ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका बंद! सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा, कोणत्या दिवशी कुठे बँक राहणार बंद?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार ऑगस्ट 2026 मध्ये 14 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांचे वेळापत्रक आणि डिजिटल व्यवहार सुरू राहतील का.

Bank Holidays August 2026
ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल 14 दिवस बँकांना सुट्टी आहे.(Bank Holidays August 2026) त्यामुळे
आपल्याला आपली बँकेतील कामे करण्यासाठी फक्त 16 दिवस असतील.
नेमक्या या सुट्ट्या कधी आहेत व कोठे आहेत, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरप्रमाणे ऑगस्ट 2026 मध्ये तब्बल 14 दिवस
https://m.rbi.org.in/scripts/holidaymatrixdisplay.aspx
बँका बंद राहणार आहेत.(Bank Holidays August 2026)
यामध्ये दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे.
नेमकी या सुट्ट्यांमागची कारणे काय आहेत, या सुट्ट्या कधी आहेत,
सुट्ट्यांच्या दरम्यान ऑनलाइन व डिजिटल व्यवहार करता येतील का, तसेच
सुट्टीच्या तारखा कोणत्या आहेत, याविषयी सविस्तर माहिती खाली देत आहोत.
कोणत्या दिवशी बँका बंद राहणार?
दिनांक 4 ऑगस्ट – या दिवशी केर पूजेसाठी अगरतला येथे सर्व बँका बंद राहतील.
हेही वाचा-शाळांजवळ चिप्स, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट आणि जंक फूड विक्रीवर बंदी
8 ऑगस्ट – या दिवशी टेंडोंग ल्हो रम फात निमित्त गंगटोक येथे बँकांना सुट्टी असेल.
13 ऑगस्ट – या दिवशी पॅट्रियट्स डे असल्यामुळे इम्फालमधील सर्व बँका बंद राहतील.
15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन तसेच पतेती (पारसी नववर्ष) असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद राहतील.
19 ऑगस्ट – महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादुर यांच्या जयंतीनिमित्त अगरतला येथे बँकांना सुट्टी असेल.
हेही वाचा-तीन बहिणी एकाच तरुणाशी लग्न! सोशल मीडियावरील व्हायरल विवाहामागचे सत्य काय?
25 ऑगस्ट – या दिवशी कोची, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथे मिलाद-उन-नबी,
पहिला ओणम आणि मिलाद-उन-शरीफ निमित्त बँका बंद राहतील.
26 ऑगस्ट – या दिवशी ईद-ए-मिलाद, बरावफात आणि थिरुवोणम पर्व असल्यामुळे बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई,
देहरादून, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई,
नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम येथे बँका बंद राहतील.
28 ऑगस्ट – रक्षाबंधन, पांग-ल्हाबसोल, श्री नारायण गुरु जयंती आणि अय्यंकाळी
जयंती यांसारख्या प्रादेशिक सणांमुळे अहमदाबाद, भोपाळ, देहरादून,
गंगटोक, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम येथे बँका बंद राहतील.
वीकेंड हॉलिडे
याव्यतिरिक्त, नियमांनुसार सर्व बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देखील बंद राहतील.
या सुट्ट्या 8 ऑगस्ट (दुसरा शनिवार) आणि 22 ऑगस्ट (चौथा शनिवार) आहेत.
तसेच रविवारच्या सुट्ट्या 2, 9, 16, 23 आणि 30 ऑगस्ट रोजी असतील.
ग्राहकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी सुट्ट्यांची यादी लक्षात घेऊन आपल्या बँक व्यवहारांचे नियोजन करावे.
डिजिटल व्यवहार, एटीएम चालू राहणार
तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे सुट्ट्यांच्या कालावधीत
ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, यूपीआय पेमेंट तसेच एटीएम आदी डिजिटल व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील.
त्यामुळे ऑगस्ट महिन्यामधील आपले बँकेतील काम वेळेतच आटपून घ्या.







