Advertisement
Uncategorized

अशोकराव चव्हाण मुळे राजसभेचे गणित बिघडणार

Advertisment

अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या राज्यसभेचे
निवडणुकीचे गणित मात्र बिघडण्याची शक्यता आहे
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सध्या निवडणुका चालू आहेत यामध्ये पक्षीय बलाबल
पाहता महायुतीला पाच तर काँग्रेसला एक जागा मिळणार होती पण अशोकराव चव्हाण
यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राज्यसभेचे काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता आहे
कारण अशोकराव चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे जवळपास 15 आमदार
हे भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे
महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत व राज्यसभेच्या सहा जागा आहेत
म्हणजे एका खासदाराला निवडून येण्यासाठी 42 मतांचा कोटा आहे
महा युतीचे पक्षीय बराबल पाहता भाजपा तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा व
शिवसेना एक जागा अशा पद्धतीने पाच जागांची वाटप होऊ शकते पण
भाजपा या तीन जागा सोडून चौथ्या जागेसाठी फिल्डिंग लावत आहे
अशी चर्चा आहे कारण भाजपाचे 105 आमदार आहेत व अपक्ष 21 यांची संख्या
होते 126 आमदार तर भाजपा तीन जागा शंभर टक्के निवडून आणू शकते
तसेच शिवसेना शिंदे गट यांच्याकडे 40 आमदार व दहा अपेक्षा आमदार असे
50 आमदार आहेत त्यामुळे शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो
याशिवाय अजित पवार गट यांच्याकडे 43 आमदार व दोन अपक्ष आमदार
असे 45 आमदार आहेत त्यांचाही एक उमेदवार निवडून येऊ शकतो
ठाकरे गटाकडे 16 आमदार तर शरद पवार गटाकडे 11 आमदार आहेत
असे एकूण 27 आमदार आहेत पण संख्या पाहता या दोघांचाही उमेदवार निवडून येणे शक्य नाही
तर काँग्रेस कडे 45 आमदार आहेत त्यामुळे काँग्रेस मधून एक उमेदवार निवडून येऊ
शकतो पण 15 आमदार हे भाजपाच्या वाटेवर आहेत असे बोलले जात आहे .
असे झाल्यास काँग्रेसकडे फक्त 30 आमदार राहतील
त्यामुळे काँग्रेसला शरद पवार गट व ठाकरे गट यांच्या 16 आमदारांवर अवलंबून राहावे
लागेल पण भाजप आणि चौथा उमेदवार दिला तर मात्र परत एकदा काटे की टक्कर व
घोडेबाजारीला ऊत येऊ शकतो अशी शक्यता फेटाळता येत नाही काहीही असो
पण अशोकराव चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस मात्र प्रचंड चिंतेत आली आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button