Advertisement
आध्यत्म

Mahakumbh 2025: 45 दिवसापासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची अखेर सांगता

Advertisment

प्रयागराज(Prayagraj)-मागील 45 दिवसापासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याची(Mahakumbh 2025)अखेर आज सांगता झाली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे या महाकुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025)अनेक नवीन रेकॉर्ड तयार झाले आहेत 144 वर्षानंतर घडून आलेला हा संयोग यामुळे कोट्यावधी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमांमध्ये स्नान केले

उत्तर प्रदेश मधील प्रयागराज(Prayagraj)मध्ये मागील 45 दिवसापासून महाकुंभ मेळावा(Mahakumbh 2025)चालू होता यामध्ये आज पर्यंत 6 5 कोटी पेक्षाही जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान केले हा एक जागतिक रेकॉर्ड झाला आहे

Advertisement
mahakumbha mela 2025
महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस

नागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळ्याची(Mahakumbh 2025)सुरुवात झाली सहा आठवड्यामध्ये 65 कोटी भाविकांनी अमृत स्नान केले मागील दीड महिन्यापासून प्रयागराज(Prayagraj)मधील त्रिवेणी संगमावर दिवसातले 24 तास भक्तांची अखंड ये जा चालू होती आणि दिवसातले 24 तास स्नान देखील चालू होते रात्रीच्या वेळी लक्ष लक्ष दिव्यांनी हा परिसर उजळून निघत असे 144 वर्षानंतर हा संयोग आल्यामुळे या कुंभमेळ्याला(Mahakumbh 2025)विशेष महत्त्व प्राप्त झाले देशातूनच नाही तर विदेशांमधून देखील मोठ्या प्रमाणात भक्त अमृत स्नान करण्यासाठी प्रयागराज(Prayagraj)येत होते

Advertisement

राजकीय व्यक्ती आणि बॉलीवूड स्टार यांनी देखील या अमृत स्नानाचा लाभ घेतला
तसेच या कुंभमेळ्यासाठी(Mahakumbh 2025)भूतान देशाचे राजे राजा युवराज जिग्मे नामग्याल वांगचुक यांनी देखील महाकुंभ मेळाव्याला(Mahakumbh 2025)हजेरी लावली

45 देशाच्या राजदूताने देखील महाकुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025)त्रिवेणी संगमावर स्नान केले नेपाळमधील 60 लाखापेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमांमध्ये स्नान केले

महाकुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025)पाच शाही स्नानाच्या तारखा होत्या यातील मौनी अमावस्येच्या दिवशी भाविकांनी एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला 29 जानेवारी रोजी असलेल्या मौनी अमावस्येच्या दिवशी आठ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमांमध्ये पवित्र स्नान केले जगामध्ये एकाच जागी एवढे लोक यायचे पहिलीच वेळ होती
यानंतर एक फेब्रुवारी रोजी दोन कोटी पेक्षाही अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले
तसेच वसंत पंचमी म्हणजेच 3 फेब्रुवारी 2025 रोजी दोन कोटी साठ लाख लोकांनी प्रयागराज मध्ये स्नान केले
भारतातील प्रत्येक राज्यांमधून प्रयागराज(Prayagraj) ला येण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती आणि उत्तर प्रदेश सरकारने 13000 विशेष बसेस यादरम्यान चालवल्या

CM YOGI AADTYANATH
महाकुंभ मेळावा मधील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये(Mahakumbh 2025)शाही स्नान शब्दाच्या ऐवजी अमृत्स्नान हा शब्दप्रयोग केला गेला
आपण जर गेल्या तीन कुंभमेळ्यांचा(Mahakumbh 2025)मैदानाचा आकार पाहिला तर आपल्या लक्षात येईल की 2025 चा महाकुंभमेळा(Mahakumbh 2025)किती मोठा होता 2001 च्या कुंभमेळ्यामध्ये 1495 एवढे मैदान होते तर 2013 च्या कुंभमेळ्या साठी 1537 हेक्टर एवढे मैदान होते आणि यावर्षीच्या प्रयागराज(Prayagraj) येथील महाकुंभमेळ्यामध्ये(Mahakumbh 2025)4000 हेक्टर एवढे मैदान तयार करण्यात आले होते

महाकुंभ मेळाव्यामध्ये भक्तांच्या राहण्यासाठी 1500000 एवढे तंबू लावण्यात आले होते
महाकुंभमेळ्यात(Mahakumbh 2025)येणाऱ्या साधुसंतांच्या आखाड्याबाबतीत हे तेरा आखाडे आहेत आणि त्यांच्या साधनेच्या पद्धतीनुसार या आखाड्यांना तीन समूहामध्ये विभागले गेले होते उदासीन,वैष्णव आणि शेव अशा तीन विभागांमध्ये विभागण्यात आले होते
नद्या च्यावर पूल तयार करण्यात आले होते आणि हे तात्पुरत्या स्वरूपाचे पूल हे सिलेंडर आणि साखळ्यांनी जोडलेले होते ज्या वेळेला भाविकांची संख्या वाढली तर हे पुल टाकले जायचे आणि संख्या कमी झाल्यानंतर काढून घेतले जायचे

CM YOGI AADITYNATH
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

महाकुंभ मेळावा मधील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness Book of World Records in Mahakumbh Mela)
प्रयागराज(Prayagraj)मधील महा कुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025)66 कोटी लोकांनी स्नान केले हे देखील जगातील सर्वात जास्त गर्दी जमण्याचे ठिकाण म्हणून त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली गेली
जगातील 193 देशांची लोकसंख्या नाही त्यापेक्षा जास्त लोक हे महाकुंभ मेळाव्यासाठी(Mahakumbh 2025) प्रयागराज(Prayagraj)आले होते
प्रयागराज(Prayagraj) मधील महाकुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025) साफसफाई चे विशेष लक्ष दिले गेले होते आणि त्यामध्ये 19000 सफाई कर्मचाऱ्यांनी एकदा झाडू चालवला ही देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदणी केले गेले आहे अशी चर्चा आहे?

