पेट्रोल पंपावर मिळतात या 6 मोफत सुविधा; जाणून घ्या ग्राहकांचे कायदेशीर अधिकार
पिण्याचे पाणी, मोफत हवा, स्वच्छ टॉयलेटपासून क्वालिटी टेस्टपर्यंत अनेक सुविधा ग्राहकांसाठी अनिवार्य

Consumer Rights India
आपण पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जातो, पण तुम्हाला माहिती आहे काय अशा सहा सुविधा की ज्या प्रत्येक पेट्रोल पंपावर असायला
हव्यात व त्या मोफत असतात? हा ग्राहकांचा कायदेशीर अधिकार आहे. याविषयी तुम्हाला माहिती आहे काय? चला जाणून घेऊया की नेमक्या त्या सहा सुविधा कोणत्या आहेत.
आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जातो तेव्हा पेट्रोल पंपावर या सहा सुविधा असणे अनिवार्य आहे. याचा फायदा सर्व ग्राहकांना मोफत घेता येतो.
1) पिण्याचे साफ पाणी
प्रत्येक पेट्रोल पंपावर पिण्याचे साफ पाणी ठेवण्याची जबाबदारी ही त्या पेट्रोल पंप मालकाची असते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमानुसार पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांसाठी साफ पिण्याचे पाणी ठेवणे अनिवार्य आहे.
https://www.facebook.com/share/r/1HAXaLtLrQ/
2) पेट्रोल आणि डिझेलची क्वालिटी चेक करणे
आपण टाकत असलेल्या पेट्रोल किंवा डिझेलच्या गुणवत्तेवर आपल्याला संशय असल्यास पेट्रोल-डिझेलची क्वालिटी तपासण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्यानुसार आपण पेट्रोल पंप मालकाकडे अशी विनंती करू शकतो व
त्यांना देखील ती क्वालिटी टेस्ट करून दाखवावी लागते. यालाच फिल्टर पेपर टेस्ट असे म्हणतात. तसेच जर आपल्याला पेट्रोल व डिझेल टाकताना कमी येत आहे
असा संशय असल्यास त्या गोष्टीची तपासणी देखील आपल्याला करता येते. तो सुद्धा ग्राहकांचा अधिकार आहे.
3) मोफत साफ टॉयलेट
बऱ्याच वेळेला आपण लांबच्या पल्ल्याचा प्रवास करत असताना लघवी करण्यासाठी जागेचा शोध घेत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक पेट्रोल पंपावर मोफत साफ टॉयलेट असणे आवश्यक आहे.
विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये महिलांना या समस्येला अधिक तोंड द्यावे लागते. जर एखाद्या पेट्रोल पंपावर साफ टॉयलेट नसेल किंवा तिथे घाण असेल तर तुम्ही याविषयीची तक्रार देखील संबंधित कंपनीकडे करू शकता. कंपनी असे आढळल्यास पेट्रोल पंपावर कारवाई देखील करू शकते.
हेही वाचा-वाढते वजन ठरू शकते धोकादायक! वजन कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स आजच अवलंबा
हेही वाचा-धावत्या ट्रेनमधून मोबाईल पडला? घाबरू नका, ‘या’ सोप्या स्टेप्सने मिळवा परत
4) इमर्जन्सी फोन कॉल
प्रवासादरम्यान जर आपला मोबाईल डिस्चार्ज झाला असेल आणि आपल्याला अतिमहत्त्वाचा किंवा तातडीचा फोन लावायचा असेल तर आपण पेट्रोल पंप मालकाला याविषयी विनंती करू शकतो.

तो आपला अधिकार आहे. पेट्रोल पंप मालकाने देखील आपल्याला तो कॉल करू द्यायला पाहिजे म्हणजे आपली अडचण दूर होईल. आपल्याला अशी गरज पडल्यास पेट्रोल पंप मालकाशी चर्चा करावी.
5) टायरमध्ये भरण्यासाठी मोफत हवा
प्रत्येक पेट्रोल पंपावर टायरमध्ये भरण्यासाठी मोफत हवा असलेला पंप ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण आपल्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरू शकतो. तसेच आपण मोफत हवा देखील चेक करू शकतो. ही सुविधा देखील प्रत्येक पेट्रोल पंपावर मोफत असते.
6) प्रथमोपचार पेटी
प्रवासादरम्यान जर आपल्याला काही शारीरिक अडचण आल्यास आपण पेट्रोल पंप मालकाकडे प्रथमोपचार पेटीची मागणी करू शकतो. ज्यामध्ये आवश्यक असलेल्या काही औषधी देखील ठेवलेल्या असतात.
आपण विनंती करून ही पेटी घेऊन प्रथमोपचार करू शकतो. अशा पद्धतीची पेटी ठेवणे देखील प्रत्येक पेट्रोल पंप मालकाला आवश्यक आहे. तसा नियम देखील आहे.
पेट्रोल पंपावरील हे सहा अधिकार आपल्याला माहिती होते काय? आपल्याला सरकारने दिलेले अधिकार माहिती पाहिजेत. पेट्रोल पंपावर या सहा सुविधा मिळत नसतील तर आपण संबंधित पेट्रोल पंप ज्या कंपनीच्या मालकीचा आहे त्या कंपनीकडे तक्रार करू शकता.
प्रत्येक पेट्रोल पंपावर तक्रार करण्यासाठी त्या पेट्रोल पंप कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर फलकावर लावणे अनिवार्य आहे. तेथून आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. त्यामुळे आपण आपले अधिकार जाणून घेतले पाहिजेत व आपली फसवणूक देखील टाळली पाहिजे.




