Advertisement
Uncategorized

अंबानींच्या अँटिलियाचे वीज बिल तब्बल 70 लाख रुपये? जाणून घ्या एवढा वीज वापर का होतो

अँटिलियामध्ये दर महिन्याला लाखो युनिट वीज वापरली जाते; आलिशान सुविधा आणि मोठ्या आकारामुळे वीज बिलाचा आकडा कोट्यवधींच्या खर्चाच्या पातळीवर पोहोचतो.

Advertisment

अँटिलिया वीज बिल

वाढत्या वीज बिलामुळे सामान्य नागरिक चांगलेच त्रस्त असतात, पण तुम्हाला माहिती आहे काय,

Advertisement

भारतामध्ये घर असं आहे की ज्या घराचे वीज बिल चक्क ,70 लाखांपेक्षा जास्त येते.

Advertisement

नेमकं ते घर कोणतं आहे व एवढे वीज बिल येण्यामागे काय कारणे आहेत, ते जाणून घेऊया.

अँटिलिया वीज बिल
अँटिलिया वीज बिल

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात एक मोहीम चालू आहे.

या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप राज्यातील वीज ग्राहक करत आहेत.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%86_(%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4)#/media/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Ambani_house_mumbai.jpg

मीडिया रिपोर्ट नुसार पण महाराष्ट्रात असे हे घर आहे की ज्या घराचे लाईट बिल हे 70 लाखांपेक्षा जास्त येते आणि हे घर आहे

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे. मुंबईमध्ये असलेल्या अँटिलिया

या घराचे लाईट बिल प्रति माह 70 लाखांपेक्षाही जास्त येते. विभागाच्या नियमांनुसार वेळेवर बिल भरल्यामुळे,

अंबानी कुटुंबाला विभागाकडून 48,355 रुपयांची विशेष सवलतही देण्यात आली.

 

मुकेश अंबानींचे निवासस्थान अँटिलिया

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून मुकेश अंबानी यांचे नाव आपल्या सर्वांना माहिती आहे.

त्यांच्या घराचे नाव अँटिलिया हे घर मुंबईमध्ये स्थित आहे. हे घर 27 मजली आहे.

हेही वाचा-तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका का वाढतोय? न्यूरोसर्जनने सांगितली धक्कादायक कारणे

या घराच्या देखभालीसाठी 600 कर्मचारी काम करतात. अँटिलियाचे बांधकाम २००४ मध्ये सुरू झाले

आणि ते पूर्ण होण्यास अंदाजे सहा वर्षे लागली. ही गगनचुंबी इमारत २०१० मध्ये पूर्ण झाली.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या खाजगी महालासाठी अंदाजे 15,000 कोटी रुपये खर्च आला.

ही वास्तू सुरक्षा आणि मजबुतीच्या बाबतीत उल्लेखनीय आहे. अँटिलियाची रचना आणि

अभियांत्रिकी रिश्टर स्केलवर 8.0 तीव्रतेपर्यंतचे भूकंप सहन करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.

 

अँटिलियामध्ये एका महिन्यात किती वीज वापरली जाते?

अँटिलियामध्ये एका महिन्याला सरासरी 6,38,250 एवढे युनिट वीज वापरली जाते.

हेही वाचा-रेल्वेत कचरा टाकणे महागात पडणार! आता थेट 1,000 रुपयांपर्यंत दंड

ही वीज बेस्ट कंपनीद्वारे दिली जाते. इमारतीमधील प्रत्येक खोली आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे,

त्यामुळे असा अंदाज आहे की केवळ एका खोलीत सरासरी ३०० युनिट्स वीज वापरली जाते.

या आलिशान हवेलीच्या मासिक वीज वापराचा अंदाज यावरून लावता येतो की,

अँटिलियामध्ये एका महिन्यात वापरल्या जाणाऱ्या विजेच्या प्रमाणातून

मुंबईतील अंदाजे 7,000 मध्यमवर्गीय कुटुंबांची मासिक गरज सहज भागवता येईल.

 

ऊर्जेचा वापर एवढा का होतो?

अँटिलियाच्या जास्त वीज बिलांचे मुख्य कारण म्हणजे तिची वास्तुकला आणि तेथील सुविधा. 4,00,000 चौरस फूट

विस्तीर्ण जागेवर पसरलेल्या या 27 मजली इमारतीत 160 वाहनांच्या

क्षमतेची वातानुकूलित पार्किंगची जागा आहे. इतकेच नाही, तर या इमारतीत

नऊ स्वयंचलित हाय-स्पीड लिफ्ट, तीन रूफटॉप हेलिपॅड, एक इनडोअर स्विमिंग पूल,

50 आसनी खाजगी चित्रपटगृह, एक भव्य व्यायामशाळा, एक वैयक्तिक स्पा,

एक रूफटॉप गार्डन आणि एक भव्य मंदिर देखील आहे. संपूर्ण इमारतीमधील

केंद्रीकृत एसी प्रणाली आणि उन्नत पार्किंग प्रणाली हे विजेच्या वापराचे सर्वात मोठे स्रोत आहेत.

 

सहाशे कर्मचाऱ्यांचे वेतन किती आहे

मीडियामध्ये मिळालेल्या एका माहितीनुसार, अँटिलियामध्ये एकूण 600 कर्मचारी काम करतात.

पंचतारांकित व सप्ततारांकित अशा सुविधा या निवासस्थानामध्ये आहेत.

अँटिलियाची देखभाल करण्यासाठी ६०० हून अधिक कर्मचारी अहोरात्र काम करतात.

या कर्मचाऱ्यांमध्ये माळी, शेफ, प्लंबर, अंतर्गत इलेक्ट्रीशियन आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.

अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना दरमहा अंदाजे 2 लाख रुपये पगार दिला जातो.

प्लंबरनासुद्धा दरमहा 1.5 ते 2 लाख रुपये पगार मिळतो. त्यांच्या पगाराव्यतिरिक्त, त्यांना मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय

भत्ते यांसारखे लाभही मिळतात. या पदांवरील भरतीसाठी एक कठोर निवड प्रक्रिया आवश्यक असते.

 

एवढ्या मोठ्या बिलावर डिस्काउंट किती मिळते

 

प्रचंड वीज वापरामुळे मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचे मासिक वीज बिल सुमारे 70 लाख रुपये आले.

हे उच्चदाब वीज कनेक्शन मुंबईत बेस्टद्वारे पुरवले जाते. विभागाच्या नियमांनुसार

वेळेवर बिल भरल्यामुळे, अंबानी कुटुंबाला विभागाकडून 48,354 रुपयांची विशेष सवलतही देण्यात आली.

वीज पुरवठा प्रणालीशी संबंधित अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की, भविष्यात नवीन तंत्रज्ञान

आणि उपकरणांच्या समावेशामुळे अँटिलियाच्या बिलांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

 

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या घरामध्ये होणारा विजेचा वापर,

त्याचे आलेले लाईट बिल हे बघून हे कळते की देशामध्ये आर्थिक विषमता किती मोठ्या प्रमाणात आहे.

आज एवढे लाईट बिल मुकेश अंबानी यांना येते, तर एवढ्या लाईट

बिलामध्ये हजारो कुटुंबे तीन वेळचे जेवण देखील करू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button