शरद पवार गटाच्या 8 खासदारांची PM मोदींशी भेट; दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे यांच्यासह आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली; शेतकरी प्रश्नांसह महाराष्ट्रातील चार महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी

शरद पवार गटाचे 8 खासदार मोदी भेट
राजधानी दिल्लीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे,
कारण की एक अत्यंत महत्त्वाचे विधेयक या अधिवेशनामध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे.
आणि यामुळेच भेटीगाठींनादेखील वेग आला आहे. यामध्येच आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आठ
खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं ते पाहूया.

गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उ बा ठा गट सोडून शिवसेनेमध्ये सामील झालेले
सहा खासदार व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली व वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.
हेही वाचा-शेणापासून गॅस बनवा आणि कमवा लाखो रुपये! गोवर्धन योजनेत सरकार देणार मोठी मदत
तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आठ खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
भेट घेतली व अर्धा तास चर्चा केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. नेमकं या बैठकीत काय घडलं?
खासदार सुप्रिया सुळे व आठ खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
यासंदर्भात कालपासून चर्चा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आठ खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार.
ठरल्याप्रमाणे आज सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इतर खासदार
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे यांनी आठ
खासदारांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांविषयी चर्चा केली.
हेही वाचा-११ कोटींची लॉटरी लागली, पण तिकीट कचऱ्यात फेकलं! ६ टन कचऱ्यातून अखेर सापडलं विजेतं तिकीट
तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, त्याची भरपाई देण्याची मागणी केली. तसेच
शेतीमधील मालाला हमीभाव जास्त देण्याचीदेखील मागणी करण्यात आली.
तसेच शासनाच्या विविध योजनांविषयी देखील चर्चा करण्यात आली, अशी माहिती सध्या समोर येत आहे.
महाराष्ट्रातील चार महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी
याच बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील चार महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी देखील करण्यात आली.
यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी देखील याप्रसंगी करण्यात आली.
या भेटीमुळे चर्चांना उधाण
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण तसेच शरद पवार एनडीएसोबत जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू होत्या
आणि अशाच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याशी झालेली भेट, यामुळे परत एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वीदेखील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू असताना खासदार शरद पवार
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दोन महत्त्वाची विधेयके संसदेमध्ये मांडली जाणार आहेत
आणि एनडीए सरकारची ही विधेयके मंजूर करून घेण्यासाठी पुरेशी खासदारांची संख्या
असावी म्हणून जमवाजमव चालू असल्याची चर्चा आहे आणि तशातच राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी भेट घेतली, यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार, हे कोणत्याही राजकीय विश्लेषकाला सांगणे अवघड जाते.
पण दिल्लीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे एकूण आठ खासदार आहेत.
सध्या एनडीए सरकारला काही खासदारांचा पाठिंबा पाहिजे असल्यामुळे
या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे. आता हे पाहावे लागेल की शरद पवार नेमका काय निर्णय घेतात.







