उंदरांनी केली 10 लाखांच्या दागिन्यांची चोरी! CCTV मध्ये पाहून मालकालाही बसला धक्का
कर्नाटकातील ज्वेलरी शॉपमधून सोन्याचे व हिऱ्याचे दागिने उंदरांनी बिळात नेले; सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले संपूर्ण रहस्य.
Rats stole the jewelry
उंदराने केली दहा लाखांच्या दागिन्यांची चोरी! हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही,
पण हे सत्य आहे. ही घटना कर्नाटकमधील आहे. एका ज्वेलरी शॉपमधून चक्क उंदरांनी दहा लाख रुपयांचे
दागिने पळवले. दुकान मालकाने सुरुवातीला कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला,
पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले तेव्हा कळाले की ही चोरी कर्मचाऱ्यांनी नव्हे,
तर चक्क उंदरांनी केली आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

कर्नाटक राज्यातील एका ज्वेलरी शॉपमध्ये चोरीची घटना घडली.
सकाळी जेव्हा दुकान उघडले तेव्हा मालकाच्या लक्षात आले की काही दागिने चोरीला गेले आहेत.
त्यांची एकूण किंमत काढली असता जवळपास दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे समोर
आले. प्रथम दुकान मालकाला कर्मचाऱ्यांवर संशय आला, पण नंतर सीसीटीव्ही फुटेज
हेही वाचा-शिंदे गटाच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका! आमदारकी धोक्यात? नेमकं प्रकरण काय?
पाहिल्यानंतर कळाले की हे दागिने चक्क उंदरांनी नेले आहेत. जेव्हा उंदरांचे बिळ खोदण्यात आले तेव्हा दागिने परत मिळाले.
व्हिडिओ ची लिंक खाली दिली आहे
https://www.instagram.com/reel/Dba3JQ5K87V/?igsh=bHVpZzk3NDNuODl3
नेमकी चोरी झाली कशी?
कर्नाटक राज्यातील तुमकूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध सराफा दुकानात चोरीची घटना घडली.
सकाळी जेव्हा दुकान मालक दुकानात आला तेव्हा त्याला कळाले की दुकानात चोरी झाली आहे.
त्यांनी संपूर्ण दुकान व्यवस्थित पाहिले, पण कुठेही शटर तुटलेले किंवा वाकलेले आढळले नाही.
भिंतीही व्यवस्थित होत्या. मग चोरी झाली कशी, हा प्रश्न दुकान मालकाला पडला आणि
हेही वाचा-ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका बंद! सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा, कोणत्या दिवशी कुठे बँक राहणार बंद?
त्यांचा पहिला संशय दुकानातील कर्मचाऱ्यांवर गेला. त्यांनी त्यांना चांगलेच
धारेवर धरले, पण त्यांच्यापैकी कोणीही चोरी केली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे कळाले की चोरी उंदरांनी केली?
शेवटी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. दुकानातील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज
काळजीपूर्वक पाहण्यात आले. तेव्हा लक्षात आले की उंदीर आले आणि त्यांनी दागिने तोंडात धरून आपल्या बिळात नेले. हे
पाहिल्यानंतर दुकान मालकाला दिलासा मिळाला, कारण जवळपास
दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे दागिने दुकानातून गायब झाले होते.
हिऱ्यांचे आणि सोन्याचे दागिने गायब
जेव्हा उंदरांचे बिळ खोदण्यात आले तेव्हा कळाले की उंदरांनी सोन्याचे तसेच हिऱ्यांचे दागिनेही नेले होते.
पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच काही हिऱ्यांचे दागिने उंदरांनी बिळात नेऊन ठेवले होते.
या दागिन्यांमध्ये दहा सोन्याच्या अंगठ्या आणि दोन सोन्याचे हार होते.
त्यांची अंदाजे किंमत दहा लाख रुपये असल्याचे सांगितले गेले. चोरीनंतर सरळ पोलिसांना फोन करण्याऐवजी आधी
कर्मचाऱ्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
उंदरांनी केलेल्या या चोरीमुळे सध्या सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
दुकानात सीसीटीव्ही फुटेज नसते तर कर्मचाऱ्यांवरच आरोप झाला असता,
असेही बोलले जात आहे. मात्र उंदरांनी केलेल्या या चोरीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.







