Advertisement
आध्यत्म

BASANT PANCAMI – माता सरस्वती व भगवान विष्णू यांच्या मध्ये युद्ध का झाले होते ?

Advertisment

आज कुंभमेळ्याचे शाही स्नानाचा दिवस आहे त्यामुळे प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी कोट्यावधी भाविक हे प्रयाग्रज कडे जात आहे आज वसंत पंचमी आहे वसंत पंचमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता सरस्वती मध्ये युद्ध का झाले होते ? याच्यामागे कथा काय आहे हे आपण पाहूया

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार वसंत पंचमीला धर्मामध्ये खूप मोठे महत्त्व आहे कारण की ज्ञानाची देवी माता सरस्वतीची पूजन या दिवशी करणे फार फलदायी असते त्यामुळे या दिवसाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे हिंदू धर्मातील मान्यतेनुसार वसंत पंचमीला ऋषिपंचमी देखील म्हटले जाते प्रत्येक वर्षाच्या माग महिन्यांमध्ये शुक्ल पक्षाची पंचमी ही पंचमी वसंत पंचमी म्हणून ओळखली जाते याच याच दिवशी माता सरस्वती आणि भगवान विष्णू यांची युद्ध झाले होते त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे

Advertisement
Goddess Saraswati
माता सरस्वती देवी

वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजन का केले जाते यासाठी एक आख्यायिका आहे एकदा माता सरस्वतीने ब्रह्माजींना प्रश्न विचारले की माता लक्ष्मी, माता पार्वती आणि स्वतः माता सरस्वती या तीन देवींपैकी कोणती देवी ही सगळ्यात श्रेष्ठ आहे प्रश्न मोठा अवघड होता ब्रह्माजींनी पहिले तर उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली पण नंतर उत्तर देताना बर माझे म्हणणे आहे कि या तीन शक्तींची तुलना करायची तर का करायची काही जणांनी त्रिदेव यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा अंत चांगला झाला नाही
या जगतामध्ये तिन्ही शक्तींना फार महत्त्व आहे तसेच माता लक्ष्मी या श्रीहरी यांच्या पत्नी आहेत तर कारण मानवाला जगण्यासाठी साधनांची आवश्यकता असते त्यामुळे माता लक्ष्मीची उपासना केली जाते तसेच मानवाला उन्नती करण्यासाठी ज्ञानाची ही आवश्यकता असते त्यामुळे तुम्ही माझ्या पत्नी आहात आणि तसेच वेळप्रसंगी विनाश करण्यासाठी सुद्धा एक शक्ती पाहिजे ती शक्ती माता पार्वती जवळ आहे ती भगवान शंकराची पत्नी आहे त्यामुळे या तीन देवींमध्ये तुला नाही होऊ शकत नाही म्हणून या ती शक्ती एकमेकींच्या प्रतिस्पर्धी नाहीत पण या उत्तराने माता सरस्वतीची समाधान झाले नाही

Advertisement

हे हि वाचा-KAILAS MANSAROVAR YATRA कैलासा मानसरोवर यात्रेला भारत व चीन या देशांची सहमती

त्यांनी विचारले की तुमच्या जिभेवर आता एक नाव आले पण तुम्ही ते घेतले नाही तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या त्यावर ब्रह्माजींनी सांगितलं की या प्रश्नाचे उत्तर आहे जे मला वाटते ते माता लक्ष्मी हे उत्तर ब्रह्माजीने दिल्यानंतर माता सरस्वती शांत बसल्या आणि त्या कुठे गेल्या कोणालाही माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी सुद्धा शोध घेतला पण माता सरस्वतींचा कुठेच ठाव ठिकाणा लागेना माता सरस्वतीने देवतांचा त्याग केला होता बरेच दिवस गेल्यानंतर सर्व देव हे भूतलावर आले आणि ब्रह्माजींनी तेथे यज्ञ करायचे ठरविले या यज्ञासाठी सप्तऋषी विराजमान झाले अग्नि देवता प्रज्वलित झाल्या भगवान विष्णूजींनी आपला शंख वाजवीला आणि देवाधिदेव महादेवांनी डमरू वाजविले सप्तऋषींनी यज्ञ चालू केला नारद मुनींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली

Lord Vishnu
भगवान विष्णू

माता सरस्वती प्रगट झाली
यज्ञ सुरू होताच माता सरस्वतीने त्यांचे वाद्य विना  वाजवायला सुरुवात केली माता सरस्वती विना या अत्यंत रागात वाजवत होत्या त्यांच्या बोटामधनं रक्त यायला लागलं ही वाद्य वाजवत असताना तिन्ही लोकांमध्ये हाहाकार झाला आणि माता सरीस्वतीच्या विनाची एक तार तुटली ब्रह्माजींनी माता सरस्वती ना थांबविण्याचा प्रयत्न केला पण माता सरस्वती ऐकायच्या मानसिकतेत नव्हत्या
पुढे ब्रह्माजींनी माता सरस्वतींना सांगितले की मी तुम्हाला प्रत्येक जागी शोधलं पण तुम्ही मला मिळाल्या नाहीत म्हणून मी हे आयोजन केले आहे मला माहिती होतं की आज तुम्ही येणार या आणि माझ्यासोबत यज्ञाला बसा त्यावर माता सरस्वती म्हणाल्या की मी येथे यज्ञामध्ये बसण्यासाठी आले नाही तर मला हा यज्ञ होऊ द्यायचा नाही नष्ट करायचा आहे.

