नरेंद्र मोदी यांच्या नावे नवा जागतिक विक्रम! २४ तासांत कोट्यवधी व्ह्यूज
इन्स्टाग्रामवरील दोन व्हिडिओंना २४ तासांत कोट्यवधी व्ह्यूज मिळाल्याची चर्चा; सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची पुन्हा चर्चा रंगली.

Narendra Modi Gen Z Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे.
त्यांच्या एका व्हिडिओला सर्वात जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत त्यांनी IShowSpeed लादेखील मागे पाडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंतर-मंतरवर चालू असलेल्या उपोषणा संदर्भामध्ये
दोन व्हिडिओ एक गुरुवारी आणि एक शुक्रवारी असे दोन व्हिडिओ टाकले आणि
त्यांनी जगभरामध्ये सगळ्यात जास्त व्ह्यूज येण्याचे रेकॉर्ड प्रस्थापित केले
त्यामुळे परत एकदा नरेंद्र मोदी यांची चर्चा सुरू झाली आहे या मिळालेल्या व्ह्यूज वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता
बिलकुल कमी झाली नाही हे मात्र सिद्ध झाले त्यांनी यापूर्वी जगात सर्वात जास्त व्ह्यूज मिळवण्याचा रेकॉर्ड हा
IShowSpeed या चॅनलच्या नावे होतात तो देखील रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला आहे
https://www.instagram.com/reel/DbJSbtII9aa/?igsh=MXJ0bHQyNDlrZGJ5dA==
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते दोन व्हिडिओ
जंतर-मंतर वर चालू असलेल्या उपोषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केले होते.सोशल मीडिया
वर शेअर देखील केले आणि या दोन व्हिडिओमध्ये त्यांनी देशातील युवकांशी संवाद साधला गुरुवारी टाकलेल्या या
https://www.instagram.com/reel/DbLyA8tIo7x/?igsh=MThlcjh5MTJkbTVuNg==
व्हिडिओला 24 तासांमध्ये 303 मिलियन व्ह्यूज म्हणजेच 30 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला पूर्वी हा रेकॉर्ड
IShowSpeed यांच्या नावे होता या चॅनलला 300 मिलियन व्ह्यूज
मिळाले गुरुवारी शेअर केलेल्या व्हिडिओ 322 मिलियन वेळेस पाहिला गेला
तर शुक्रवारी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला
हेही वाचा-तीन बहिणी एकाच तरुणाशी लग्न! सोशल मीडियावरील व्हायरल विवाहामागचे सत्य काय?
पंतप्रधान मोदींनी Gen Z सोबत दुसऱ्यांदा संवाद साधला.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २४ तासांपेक्षा कमी वेळात पंतप्रधान मोदींनी देशातील ‘Gen Z’शी दुसऱ्यांदा संवाद
साधला आणि यावेळी त्यांनी असे माध्यम निवडले, ज्यावर आजची तरुण पिढी सर्वाधिक सक्रिय आहे आणि स्क्रोल करते.
शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता, पंतप्रधान मोदींनी ‘Gen Z‘च्या शैलीत हा दुसरा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला
आणि गुरुवारच्या व्हिडिओवर मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल व सूचनांबद्दल ‘Gen Z ‘चे आभार मानले.
नव्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “धन्यवाद मित्रांनो, काल रात्री उशिरा मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. माझ्या
व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि तुमच्या सकारात्मक सूचनांबद्दल सर्वांचे आभार. हे प्रेम असेच टिकून
राहील. आपले संबंध अधिक सक्रियपणे वाढत राहतील.”धन्यवाद, धन्यवाद मित्रांनो: पंतप्रधान मोदी
पहिल्या व्हिडिओ पेक्षा दुसरा व्हिडिओ वेगळा
GenZ ला संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी हे दोन व्हिडिओ शेअर केले ज्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी हे थोडे
गंभीर दिसत होते तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मात्र नरेंद्र मोदी अगदी रिलॅक्स मूडमध्ये दिसत होते पहिल्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी
यांनी कॅमेरा आपल्या चेहऱ्यापासून थोडा लांब ठेवला होता तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कॅमेरा थोडा आणखीन लांब ठेवला व स्वतः
नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ तयार झाल्यानंतर कॅमेरा स्वतः बंद केला
Darren Jason Watkins Jr., ज्याला IShowSpeed किंवा Speed म्हणून ओळखले जाते,
हा अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय YouTuber, ऑनलाइन स्ट्रीमर आणि सोशल
मीडिया इन्फ्लुएन्सरपैकी एक आहे. त्याचा जन्म २१ जानेवारी २००५ रोजी अमेरिकेतील सिनसिनाटी, ओहायो येथे झाला.
IShowSpeed बद्दल महत्त्वाची माहिती
खरे नाव: Darren Jason Watkins Jr.
जन्म: २१ जानेवारी २००५
देश: अमेरिका
व्यवसाय: YouTuber, ऑनलाइन स्ट्रीमर, रॅपर
YouTube
तो प्रसिद्ध कसा झाला?
सुरुवातीला IShowSpeed ने NBA 2K, FIFA (EA Sports FC), Fortnite यांसारख्या गेम्सचे व्हिडिओ आणि लाइव्ह स्ट्रीम्स सुरू केले.
त्याच्या अतिशय उत्साही, विनोदी आणि नाट्यमय प्रतिक्रियांमुळे त्याचे व्हिडिओ
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. २०२१ नंतर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली. �
त्याची खास वैशिष्ट्ये
ऊर्जावान आणि विनोदी लाइव्ह स्ट्रीम्स
चाहत्यांशी थेट संवाद
विविध देशांमध्ये जाऊन IRL (In Real Life) स्ट्रीमिंग
फुटबॉलविषयी विशेष आवड, विशेषतः Cristiano Ronaldo याचा मोठा चाहता
“SUI” सेलिब्रेशन आणि “SEWEY” म्हणण्यामुळेही तो प्रसिद्ध आहे.
लोकप्रियता
२०२६ पर्यंत त्याच्या YouTube चॅनेलवर ५३ दशलक्षांहून अधिक (५३.८+ million) सदस्य आहेत.
त्याच्या व्हिडिओंना अब्जावधी व्ह्यूज मिळाले आहेत.
तो जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंटरनेट मनोरंजनकर्त्यांपैकी एक मानला जातो.
वाद
IShowSpeed अनेक वेळा त्याच्या लाइव्ह स्ट्रीममधील आक्रमक किंवा वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत राहिला आहे. मात्र,
अलीकडच्या काळात त्याने विविध देशांना भेट देऊन तेथील संस्कृती,
लोकजीवन आणि पर्यटनस्थळे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर अधिक भर दिला आहे.
आज IShowSpeed हा केवळ गेमिंग स्ट्रीमर नसून, जगभरात लाखो
चाहत्यांचा आवडता डिजिटल मनोरंजनकर्ता आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखला जातो.
नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.हे यावरून सिद्ध होते.
नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग मोठा आहे हे या जागतिक विक्रमावरून दिसत आहे.नरेंद्र मोदी यांच्या सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.







