड स्टॅटिस्टिक्स अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button