Saraswati River
सरस्वती नदी

यामुळे सगळे देवता भयभीत झाले ब्रह्माजी माता सरस्वतीला म्हणाले आपण ब्रम्हांडाच्या भलाईसाठी यज्ञ करत आहोत तुझ्याही मनामध्ये ब्रम्हांडाचे कल्याण व्हावे हीच इच्छा आहे पण क्रोधाचा दुष्परिणाम हा तुझ्या मनावर आहे त्यावर माता सरस्वती म्हणाल्या ब्रह्माजी आपण श्रेष्ठत्व विचारल्या नंतर माझे नाव नाही घेतले आता या यज्ञाची रक्षा कोणीही करू शकणार नाही.
यावर भगवान विष्णूजींनी सांगितलं की या कल्याणकारी यज्ञाला आपण संकटात टाकत आहात मी तुम्हाला त्याची परवानगी देणार नाही हा यज्ञ मी उध्वस्त करू देणार नाही तुम्हाला यज्ञाच्या आधी मला नष्ट करावे लागेल

हे हि वाचा-MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

माता सरस्वती नदीच्या रूपात
भगवान विष्णूचे हे वाक्य ऐकून माता सरस्वती चांगल्याच रागात आल्या इतक्या रागात आल्या की त्यांचे कपडे त्यांची वाहन हंस हे पूर्णपणे काळे पडले त्यानंतर माता सरस्वतीने माया शक्तीला एका विशाल अग्नीमध्ये प्रगट केले परंतु भगवान विष्णूजींनी ती अग्नी शांत केली यानंतर माता सरस्वतीने कपालिका शक्ती प्रगट केली परंतु भगवान विष्णूंनी त्या शक्तीला सुद्धा मात दिली
यानंतर आता सरस्वती चांगल्याच क्रोधीत झाल्या व त्यांनी तो यज्ञ नष्ट करण्यासाठी शेवटीला एका नदीच्या रूपात त्या प्रकट झाल्या व सरस्वती देवी आता एका नदीच्या रूपात होत्या आणि एका महापुराच्या रूपामध्ये त्या यज्ञांच्या जागी सरकू लागल्या त्यावेळी माता लक्ष्मी नी भगवान शंकरांना विचारले की भगवान विष्णू माता सरस्वतीला शांत करतील का भगवान शंकरांनी सांगितले हो ज्या पद्धतीने मी गंगा नदीला शांत केले आहे त्याच पद्धतीने भगवान विष्णू देखील करतील मग भगवान विष्णू हे ज्या मार्गाने सरस्वती नदी जात होती त्या मार्गामध्ये ते अनंत शयन मुद्रेमध्ये तेथे झोपले प्रचंड वेगाने ती जलधारा ही भगवान विष्णूंच्या जवळ यायला सुरुवात झाली अति भयंकर रूपामध्ये ती नदी यज्ञाच्या दिशेने सरकत होती.

Devadi Dev Mahadev
देवादि देव महादेव

मध्ये भगवान विष्णू हे होते शेवटीला त्या नदीचा प्रवाह अति जोरात हा भगवान विष्णू यांच्या जवळ आला पण आल्यानंतर तो प्रवाह त्यांच्यावरून जाण्याचे ऐवजी दोन्ही बाजूने जायला सुरुवात केली व पुढे एक मोठा खड्डा होता आणि याच खड्ड्यामध्ये त्या नदीचे पाणी हे जाऊ लागले आणि आणि त्या खड्ड्यांमधून पाणी थेट हे पाताल लोकांमध्ये जाऊ लागले यानंतर माता सरस्वती ने भगवान विष्णू यांच्यासमोर समर्पण केले त्यामुळेच आपण पाहू शकतो की आजही सरस्वती नदी ही लुप्त होते.

आणि पाताळात लोकात जाते आणि तो दिवस होता वसंत पंचमीचा म्हणून या दिवसाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे याच पंचमीला वसंत पंचमी म्हणून देखील साजरी केली जाते या दिवशी माता सरस्वतीचे पूजन केल्याने फलप्राप्ती होते या दिवशी जरूर माता सरस्वतीची पूजन करावे
तसेच यंदाचे वर्ष हे कुंभमेळ्याचे वर्ष आहे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर महा कुंभमेळा सध्या सुरू आहे शाही स्नानापैकी एक शाही स्नानाची तारीख आजची देखील आहे या सणाला देखील खूप महत्व आहे
आपण जर पाहिले तर या कथेमधून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की त्री देवाप्रमाणे त्री देवी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत

लक्ष द्या -सदरील माहिती हि इंटरनेट च्या माध्यमातून जमा केलेली आहे हि माहिती आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button