इराणचा मोठा झटका!हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद
अमेरिकेच्या युद्धबंदीच्या दाव्यांना इराणचा धक्का; हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक इंधन पुरवठा आणि कच्च्या तेलाच्या किमतींबाबत चिंता वाढली.

Iran Closes Hormuz Strait Again
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण यांच्यामधील युद्धबंदीची
घोषणा केली आणि लवकरच हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार असल्याचेही जाहीर केले. मात्र,
अवघ्या काही दिवसांतच इराणने पुन्हा एकदा हॉर्मुझ सामुद्रधुनी
तडकाफडकी बंद करून संपूर्ण जगाला मोठा धक्का दिला आहे.

अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील युद्धबंदी झाल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. तसेच,
त्या संदर्भातील स्वाक्षरीचे काम सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते. असे असतानाही आज
इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. यावरून अमेरिका आणि इराणमधील
संघर्ष अद्यापही थांबलेला नसल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा –FSSAI चा इशारा,गंजलेले किंवा तुटलेले चाकू वापरताय?
वारंवार युद्धबंदीची घोषणा ट्रम्प करतात, यामागचे सत्य काय?
इराण, अमेरिका आणि इस्रायल या देशांमधील संघर्ष मागील काही महिन्यांपासून शिगेला पोहोचला आहे.
मात्र, इराण काही केल्या मागे हटण्यास तयार नाही. अमेरिका आणि इस्रायलने अनेक
हे ही वाचा-E20 इंधनामुळे गाडी खराब झाली तर विमा संरक्षण मिळेल का?
वेळा एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली, पण त्यावर इराणने कधीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही.
उलट, ज्या वेळी अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ले थांबवले, त्यावेळी
इराणने इस्रायलवर हल्ले सुरू केले. त्यामुळे अनेकदा अमेरिकेची नाचक्कीही झाली.
हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्याची घोषणा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती,
पण हॉर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती काही वेगळीच होती. कोणत्याही जहाजाला इराणी
सैनिकांनी सामुद्रधुनी पार करू दिली नाही. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धबंदीची
घोषणा केली आणि लवकरच या युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षऱ्या होतील,
असेही सांगितले. मात्र, या घोषणेलाही इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
उलट आज त्यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करून अमेरिकेला शह दिल्याची चर्चा सुरू आहे.
आता हे पाहावे लागेल की, यानंतर डोनाल्ड ट्रम्प कोणते पाऊल उचलतात.
हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यामागे इराणने काय कारण सांगितले?
अमेरिकेने घोषणा करूनही इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. त्यामुळे
जगभरातील इंधन पुरवठ्याची समस्या पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते.
सामुद्रधुनी बंद करण्यामागील कारण सांगताना इराणने म्हटले की, युद्धबंदी झाल्यानंतरही इस्रायल लेबनॉनवर हल्ले करत
आहे. हे युद्धबंदी कराराचे उल्लंघन असल्याचे इराणने नमूद केले. हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करणे हे पहिले पाऊल असून,
इस्रायलने हल्ले थांबवले नाहीत तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही इराणने स्पष्ट केले.
यामुळे इंधनाची सप्लाय चेन बाधित होऊ शकते आणि कमी झालेले कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा वाढू शकतात. हॉर्मुझ
सामुद्रधुनी बंद केल्यामुळे अनेक देशांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आता या संदर्भात अमेरिका कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




