Advertisement
Uncategorized

marathwada mukti sangram din काय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच इतिहास?वाचा

Advertisment

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन(Marathwada Liberation Day) म्हणून साजरा केला जातो याच दिवशी जुलमी निजाम राजवटी(Nizam rule)मधून मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राला जोडला गेला होता नेमकं मराठवाडा मुक्ती संग्राम लढा(Marathwada Liberation Day) काय होता व कशा पद्धतीने निजामी राजवटीचा(Nizam rule)शेवट झाला ते आपण पाहूया
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान झाले ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा जवळपास 500 संस्थानांमध्ये आपला देश विखुरलेला होता यापैकी 497 संस्थानांनी भारतामध्ये स्वतःच्या संस्थानांचा विलय करून घेतला होता पण तीन संस्था मात्र भारतामध्ये यायला तयार नव्हत्या यामध्ये जम्मू काश्मीर,जुनागड आणि हैदराबाद या तीन राज घराण्यांनी भारतामध्ये येण्यास नकार दिला जुनागड संस्था नंतर भारतात आले

last nizam Usaman ali Khan
उस्मान अली खान

 

Advertisement

जुलमी रजाकारांचा काळ
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानाला बरोबर घेण्याबाबतीत हालचालींना वेग आला पण निजाम(Nizam)काही केल्या भारतामध्ये सामील व्हायला नकार देत होते त्यांना पाकिस्तान प्रमाणेच स्वतंत्र देश म्हणून मान्यता पाहिजे होती स्वातंत्र्यानंतर त्यांनी लॉर्ड माऊंट बेटेन यांच्याशी संपर्क करून स्वतंत्र देशाबाबतीत इच्छा बोलून दाखवली व लॉर्ड माऊंट बेटांचे म्हणणे होते की शांतीपूर्ण मार्गाने यावर काही तोडगा काढा असं त्यांनी भारत सरकारला सांगितले पण या गोष्टीला त्या वेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा मात्र तीव्र विरोध होता इकडे निजामांनी(Nizam)पोर्तुगाल या देशाशी संपर्क चालू केला कारण पोर्तुगोलांचे राज्य हे गोव्यामध्ये होते

Advertisement
sardar valbh bhai patel
सरदार वल्लभभाई पटेल

निजामांचे(Nizam)म्हणणे असे होते की पोर्तुगालांनी त्यांना मदत करावी व हैदराबाद संस्थान हा स्वतंत्र देश असावा यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले हैदराबाद मध्ये निजामांचा(Nizam)अत्यंत विश्वासू असलेल्या कासिम रजवी याने रजाकरांची स्थापना केली व मराठवाडा प्रांतामध्ये अतोनात हिंसा करायला सुरुवात केली त्याकाळी त्यांच्यासोबत दोन लाख रजाकार होते याच कासिम रजविणे 1946 मध्ये एम आय एम ची स्थापना केली आज आपण त्या पक्षाला ए एम आय एम म्हणून ओळखतो रजाकारांचे अन्याय हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते आणि या विरुद्ध मराठवाड्यामध्ये मोठा संघर्ष होत होता

Razakar Kasim Rajvi
कासिम रजवी

आणि इथूनच मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाची बीजे रवली गेली याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले त्यांच्या मार्गदर्शना खाली या आंदोलनाची सुरुवात झाली तिकडे दिल्लीमध्ये रजाकरांना चोख उत्तर देण्याबाबतीत हालचालींना वेग आला होता दोनदा हैदराबाद संस्थानावर कारवाई करण्याचा प्रयत्न सरदार वल्लभाई पटेल यांनी केला पण राजकीय दबावामुळे ते शक्य झाले नाही पुढे नेहरू हे विदेशात गेले असता व 11 सप्टेंबर 1948 ला बॅरिस्टर जिना हे पाकिस्तान मध्ये मरण पावले पाकिस्तान दुःखात होता ते निजामांना कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नव्हते हे सर्व पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैनिकांनी चारही बाजूने निजाम राजवटीवर हल्ला केला केवळ तीन दिवसांमध्ये हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले

Nizam and Saradra Valbh bhai Patel
निजामाने शरणागती पत्करली ऑपरेशन पोलो मध्ये

हैदराबाद स्टेट फोर्स चे अल इरदोस यांनी आत्मसमर्पण केले व अटक टाळण्यासाठी निजामाने(Nizam) देखील आत्मसमर्पण केले तसेच कासिम रजवि यालाही अटक झाली पुढे नऊ वर्ष तो तुरुंगात होता 1957 ला त्याला सोडण्यात आले व 48 तासात देश सोडण्याचा आदेश देण्यात आला पुढे पाकिस्तानात गेला व तेथेच मरण पावला पण जाताना एम आय एम हा त्याचा पक्ष अब्दुल वाहिद ओवेसी यांना देऊन गेला पुढे त्यांनी याच पक्षाची ए एम आय एम असे नामकरण केले आजही ओवेसी बंधू तो पक्ष चालवतात

