Advertisement
Uncategorized

Salman Khan Viral Video: थकलेले डोळे, बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय? चाहत्यांमध्ये चिंता

सोशल मीडियावर सलमान खानचा व्हायरल व्हिडिओ चर्चेत; थकलेला लूक आणि बदललेली शरीरयष्टी पाहून चाहते चिंतेत. मात्र प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली ना

Advertisment

Salman Khan Viral Video: थकलेले डोळे अन् बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय?

सलमान खानला झालं तरी काय, असा प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

Advertisement

सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून,

Advertisement

त्यामध्ये ते नेहमीपेक्षा थोडे थकलेले दिसत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा,

बारीक झालेली शरीरयष्टी आणि कार्यक्रमादरम्यान आलेला खोकला यामुळे चाहत्यांमध्ये

त्यांच्या प्रकृतीबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र,

सलमान खान किंवा त्यांच्या टीमकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://x.com/moronhumor/status/2078672975302164624?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2078672975302164624%7Ctwgr%5E2ee13d915e874e1477701eaee69c20152dea0a92%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fentertainment%2Fentertainment-news%2Fbollywood-news%2Fsalman-khan-viral-video-fans-worried-about-actor-health%2Farticleshow%2F132491958.cms

सुपरस्टार सलमान खान हे वयाच्या साठीनंतरही तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे चाहते चिंतेत पडले आहेत.

अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, ते लवकर बरे राहावेत, अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

Salman Khan Viral Video
Salman Khan Viral Video

सलमान खानला पाहून चाहते चिंतेत

 

शुक्रवारी सलमान खान यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कार्यालयाला भेट दिली.

यावेळी त्यांनी आयटी सर्व्हर रूमचे उद्घाटन केले आणि लाभार्थ्यांना घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या.

हेही वाचा+RBI आणणार प्लास्टिक नोटा? कागदी नोटांच्या जागी पॉलिमर चलनासाठी जागतिक निविदा जारी

याच कार्यक्रमातील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ते नेहमीपेक्षा थोडे थकलेले दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.

मात्र, केवळ व्हिडिओच्या आधारे त्यांच्या आरोग्याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही.

 

‘मातृभूमी’ आणि ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपट चर्चेत

 

लवकरच सलमान खानचा ‘मातृभूमी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर त्यांचा ‘बॅटल ऑफ गलवान’

हा चित्रपट मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारत आणि चीनच्या

हेही वाचा-

सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर या चित्रपटाची कथा आधारित असल्याची माहिती आहे.

 

मात्र, चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाल्यानंतर ‘चीन’ आणि ‘गलवान’ हे

शब्द शीर्षकातून वगळण्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत सोशल मीडियावर

विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

सलमान खानसाठी चाहत्यांची प्रार्थना

व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी सलमान खान यांच्या उत्तम

आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर

त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, ते लवकरच पूर्णपणे

तंदुरुस्त होऊन नव्या चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला यावेत, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

 

महत्त्वाचे: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे सलमान खान

यांच्या आरोग्याबाबत विविध चर्चा होत असल्या, तरी त्यांच्या प्रकृतीबाबत

कोणतीही अधिकृत माहिती किंवा पुष्टी समोर आलेली नाही.संकल्प टुडे या व्हिडिओची पुष्टी करत नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button