पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न गाजणार! कर्जमाफी, खतटंचाई ते बोगस बियाण्यांवर सरकारला घेरणार विरोधक
कर्जमाफीतील जाचक अटी, खतांचा तुटवडा, रखडलेल्या पेरण्या, नमो शेतकरी योजनेतील वाढीची मागणी आणि बोगस बियाण्यांचा मुद्दा अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता

“शेतकरी प्रश्नांवर अधिवेशन वादळी!”
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या, म्हणजे २२ जून रोजी, सुरू होणार आहे.
हे अधिवेशन मुख्यतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे गाजण्याची शक्यता आहे.
कारण सध्या राज्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणीशेतकऱ्यांची आंदोलने देखील पाहायला मिळत आहेत. हे पाहता विरोधी पक्ष
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होणार असल्याची चर्चा सध्या आहे. नेमके पाहूया शेतकऱ्यांसमोर कोणते प्रश्न आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षांना घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करू शकतात.
हे ही वाचा-रोज करा ही 7 योगासने; शरीर राहील निरोगी, अनेक आजारांपासून मिळेल संरक्षण
शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी च्या जाचक अटी बद्दल शेतकरी आक्रमक?
राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली व याच्या
हे ही वाचा-ATM मधून पैसे आले नाहीत पण खाते डेबिट झाले? घाबरू नका; परतावा कसा मिळेल ते जाणून घ्या
प्रत्यक्ष अंमलबजावणीला देखील सुरुवात केली. पण यामधील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची
शक्यता कमी असल्याचे अनेक शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात उपोषण देखील केले होते. या
अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष या जाचक अटी रद्द करण्यासाठी आवाज उठविणार असल्याचे सांगितले जात आहे.
खतांचा तुटवडा?
अमेरिका आणि इराण युद्धामुळे सध्या खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे.
अनेक भागांमध्ये रात्रभर दुकानांच्या बाहेर बसून शेतकरी दुकान उघडल्यानंतर खत खरेदी करण्यासाठी थांबत आहेत.
खतांच्या किमती देखील भरमसाठ वाढल्यामुळे हा खर्च परवडत नसल्याचे बोलले जात आहे.
यावरूनच काँग्रेसचे आमदार अधिवेशनामध्ये या संदर्भात सरकारला प्रश्न विचारण्याच्या तयारीत आहेत.
किमान या वाढलेल्या खतांच्या दरातून काही प्रमाणात का होईना,
पण दिलासा देण्याची मागणी देखील सध्या शेतकरी करत आहेत.
पावसामुळे पेरण्या लांबल्या?
राज्यामध्ये मान्सून सक्रिय न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. काही शेतकऱ्यांनी तर अवकाळी पडलेल्या
पावसावरच पेरण्या केल्या आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
तसेच राज्यामध्ये पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना काही दिलासा मिळावा,
अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
कारण वाढते तापमान आणि पाऊस नसल्यामुळे शेतकरी सध्या हैराण झाला आहे.
सर्वांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी?
महाराष्ट्रामध्ये किसान सन्मान निधीप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये इतके अनुदान मिळते.
या अनुदानामध्ये किमान वार्षिक दोन हजार रुपयांची तरी वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या संदर्भात सुद्धा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा होऊ शकते.
बोगस बियाण्यांवर कडक कारवाईची मागणी?
मागील वर्षी अनेक भागांमध्ये बोगस बियाण्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
ही बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण केलेली मेहनत देखील वाया जाते.
यासाठी आणखी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यावर देखील या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता दाट आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर यंदाचे पावसाळी अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे गाजणार आहे.
पण शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे.
शेतकऱ्यांची सध्याची स्थिती पाहता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी सकारात्मक
चर्चा केल्यास शेतकऱ्यांना निश्चित न्याय मिळू शकतो.







