भारत-अमेरिका करारावर फडणवीसांचा खुलासा; अमेरिकन कृषी उत्पादनांबाबत अफवा?
ट्रम्प यांच्या पोस्टनंतर खळबळ; शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही – फडणवीस
भारत अमेरिका करार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका एक्स पोस्टद्वारे भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये एक करार झाला असल्याची घोषणा केली.
यानंतर संपूर्ण देशात अमेरिकन कृषी उत्पादने भारतात येणार व भारतीय शेतकऱ्यांना मोठे नुकसान होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काय सांगितले, ते पाहूया.
https://www.facebook.com/share/v/1CMHHKF4cy/
डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्ट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका एक्स पोस्टद्वारे असे म्हटले की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. तसेच भारतावर अमेरिकेने लावलेला 25% कर कमी करून 18% करण्यात आल्याची
घोषणा त्यांनी केली. याशिवाय भारत अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर कोणताही कर आकारणार नाही, असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले.
या घोषणेनंतर भारत सरकारने याबाबत कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केली नाही. अशा प्रकारचा करार झाला आहे की नाही, याबाबत सरकारने स्पष्टता दिली
नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात रशियाकडून कच्च्या तेलाची आयात आजही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
परळी येथे एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत-अमेरिका कराराबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की अमेरिकन कृषी उत्पादने भारतात आल्यानंतर भारतीय शेती व्यवस्था कोलमडून जाईल, ही निव्वळ अफवा आहे.
हेही वाचा-PM Kisan 22nd Installment Date हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता;शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
हेही वाचा-ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड: ८० वर्षांवरील नागरिकांना घरी बसून मोफत आयुष्मान वय वंदना कार्ड
फडणवीस यांनी स्पष्ट केले की असा कोणताही करार झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट आहे की इतर उत्पादने भारतात येऊ शकतात, पण कृषी उत्पादनांना परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.
ते पुढे म्हणाले की सोयाबीनला मागील काही दिवसांत चांगला भाव मिळत होता, मात्र विरोधकांनी पसरवलेल्या अफवांमुळे सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल 500 ते 700 रुपयांनी घट झाली. यासाठी विरोधक जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विरोधी पक्षाची भूमिका
विरोधी पक्षाने मात्र याबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावे की असा कोणताही करार झाला आहे का, तसेच भविष्यात असा करार केला जाणार नाही याची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.
विरोधकांच्या मते, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात जीएम (Genetically Modified) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे तेथील शेती उत्पादन भारताच्या तुलनेत अधिक आहे. तसेच अमेरिकन
Trump Tariff-भारत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी आपली बाजारपेठ का उघडत नाही? हे खरे कारण आहे
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते. त्यामुळे अमेरिकन कृषी उत्पादने भारतात आल्यास दर कमी होतील आणि भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
यामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, या विषयावर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







