लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत मोठा निर्णय
ई-केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींना दिलासा, अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश
मुख्यमंत्री माझी बहिण योजना
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत होती. ती मुदत आता संपली आहे. आता ई-केवायसी बाबतीत मंत्री आदिती ताई तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण तसेच आरोग्य सुधारण्यासाठी या योजनेचा फायदा होईल. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रतिमाह देण्याची घोषणा झाली.
या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेत नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा प्रभाव पाहायला मिळाला व महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश आले.
हेही वाचा-चांदीचे दर का वाढत आहेत? वाढीमागची 5 मोठी कारणे
हेही वाचा-भविष्यात हृदयरोग टाळायचा असेल तर या तपासण्या वेळेवर करा
महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत आल्यास 2100 रुपये महिना करू असे नमूद केले होते. पण सत्ता स्थापनेनंतर 2100 ऐवजी दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येऊ लागले. त्यानंतर एक सर्वेक्षण झाले.
त्यामध्ये लाखो लाडक्या बहिणींची नावे कमी झाली. नंतर लगेचच या योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आणि यामुळे ऑनलाइन सेंटरच्या बाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या.
कधी सर्व्हर डाऊन तर कधी वेबसाईट व्यवस्थित न चालणे, या कारणांमुळे लाखो लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता आली नाही. ही केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती. त्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी महिला संघटनांकडून होऊ लागली. पण आता मात्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे ई-केवायसी पात्र महिलांना दिलासा मिळणार आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/2013625791284920453?s=20
-
मंत्री आदिती ताई तटकरे यांनी केली घोषणा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पात्र महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक होते. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही मुदत देण्यात आली होती. पण अनेक कारणांमुळे ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे.
म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
एक्स पोस्टद्वारे मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच आता या योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ द्यावी ही मागणी सध्या जोर धरत आहे. त्यावर राज्य शासन काय विचार करेल ते पहावे लागेल. याबाबतची घोषणा लवकरच होईल अशी देखील शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला विधानसभा, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुकांमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या चालू आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील महिला आहेत, त्यामुळे या गोष्टीमुळे त्यांना फायदा होईल अशी सध्या चर्चा आहे.







