मुसळधार पावसात जमिनीतून अचानक आगीच्या ज्वाला! पाण्यातही उकळले बुडबुडे; नेमकं कारण काय?
झारखंडच्या गोमियामध्ये धक्कादायक घटना; पाऊस आणि चिखल असतानाही जमिनीतून आग बाहेर पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीती

जमिनीतून आगीच्या ज्वाला
सध्या पावसाळा चालू आहे. सर्वत्र पाऊस, चिखल आहे. पण अशातच झारखंडमध्ये एका गावात जमिनीतून चक्क आग
बाहेर यायला लागली आणि त्यामुळे त्या गावातील नागरिकांमध्ये चांगली भीती पसरली आहे. नेमके काय कारण
आहे की आग जमिनीतून का बाहेर येत आहे? चिखल असूनदेखील आग का लागली आहे? याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

झारखंडमधील गोमिया येथे पालनी वस्तीजवळ जमिनीखालून आगीच्या ज्वाला
उसळल्याने गावकऱ्यांमध्ये भीती पसरली. ही घटना ओएनजीसीच्या प्लांटजवळ घडली.
या गावाच्या बाजूला ओएनजीसीचा प्लांट आहे. त्यामधूनच गॅसच्या गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जमिनीतून आग बाहेर येऊ लागली?
जमिनीखाली काय दडले आहे? मुसळधार पावसात जमिनीतून ज्वाला
उसळल्या आणि पाण्यातील उकळत्या बुडबुड्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली.
हेही वाचा-लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण न करू शकलेले भारताचे ते 2 पंतप्रधान कोण? कारण जाणून घ्या
बोकारो गॅस गळती – बंद पंचायतीमध्ये जमिनीतून आगीच्या ज्वाला उसळल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुसळधार पावसात एका मोकळ्या मैदानात जमिनीतून बुडबुड्यांसह आगीचा अचानक भडका उडताना पाहून सर्वजण चकित झाले.
धनबाद: धनबाद जिल्ह्याला लागून असलेल्या बोकारोमधील गोमिया ब्लॉकच्या बंद पंचायतीत शुक्रवारी जमिनीखालून
आगीच्या ज्वाला उसळल्याची एक धक्कादायक घटना घडली. पलानी झिरकी हरिजन टोलाजवळील
हेही वाचा-अपघातानंतर रुग्णवाहिका 10 मिनिटांत पोहोचणार; उशीर झाल्यास ₹10 हजार दंड, NHAIचा मोठा नियम!
एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून आग उकळताना दिसली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,
पाऊस पडत असूनही, जवळ साचलेले पाणी उकळत होते आणि त्यातून बुडबुडे येत होते.
जमिनीवर आग का लागली?
स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आलेल्या माहितीनुसार, पावसाच्या पाण्यामध्ये जमिनीवर आग
येत असल्याच्या घटना यामागचे कारण बोकारो जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये भूगर्भामध्ये मोठ्या
प्रमाणामध्ये मिथेन गॅसचे मुबलक साठे आहेत. या जिल्ह्यातील तळगाडिया या ठिकाणी मिथेन वायूचे उत्खनन देखील केले जाते.
भूमिगत मिथेन वायूचे साठे: सीएमएफआरआयमधील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथेन गॅस ऑक्सिजनच्या
संपर्कात आल्याबरोबर आग लागते. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे सतत पाऊस पडत आहे. यामुळेच त्या ठिकाणची
माती सैल झाली आहे आणि यानंतर मिथेन गॅस वर आला आणि ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आल्यामुळे ह्या ज्वाला तयार झाल्या
असण्याची शक्यता आहे. जनतेने घाबरण्याचे कारण नाही, पण त्या आगीजवळ जाऊ नये, असेदेखील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
संपूर्ण व्हिडिओ येथे पहा
घटनेची सविस्तर माहिती
घटनेची माहिती मिळताच, ओएनजीसीचे (तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ) एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि
त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तथापि, जमिनीतून बाहेर पडणाऱ्या वायूचे स्वरूप किंवा त्याचे कारण याबाबत अद्याप
कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. जमिनीतून बाहेर पडणारा वायू हा नैसर्गिक वायू आहे की दुसऱ्या
कोळसा खाणीतील गळती आहे, असा प्रश्न स्थानिक रहिवासी विचारत आहेत. ओएनजीसीच्या तपासणी आणि तांत्रिक
अहवालानंतरच परिस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. अग्निशामक दलालादेखील माहिती देण्यात आली, पण पाऊस
चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अग्निशामक दलाच्या वाहनांना अडचणीचा सामना करावा लागला.
मिथेन गॅसमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तरी स्थानिक नागरिकांना घाबरून जाण्याचे
कारण नाही, असेही सांगण्यात येत आहे. पण या घटनेची चर्चा मात्र सध्या सर्वत्र आहे.







