Advertisement
खेळ

भारत-बांगलादेश तणावाचा आयपीएलवर परिणाम; बांगलादेशी खेळाडूंवर बंदी

केकेआरमधून मुस्तफीजुर रहेमान बाहेर

Advertisment

बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल बंदी–भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे बांगलादेशमधील क्रिकेट खेळाडूंना आयपीएलमधून काढण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल बंदी
बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल बंदी

केकेआरला मुस्तफीजुर रहेमानला काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर जो अन्याय होत आहे, तिथे निष्पाप हिंदूंना मारण्यात येत आहे. तसेच बांगलादेशमध्ये चालू असलेला राजकीय तणाव व बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारताने दिलेला आश्रय यामुळे बांगलादेश आणि

Advertisement

 

Advertisement
बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल बंदी
बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल बंदी

भारत या दोन देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यामध्येच आज बीसीसीआयने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये घेऊ नका असे आदेश दिले आहेत.

https://www.facebook.com/share/v/1AXNLRfYPy/

याचमुळे शाहरुख खान यांच्या मालकीचा असलेला केकेआर संघाला त्यांनी आपल्या टीममध्ये घेतलेल्या बांगलादेशी खेळाडू गोलंदाज मुस्तफीजुर रहेमानला काढून टाकण्याचे आदेश बीसीसीआयने केकेआर टीमला दिले आहेत.

 

त्या जागी दुसरा खेळाडू घेण्याचाही सल्ला देण्यात आलेला आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये ताणले गेलेले संबंध याचे सावट आयपीएलवर सुद्धा दिसत आहे.

हे ही वाचा-या अगरबत्तीवर येणार बंदी?

आधीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये राजकीय संबंध ताणले गेले आहेत, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट टीममधील एकही खेळाडू हा आयपीएलमध्ये खेळत नाही. तसेच आता बांगलादेशी खेळाडूंनासुद्धा आयपीएलमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-Why do people talk in their sleep? What do doctors say?

भारतामध्ये सध्या आयपीएलमुळे अनेक अष्टपैलू खेळाडू समोर येत आहेत, मग बांगलादेशी खेळाडूंची गरज काय, अशीही मागणी होत होती. त्या अनुषंगाने आज बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

आता पाहावे लागेल की केकेआर टीम कोणता निर्णय घेते? गतवर्षीच्या आयपीएलमध्ये सामने सुरू असताना पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देखील आयपीएलचे सामने काही दिवसांसाठी थांबविण्यात आले होते. यादरम्यान बीसीसीआयने “सामन्यांपेक्षा देश पहिले” असे म्हणत हा निर्णय घेतला होता.

 

बीसीसीआयवर केंद्र सरकारचा दबाव?

बीसीसीआयवर केंद्र सरकारचा दबाव असल्याच्या चर्चाही सध्या सुरू आहेत, कारण भारताने बांगलादेशमध्ये चालू असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे आधीच बांगलादेशबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे.

 

आणि आता बीसीसीआयने देखील बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश देऊ नका असा आदेश काढला आहे. देशातील तमाम क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

टी-20 विश्वचषकामध्ये काय होणार?

लवकरच टी-20 विश्वचषक होणार आहे आणि या दरम्यान भारत आणि बांगलादेश यांचे सामने देखील होतील. मग त्या सामन्यात कोणता निर्णय काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

 

 

हा निर्णय बीसीसीआयने घेतला, शाहरुख खानने नाही?

बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता जेव्हापासून आली आहे, तेव्हापासूनच बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश देऊ नका अशी मागणी होत होती. केकेआर टीमचे मालक प्रसिद्ध चित्रपट

 

 

अभिनेते शाहरुख खान यांनीही त्यांना काढून टाकावे अशी मागणी होत होती, पण त्यांनी याकडे स्पष्ट दुर्लक्ष केल्याचा आरोप अनेक क्रिकेटप्रेमी करत आहेत.

 

शेवटी बीसीसीआयलाच हा निर्णय घ्यावा लागला आणि आता मुस्तफीजुर रहेमानला टीममधून काढून दुसरा एखादा खेळाडू घ्यावा लागणार आहे. मुस्तफीजुर रहेमानला केकेआरने नऊ कोटी रुपयांना विकत घेतले होते, ते पैसे त्याला आता मिळणार नाहीत.

 

 

एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार केला तर बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय सर्व क्रिकेटप्रेमींना आवडलेला आहे, कारण बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू अल्पसंख्यांकांवर अन्याय हा कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश भारत देशाने दिला असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button