कुंभमेळ्याचे प्रकार(Types of Kumbh Mela)
कुंभमेळा का साजरा केला जातो याविषयी आपल्याला माहिती नसल्यास खाली दिलेल्या लिंक मध्ये एक बातमी आहे ती आपण जरूर वाचावी

Mahakumbh mela महा कुंभमेळावाला आज पासून सुरवात

मुख्यतः कुंभमेळ्याचे तीन प्रकार असतात यामध्ये कुंभ अर्ध कुंभ आणि महा कुंभ असे प्रकार असतात ज्या कुंभमेळ्याचे आयोजन दर सहा वर्षांनी केले जाते त्या कुंभमेळ्याला अर्ध कुंभमेळा असे म्हणतात आणि दर बारा वर्षांनी ज्या कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते त्याला कुंभमेळा म्हणतात तसेच 144 वर्षानंतर आयोजित करण्यात येणारा कुंभमेळा हा महा कुंभ मेळावा असतो ज्योतिष शास्त्रानुसार कुंभमेळ्याचे आयोजन बारा वर्षातून एकदा होते याला ज्योतिष शास्त्राचे एक कारण आहे गुरु ग्रह एका राशीमध्ये बारा वर्षे राहतो आणि बारा वर्षानंतर गुरु ग्रह आपली राशी बदलतो ज्या वेळेला गुरु ग्रह आपली राशी बदलतो आणि स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याच वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते

Naga Sdhu
नागा साधू

कुंभमेळा मधील भाविकांची गणना कशी केली जाते?(How are devotees counted at the Kumbh Mela?)
संपूर्ण प्रयागराज शहरांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क सेंट्रल सर्व शी जोडलेले आहे आणि याच्या माध्यमांमधून शहरांमध्ये कॅमेरे बसवलेले आहेत आणि याद्वारे रियल टाईम डेटा हा सर्वर कडे पाठविला जातो जी कॅमेरे बसवले आहेत यासाठी दोन मॉडेल एकत्रित काम करतात या मॉडेलची काम त्रिवेणी संगमावर असलेल्या गर्दीच्या घनतेचा अंदाज घेणे हा असतो तर त्यातली दुसरे मॉडेल हे जमलेल्या भाविकांच्या हालचालींना ट्रॅक करतो तसेच या डेट्यामध्ये फेशियल रीकेग्रेशन द्वारे आणखीन स्पष्ट केले जाते आणि या सर्वांच्या वर एक अल्गोरिदम सिस्टम असते एका वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार हा संपूर्ण डेटा एका डॅशबोर्डवर प्रदर्शित केला जातो यासाठी अचूक गणनेसाठी आणि निरीक्षणासाठी वेगवेगळे पॅरामीटर्स वापरले जातात त्यावरून गर्दीची गणना केली जाते

Mahashivratri 2025-नांदेड जिल्ह्यामधील हे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर महर्षी वाल्मिकी यांनी स्थापन केले आहे

महाकुंभ मेळाव्यामधील सुरक्षा व्यवस्था(Security arrangements at the Mahakumbh Mela)
महाकुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025)सुरुवातीला 40 कोटी भक्त हे त्रिवेणी संगमांमध्ये स्नान करतील असा अंदाज प्रशासनाचा होता पण त्यापेक्षा जास्त भाविकांनी या अमृत स्नान लाभ घेतला या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती यामध्ये महाकुंभ मेळाव्यासाठी(Mahakumbh 2025) 70 हजार सुरक्षा कर्मी तैनात करण्यात आले होते यामध्ये 37 हजार पोलीस आणि 14 हजार पेक्षाही जास्त होमगार्ड आणि सी आर पी एफ चे जवान तैनात होते

वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास या महाकुंभमेळ्याचे(Mahakumbh 2025)आयोजन हे यशस्वी पद्धतीने झाले असे म्हणण्यास हरकत नाही कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या नियोजनाची तारीफ अख्या जगामध्ये सध्या होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखल होऊन देखील दोन-तीन घटना सोडल्या तर कुठेही अप्रिय घटना झाल्याची नोंद नाही 144 वर्षानंतर आलेल्या या योगाचे आणि महाकुंभ मेळाव्याचे(Mahakumbh 2025) आयोजन हे अत्यंत छान पद्धतीने झाल्याची मत महाकुंभमेळाव्या (Mahakumbh 2025)वरून स्नान करून आलेल्या भाविकांनी व्यक्त केले आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत भोजन देखील केली आणि त्यांचा सन्मान देखील केला आता पुढील कुंभमेळावा हा महाराष्ट्रातील नाशिक येथे होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button