मुंबईत दूध शंभरीपार! 1 सप्टेंबरपासून दर 102 रुपये लिटर, सणासुदीत मिठाईही महागणार
साखरेनंतर आता दुधाच्या दरात मोठी वाढ; वाहतूक खर्च आणि चाऱ्याच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम

Mumbai Milk Price Hike
साखरेनंतर दुधाचे देखील भाव कडाडले आहेत. मुंबईमध्ये दूध आता शंभरी पार झाले आहे.
मुंबईमध्ये आता दुधाचे दर 102 रुपये प्रति लिटर तिथपर्यंत पोहोचले आहेत आणि याला कारण आहे
ते वाहतुकीच्या खर्चामध्ये झालेली वाढ आणि वाढलेले चाऱ्याचे भाव. याचा परिणाम दुधाच्या दरावर पाहायला मिळत आहे.

साखरेपाठोपाठच दुधाचे दर देखील वाढले आहेत. मुंबई शहर व परिसरामध्ये दुधाचे दर प्रतिलिटर नऊ रुपयांनी वाढले आहेत व
आता दुधाचे दर हे 102 रुपये प्रतिलिटर एवढे झाले आहेत. नेमके यामागचे काय कारण आहे, याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
मुंबईमध्ये दूध शंभर रुपये पार
बॉम्बे मिल्क प्रोड्यूसर्स असोसिएशन (BMPA) ने दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर नऊ रुपये वाढ केल्याची घोषणा केली
आणि यामुळे मुंबईमध्ये दूध 102 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहे. हे दर 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होतील.
यापूर्वी हे दर 93 रुपये प्रति लिटर एवढे होते. हे वाढलेले दर 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत लागू राहतील.
या वाढलेल्या दरामुळे सामान्य ग्राहक मात्र चांगला चिंतेत पडला आहे. या वाढलेल्या दरामुळे आता मिठाई,
चहा तसेच दुग्धजन्य पदार्थांचे भाव आता गगनाला भिडणार आहेत.
दूध दरवाढीचे कारण
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, डिझेलचे वाढलेले दर, यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे.
तसेच संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे व चाऱ्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
हेही वाचा-1 सप्टेंबर 2026 पासून 7 मोठे बदल नियम! गॅस सिलेंडरपासून कारपर्यंत, थेट खिशावर परिणाम
यामुळे दुग्ध उत्पादनातील खर्च हा वाढला आहे आणि यामुळेच दुधाचे दर देखील वाढले आहेत,
असे असोसिएशनचे म्हणणे आहे. सध्या राज्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे.
पाऊस हा अत्यंत कमी झालेला आहे. यामुळेच चाऱ्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न आणखीनच गंभीर होणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे
आणि यामुळे आणखीन दुधाच्या दरामध्ये वाढ होऊ शकते.
दुधापासून ते मिठाईपर्यंतच्या किरकोळ विक्रीवर परिणाम होईल.
घाऊक दुधाच्या वाढलेल्या दराचा मुंबईतील सर्वसामान्य ग्राहकावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्थानिक दूध विक्रेते, डेअरी आणि घरपोच दूधपुरवठा करणारे पुरवठादार 1 सप्टेंबरपासून ग्राहकांकडून वाढीव दर आकारू शकतात.
हेही वाचा-एका महिन्यात १३ वेळा पेनकिलर घेतल्याने दोन्ही किडन्या खराब?
काही ठिकाणी, किरकोळ किमती घाऊक किमतीपेक्षा किंचित जास्त वाढू शकतात.
याचा परिणाम केवळ दुधापुरता मर्यादित राहणार नाही. दुधाच्या वाढलेल्या किमतींमुळे
दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढू शकतात.
सणासुदीच्या काळात दुधाचा वापर वाढल्यामुळे मिठाईची दुकाने, बेकरी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये दरही
वाढतील. परिणामी, सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई महाग होणार
आधी साखरेचे वाढलेले दर आणि त्यानंतर आता दुधाच्या दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यामुळे याचा थेट परिणाम हा मिठाई बाजारपेठांवर होणार आहे. आता एकामागे एक अनेक सण येणार आहेत.
अशा काळात मिठाईची मागणी, पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे
आणि अशातच वाढलेल्या दुधाच्या दरामुळे यांच्या दरामध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता केंद्र तसेच राज्य सरकार या वाढलेल्या महागाईला कसे कमी करणार, यासाठी कुठल्या उपाययोजना करण्यात येतील,
हे पाहणे महत्त्वाचे ठरेल; कारण वाढलेल्या दरांमुळे सामान्य नागरिक मात्र चांगलाच परेशान झाला आहे.