Nizam's Hyderabad State Map
निझाम कालीन हैद्राबाद स्टेट नकाशा

मराठवाड्यातील आंदोलने
निजामाने(Nizam)शरणागती पत्करली पण त्याआधी रजाकरांच्या विरुद्ध मराठवाड्यात मोठे आंदोलन सुरू झाले या आंदोलनाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले तर त्यांच्याबरोबर गोविंद भाई श्रॉफ,वाघमारे,बाबासाहेब परांजपे,साहेबराव बारडकर,आनंत भालेराव,नारायण पवार
तसेच दिवंगत भाई केशवराव धोंडगे,अण्णासाहेब गव्हाणे,माधवराव नळगे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले हा लढा पाहूनच सरदार वल्लभभाई पटेल यांनी या जुलमी राजवटीच्या विरुद्ध मिलिटरी ॲक्शन घ्यायचे ठरवले निजाम आणि सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली होती म्हणून त्यांनी आपल्या मेजर जनरल ला बाहेर देशांमध्ये पाठवायला सुरुवात केली व काही शस्त्रास्त्र मिळतात का ते पाहायला सुरुवात केली पण हैदराबाद संस्थानाला देशाच्या दर्जा नसल्यामुळे कुठलीही देश त्यांना शस्त्र देण्याबाबतीत अनुकूल नव्हते रजाकारांच्या अन्यायामुळेच संपूर्ण भारत देश हा निजाम राजवटीच्या(Nizam rule)विरुद्ध गेला सरदार पटेल यांनी दोनदा कारवाई करायचं ठरविले पण

हे हि वाचा

निजामांनी तेव्हाचे गव्हर्नर सी राजगोपालचारी यांच्याशी संपर्क केला व सरदार पटेल यांवर राजकीय दबाव आणला जेव्हा प्रत्यक्षामध्ये भारतीय सैनिकांनी कारवाई सुरू केली तेव्हा निजाम स्टेट कडे 24000 सैनिक तर 2 लाख रजाकार एवढी मोठी फौज त्यांच्याकडे होती तर भारतीय सैनिकांची संख्या ही शेवट 36000 होती तीन दिवस झालेल्या या कारवाईमध्ये 1373 रजाकार मारले गेले तसेच हैदराबाद स्टेट चे 807 सैनिक सुद्धा मारले गेले व 64 भारतीय सैनिकांना वीरमरण आले
या कारवाईला नाव दिले होते ऑपरेशन पोलो यालाही कारण होतं की त्याकाळी जगात सर्वात जास्त 17 पोलो मैदान हे एकट्या निजाम राजवटीमध्ये(Nizam rule)होते
या कारवाईनंतर निजामाने शरणागती पत्करली ऑपरेशन पोलो मध्ये चारी बाजूने हैदराबाद संस्थानावर कारवाई केली गेली सोलापूरच्या दिशेने मेजर जनरल बैगनाथ चौधरी यांनी काम पाहिले तर विजयवाडा च्या बाजूने मेजर जनरल अजित रुद्र यांनी काम पाहिले तर बाकी दोन ठिकाणावरून छोट्या छोट्या तुकड्या या हैदराबाद संस्थानांमध्ये दाखल झाल्या निजाम राजवटीचा शेवट झाल्यानंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादला भेट दिली त्यावेळी स्वतः निजाम विमानतळावर सरदार वल्लभाई पटेल यांच्या स्वागतासाठी उभा राहिला होता
मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनामध्ये(Marathwada Liberation Day) मराठवाड्यातील शेकडो भूमिपुत्र हे शहीद झाले होते पण मागे न हटता मराठवाड्यातील क्रांतिकार्यांनी रजाकारांना चोख उत्तर दिले नांदेड जिल्ह्यातील कहाळा गावामध्ये अनेक क्रांतिकारी शहीद झाले कंधार हे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या केंद्रस्थानि राहिले येथे भाई केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली रजाकारच्या विरुद्ध मोठे आंदोलन उभे करण्यात आले माधवराव नळगे,बळीराम संगेवार यांच्यासारख्या क्रांतिकार्यांनी रजाकरांचा सामना केला

परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाडा केसरी भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला त्यांनी रजाकरांना सळोकी पळव करून सोडले तसेच अण्णासाहेब गव्हाणे हे आमदार होते त्यांनी या अन्यायाच्या विरुद्ध अनेकदा हैदराबाद संस्थानांमध्ये आवाज उठवला
अशा पद्धतीने जुलमी निजाम राजवटीचा शेवट होऊन मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला पुढे भाई केशवराव धोंडगे यांच्या पुढाकारामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामामधील सर्व योद्धांना स्वातंत्रता सेनानी म्हणून गौरविण्यात आले व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने नांदेड येथे विद्यापीठ स्थापन करण्यात आले ज्या सैनिकांनी ज्या क्रांतीकारांनी या मराठवाडा मुक्ती संग्रमामध्ये सहभाग घेतला व निजाम राजवट संपून त्याचा विजय हा भारतामध्ये केला त्या तमाम सैनिकांना मानाचा मुजरा
सरदार वल्लभभाई पटेल यांनी राजकीय दबावाला न जुमानता हैदराबाद संस्थानावर केलेली कारवाही योग्यच होती जर त्यांनी तसे केले नसते तर आज भारताच्या मध्यभागी अजून एक पाकिस्तान अस्तित्वात आला असता आणि हे आपल्या देशाला परवडले नसते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button