सावधान खोट्या वेबसाईट द्वारे फास्ट टॅग मध्ये फसवणूक
NHAI कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

फास्ट टॅग मध्ये फसवणूक
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI यांनी फास्टटॅगचा वार्षिक पास काढताना काही हॅकर्सनी खोट्या वेबसाईट तयार करून वार्षिक फास्टटॅग विकत असल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी याबाबत खुलासा करत ग्राहकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांची एक योजना आहे, ज्यामध्ये आपण वर्षभर NHAI
च्या सर्व हायवेवरून प्रवास करू शकतो. मात्र, हा फास्टटॅग ऑनलाइन काढण्यासाठी गेल्यानंतर काही हॅकर्सनी याच पद्धतीच्या खोट्या वेबसाईट तयार केल्या आहेत. या वेबसाईटवर तुम्ही गाडीची माहिती तसेच बँकेची माहिती भरल्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे हॅकर्स काढून घेतात.
त्यामुळे NHAI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि अधिकृत वेबसाईटवरूनच फास्टटॅग खरेदी करण्याचे आवाहन NHAI ने केले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होणार नाही.
https://x.com/NHAI_Official?s=09
वार्षिक फास्टटॅगचे फायदे काय आहेत?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांसाठी अत्यंत दिलासा देणारी योजना जाहीर केली होती. यानुसार पूर्वी NHAI च्या सर्व हायवेवर ठराविक किलोमीटरनंतर टोल नाका असायचा आणि त्यावर फास्टटॅगद्वारे पेमेंट करणे अनिवार्य होते. मात्र, प्रत्येक टोल नाक्यावर वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या
हेही वाचा-या अगरबत्तीवर येणार बंदी?
यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नवीन योजना आणली. या योजनेनुसार ३००० रुपयांमध्ये ग्राहकांना एक वार्षिक फास्टटॅग खरेदी करता येत होता आणि त्यानंतर वर्षभर २०० टोल नाक्यांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नव्हते. या योजनेचा जीप, व्हॅन आणि कार वाहनधारकांना मोठा फायदा होत होता.
हेही वाचा-लोक झोपेत का बोलतात? डॉक्टरांचे म्हणणे काय ?
ग्राहकांनी या फास्टटॅगला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आणि ऑनलाइन पद्धतीने खरेदी सुरू केली. याचाच फायदा घेत काही हॅकर्सनी खोट्या वेबसाईटद्वारे ग्राहकांची फसवणूक सुरू केली.
फास्टटॅगमध्ये फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी स्पष्ट केले आहे की ग्राहकांनी आपला वार्षिक फास्टटॅग फक्त NHAI च्या अधिकृत वेबसाईटवरूनच खरेदी करावा. इतर कोणत्याही वेबसाईटवरून फास्टटॅग खरेदी करू नये, असे NHAI ने सांगितले आहे. NHAI ने स्पष्ट केले आहे की त्यांची “राजमार्ग यात्रा” या अधिकृत वेबसाईटवरूनच वार्षिक फास्टटॅग खरेदी करता येईल.
NHAI चे ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
फास्टटॅगचा वार्षिक पास फक्त NHAI च्या अधिकृत राजमार्ग यात्रा वेबसाईटवरूनच खरेदी करा.
कोणत्याही फसवणूक करणाऱ्या वेबसाईटवरून फास्टटॅग खरेदी करू नका.
अशा खोट्या वेबसाईटपासून सावध रहा.
तसेच, NHAI ने फास्टटॅग नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानुसार १ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व नवीन कार, जीप आणि व्हॅनसाठी KYV (Know Your Vehicle) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागील उद्देश ग्राहकांना योग्य सेवा देणे तसेच फास्टटॅग अॅक्टिव्हेशनसाठी ग्राहकांना होणारी अडचण कमी करणे हा आहे.
NHAI ने प्रसिद्ध केलेल्या माहितीद्वारे ग्राहकांना सावध केले आहे, जेणेकरून कोणतीही फसवणूक होऊ नये. ग्राहकांनी देखील ऑनलाइन व्यवहार करताना अधिकृत वेबसाईटवरूनच वार्षिक फास्टटॅग खरेदी करावा आणि प्रत्येक ऑनलाइन व्यवहार समजून-उमजून करावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.







