विधिमंडळात ‘वंदे मातरम्’ची परंपरा कोणी सुरू केली? भाई केशवराव धोंडगे यांच्या ऐतिहासिक मागणीची कहाणी
9 ऑगस्ट 1990 रोजी स्थगन प्रस्तावाद्वारे मांडलेली मागणी सर्वानुमते मंजूर; आजही महाराष्ट्र विधिमंडळात कायम आहे ‘वंदे मातरम्’ची परंपरा

भाई केशवराव धोंडगे
विधिमंडळाच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने व्हावी, ही मागणी सर्वप्रथम भाई केशवराव धोंडगे यांनी केली होती
आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने केली जाते.
मात्र, ही परंपरा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम मागणी कोणी केली होती आणि
ती कशी पूर्ण झाली, याचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

विधिमंडळाच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने व्हावी, अशी मागणी सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई
केशवराव धोंडगे यांनी केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे 1990 मध्ये ही मागणी पूर्ण झाली आणि आजही ती परंपरा कायम आहे.
हे ही वाचा-जांभळाचे भरघोस उत्पादन म्हणजे दुष्काळाचे संकेत?
भाई केशवराव धोंडगे यांचे कार्य
भाई केशवराव धोंडगे हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर परिचित असलेले ज्येष्ठ नेते होते. ते शेतकरी कामगार पक्षाचे
हे ही वाचा-ATM मधून पैसे आले नाहीत पण खाते डेबिट झाले? घाबरू नका; परतावा कसा मिळेल ते जाणून घ्या
संस्थापक सदस्य होते. कंधार विधानसभा मतदारसंघातून ते अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आले, तसेच नांदेड
लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणूनही त्यांनी प्रतिनिधित्व केले.
सुमारे 35 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी
सातत्याने संघर्ष केला. गुराख्यांना पेन्शन मिळावी, लोककलावंतांना मानधन व पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी मोठा
लढा उभारला आणि त्याला यशही मिळवून दिले. आज लोककलावंतांना
मिळणाऱ्या मासिक मानधनाच्या मागे त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा मानला जातो.
याशिवाय लोहा तालुक्यातील लिंबोटी प्रकल्प मंजूर करून घेणे, मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यासाठी प्रयत्न
करणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करणे तसेच शिवाजी एज्युकेशन
सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
‘वंदे मातरम्’साठीचा ऐतिहासिक प्रस्ताव
विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने व्हावी, ही मागणी भाई केशवराव धोंडगे यांनी 9
ऑगस्ट 1990 रोजी, म्हणजेच क्रांतिदिनाच्या दिवशी, स्थगन प्रस्तावाद्वारे मांडली होती.
त्यांनी 34/17 क्रमांकाच्या स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय सभागृहासमोर आणला.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
त्यानंतर हा प्रस्ताव सभागृहात सर्वानुमते मंजूर झाला आणि तेव्हापासून
विधिमंडळाच्या प्रत्येक कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने होण्याची परंपरा सुरू झाली.
मराठवाड्याचा अभिमान
भाई केशवराव धोंडगे हे मराठवाड्याचे सुपुत्र असल्याने त्यांच्या या कार्याचा अभिमान संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्राला आहे.
त्यांनी केलेले कार्य आणि समाजासाठी दिलेले योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. एका व्यक्तीच्या
दूरदृष्टीमुळे राज्याच्या संसदीय परंपरेत झालेला हा ऐतिहासिक बदल आजही स्मरणात आहे.
भाई केशवराव धोंडगे यांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि सप्रेम जय क्रांती!







