Advertisement
BREAKING NEWS

IndiGo चा मोठा धमाका! विमान तिकिटे झाली स्वस्त; ‘IndiGo Lite’ प्लॅनमुळे हवाई प्रवास आता सर्वांसाठी

इंडिगो एअरलाइन्सने 'IndiGo Lite' हा नवीन स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. कमी सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी दरात तिकीट, तर लॉयल्टी पॉइंट्सचाही मिळणार लाभ.

Advertisment

IndiGo Lite Plan 2026

पहिल्यांदा विमानाने प्रवास करू इच्छिणारे आणि विमानाने सतत प्रवास करणारे

या दोघांसाठीही आनंदाची बातमी आहे. विमान तिकिटांच्या दरामध्ये

Advertisement

इंडिगो कंपनीने कपात केली आहे. त्यामुळे हवाई प्रवास आता अधिक स्वस्त झाला आहे.

Advertisement
IndiGo Lite Plan 2026
विमान तिकीट झाले स्वस्त

देशातील अग्रगण्य विमान सेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइन्सने एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे,

ज्यामध्ये तिकिटांचे दर आणखी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य

नागरिकांनाही विमानाने प्रवास करणे अधिक परवडणारे होणार आहे. हा नवीन प्लॅन काय आहे,

त्याचे फायदे व तोटे काय आहेत, तसेच या प्लॅनद्वारे पॉइंट्स कसे कमावता येतील

आणि त्यांचा भविष्यात कसा उपयोग करता येईल, याविषयी आपण जाणून घेऊया.

 

एअरलाइन इंडिगोचा नवीन प्लॅन

 

विमान सेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइन्सने ‘इंडिगो लाइट’ हा नवीन आणि स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

हेही वाचा-लिंबूपाण्याने खरंच पोटावरील चरबी कमी होते का? फिटनेस तज्ज्ञांनी सांगितलेलं सत्य

या प्लॅनअंतर्गत हवाई तिकिटांच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

हा प्लॅन एन्ट्री-लेव्हल भाडे श्रेणीत उपलब्ध असेल.

हेही वाचा-‘ऑपरेशन तुडवा’पण तुडवायचे कोणी?उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर सखोल विश्लेषण

या प्लॅनमध्ये ७ किलो वजनापर्यंतची केबिन बॅग (विमानात सोबत नेता येणारी छोटी बॅग)

नेण्याची सुविधा असेल. मात्र, त्यापेक्षा जास्त वजनाचे सामान असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

 

तसेच, ७ किलोपर्यंतच्या बॅगसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑटो-असाइन्ड सीट दिली जाईल.

 

अतिरिक्त सेवांसाठी द्यावे लागतील पैसे

 

इंडिगो एअरलाइन्सने स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त सेवा घेतल्यास

त्यासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. ही योजना फक्त ‘इंडिगो लाइट’ तिकिटांसाठी लागू असेल.

 

जर इंडिगो लाइट तिकीट बुक केल्यानंतर सामानाचे वजन वाढले,

तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. तसेच फास्ट फॉरवर्डसारख्या प्राधान्य सेवांसाठी, आवडीचे सीट

निवडण्यासाठी किंवा प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर करण्यासाठीही स्वतंत्र शुल्क द्यावे लागेल.

 

तथापि, इंडिगो लाइट तिकीट बुक केले असले तरी प्रवासाच्या एक तास आधी विमानतळावर जाऊन आवश्यक अतिरिक्त

सेवांची नोंदणी करता येईल. या सेवा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठीही लागू असतील.

 

बुकिंगचे नियम, लॉयल्टी पॉइंट्सचा थेट लाभ

 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ‘इंडिगो लाइट’ प्लॅनचा लाभ केवळ एअरलाइनच्या

अधिकृत माध्यमांद्वारेच घेता येईल. म्हणजेच, हे कमी किमतीचे तिकीट बुक

करण्यासाठी तुम्हाला इंडिगोची अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा संपर्क केंद्राचा वापर करावा लागेल.

 

ही सुविधा एकमार्गी, ये-जा (राउंड ट्रिप) आणि बहु-शहरी (मल्टी-सिटी) प्रवासासाठी उपलब्ध आहे.

लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्व प्रवासी या पर्यायाचा लाभ घेऊ शकतात.

 

याशिवाय, या तिकिटावर ‘इंडिगो ब्लूचिप’ लॉयल्टी पॉइंट्सही मिळतील. हे पॉइंट्स भविष्यातील प्रवासासाठी वापरता येतील.

 

बाजारातील बदलत्या गरजांनुसार नियोजन

 

इंडिगोचे मुख्य रणनीती अधिकारी आलोक सिंग यांनी या नवीन उत्पादनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

 

ते म्हणाले की, कंपनी आपल्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देत सातत्याने

नवीन उत्पादने सादर करत आहे. ‘इंडिगो लाइट’ हा पर्याय विशेषतः

कमी सामानासह प्रवास करणाऱ्या आणि अनावश्यक खर्च टाळू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे.

 

या नवीन पर्यायामुळे एअरलाइनच्या पोर्टफोलिओमध्ये आता ‘सेव्हर’, ‘फ्लेक्सी प्लस’,

‘इंडिगो अपफ्रंट’, ‘इंडिगो स्ट्रेच’ आणि ‘स्ट्रेच+’ यांसारख्या विविध पर्यायांची भर पडली आहे.

त्यामुळे प्रत्येक बजेटमधील प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडून प्रवास करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button