उडीद लागवड 40% ने घटली! पावसाचा फटका; उडीद डाळ महागण्याची शक्यता
मान्सूनच्या उशिरामुळे देशभरात उडीद लागवड घटली असून उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयात वाढण्याबरोबरच उडीद डाळीच्या किमती वाढू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Urad Dal Price Hike
महागाई वाढलेली असताना आता आणखी तुमचा खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून अपेक्षेइतका
सक्रिय नसल्यामुळे उडीद लागवड 40 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर येत आहे.(Urad Dal Price Hike)

पावसाला झालेल्या उशिरामुळे देशभरात उडीद लागवडीत 40 टक्क्यांची घट झाल्याच्या
बातम्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. त्याचा थेट परिणाम आपल्या जेवणाच्या ताटावरही पडू शकतो.
यामुळे उडीद डाळीचे भाव वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. कमकुवत मान्सून हे
यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. कमी कालावधीत येणारे पीक
असल्यामुळे शेतकरी उडीद लागवडीला पसंती देतात. मात्र, यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने
अनेक शेतकऱ्यांनी उडीद पेरणी केली नाही. त्यामुळे देशभरात उडीद
लागवडीत जवळपास 40 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा-‘ऑपरेशन तुडवा’पण तुडवायचे कोणी?उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर सखोल विश्लेषण
40 टक्के उडीद लागवड कमी?
अनेक राज्यांमध्ये अद्यापही मान्सून अपेक्षेइतका सक्रिय झालेला नाही.
त्याचाच परिणाम म्हणून उडीद लागवडीत 40 टक्क्यांची घट झाल्याच्या बातम्या
प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. केंद्र सरकारने काही राज्यांमध्ये हमीभावाने उडीद खरेदी
हे ही वाच-WhatsApp Username फीचर सुरू! आता फोन नंबर लपवून करा चॅट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि हरियाणा यांचा समावेश आहे.
हमीभावाने उडीद खरेदी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल उडीद लागवडीकडे वाढेल,
असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून उडीद लागवड सातत्याने कमी होत आहे.
शेतकऱ्यांचा कल मका आणि सोयाबीन या पिकांकडे वाढल्यामुळे देशातील
उडीद उत्पादन घटत असल्याचे कृषी विश्लेषकांचे म्हणणे आहे. यंदाही
लागवड कमी झाल्यामुळे देशातील उडीद उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
आयातीत वाढ होण्याची भीती
अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, गेल्या काही वर्षांपासून उडीद डाळीच्या देशांतर्गत उत्पादनात
सातत्याने घट होत आहे. 2021-22 या पीक वर्षात उत्पादन अंदाजे 2.8 दशलक्ष टन होते,
तर 2025-26 मध्ये ते अंदाजे 2.2 दशलक्ष टनांपर्यंत घसरले आहे. उत्पादनातील
या घसरणीचा परिणाम बाजारपेठेवरही होत असून, देशाला गरज भागवण्यासाठी आयात वाढवावी लागत आहे.
आकडेवारीनुसार, भारताने 2022-23 या आर्थिक वर्षात अंदाजे 6.11 लाख टन उडीद आयात केली होती.
ती 2025-26 मध्ये अंदाजे 10.5 लाख टनांपर्यंत वाढली आहे. कृषी वस्तू बाजारातील
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 2026-27 मध्ये उडीदाची आयात 11 ते 12 लाख टनांपर्यंत पोहोचू शकते.
जर मान्सून सामान्य राहिला नाही आणि पेरणीत सुधारणा झाली नाही, तर आयातीवरील अवलंबित्व
आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत उडीद डाळीची उपलब्धता आणि
दर या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो. परिणामी, ग्राहकांना उडीद डाळ अधिक महाग दराने खरेदी करावी लागू शकते.
केंद्र सरकारही देशांतर्गत डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी मूल्य
समर्थन योजनेअंतर्गत (PSS) उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू आणि
गुजरात या राज्यांमध्ये मूग, उडीद आणि भुईमूग हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता या योजनांचा देशांतर्गत डाळींच्या उत्पादनावर किती परिणाम होतो, हे पाहावे लागेल.
जर देशांतर्गत डाळींचे उत्पादन असेच घटत राहिले, तर आयातही वाढेल.
त्यामुळे डाळींचे दर आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
टीप : सदरील माहिती केवळ आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी देण्यात आली आहे.
ही माहिती इंटरनेटवरील विविध माध्यमांमधून संकलित करण्यात आलेली आहे.







