सावधान! पाकिस्तानी गोरी क्रीमचा मोठा धोका; 18 महिलांना किडनीचे विकार, महाराष्ट्रात विक्रीवर बंदी?
गोरा रंग करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी गोरी क्रीममध्ये धोकादायक प्रमाणात मर्क्युरी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. नागपुरातील 18 महिलांच्या किडनीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली.
- सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण;
- पाकिस्तानी क्रीम ने केला घात
Pakistani Fairness Cream Ban
काळा रंग गोरा व्हावा म्हणून चक्क भारतीय महिलांनी पाकिस्तानी गोरी क्रीम वापरली
आणि थेट यापैकी काही महिलांना किडनीचा आजार झाला. यानंतर अन्न व औषध
प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या पाकिस्तानी गोरी क्रीमवर बंदी घातली.
नेमके हे प्रकरण काय आहे व कोणत्या शहरांमध्ये 18 महिलांच्या किडनीवर
ही क्रीम वापरल्यामुळे परिणाम झाला, याची सविस्तर माहिती घेऊया.

काळा रंग गोरा व्हावा अशी अनेकांची अपेक्षा असते आणि यासाठी हजारो
रुपयांची ब्युटी प्रॉडक्ट्स वापरताना आपण पाहतो. यामध्ये महिला तसेच पुरुषसुद्धा
या क्रीम वापरतात. पण पाकिस्तानने एक नवा डाव खेळला व भारतामध्ये ऑनलाइन
हेही वाचा-ई-रिक्षा चालक सावधान! व्हायरल BAT-BMS ॲपमागील सत्य काय?
पद्धतीने पाकिस्तानी गोरी क्रीमची विक्री सुरू केली. या क्रीमचा गंभीर परिणाम
थेट किडनीवर व्हायला लागला आणि यानंतर प्रशासनाने या क्रीमवर बंदी घातली.
हे ही वाचा-सुपर एल निनोचा वाढता धोका! खरीपनंतर आता रबी पिकांनाही फटका; अन्नधान्य महागाई वाढण्याची शक्यता
पाकिस्तानी क्रीमची भारतात विक्री
पाकिस्तानमध्ये तयार झालेली ही क्रीम भारतामध्ये सर्रास विकली जात होती.
विशेष करून ही क्रीम सोशल मीडियाच्या माध्यमातून ई-कॉमर्स साइटवरून भारतात मागील
दोन वर्षांपासून विकली जात होती. या क्रीमच्या जाहिराती करताना ही क्रीम वापरल्यामुळे
काळा रंग गोरा होतो, असा दावा देखील करण्यात आला आणि याच दाव्यामुळे अनेक
महिलांनी तसेच पुरुषांनी ही क्रीम विकत घ्यायला सुरुवात केली.
पण जेव्हा ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आली, तेव्हा या क्रीमची चाचणी घेण्यात आली
आणि त्यानंतर छापे टाकण्यात आले व या क्रीमच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.
यामध्ये मेलेनिन ब्लॉक करून त्वचा गोरी होते, असा दावा करण्यात आला होता.
पण या क्रीममध्ये प्रमाणापेक्षा जास्त मर्क्युरी असल्याने या क्रीमवर FDA ने बंदी घातली आहे.
या क्रीमवर एक्सपायरी डेट नाही
पाकिस्तानी गोरी क्रीम या उत्पादनावर कुठल्याही कंपनीचे नाव नाही किंवा
त्या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे आहे, याचा पत्ताही नाही. उत्पादनावर बॅच नंबर,
मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट लिहिणे अनिवार्य आहे. जर एखादी कंपनी
अशा पद्धतीने माहिती लिहित नसेल, तर ते कॉस्मेटिक रेग्युलेशनचे उल्लंघन आहे.
पाकिस्तानी गोरी क्रीमच्या कोणत्याच उत्पादनावर एक्सपायरी डेट लिहिलेली नव्हती.
त्यामुळे यानंतर FDA ने रिटेलर्स, होलसेलर्स, डिस्ट्रीब्युटर्स आणि ई-कॉमर्स साइटवरून
या पाकिस्तानी गोरी क्रीमच्या उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घातली आहे, अशी माहिती FDA कार्यालयाने सांगितली आहे.
नागपुरामध्ये 18 महिलांना किडनीचे विकार?
पाकिस्तानी गोरी क्रीम वापरल्यामुळे आणि यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मर्क्युरी
असल्यामुळे 18 महिलांना किडनीचे विकार झाले आहेत.अशी चर्चा आहे अति प्रमाणातील मर्क्युरी
आणि विषारी घटकांचे परिणाम हे त्वचेसोबतच थेट किडनीवर व नर्व्हस सिस्टीमवर होतात,
असे FDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकट्या नागपुरामध्ये
मागील दोन वर्षांमध्ये 18 महिलांच्या किडनीवर हे विकार झाल्याची चर्चा आहे.
मुंबईमध्ये गुन्हा दाखल
पाकिस्तानी गोरी ब्युटी क्रीम विकल्याप्रकरणी मुंबईमध्ये एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही क्रीम बनवणाऱ्या 34 युनिटवर छापे टाकण्यात आले. यामध्ये अवैध औषधे, अवैध मेडिकल
प्रॉडक्ट्स आणि कॉस्मेटिक्स जप्त करण्यात आले. यांची बाजारातील एकूण
किंमत 4.12 कोटी रुपये एवढी आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केलेल्या या कारवाईची माहिती त्यांनी दिली.
गोरा रंग होण्याच्या नादामध्ये कुठलेही अवैध प्रॉडक्ट वापरून स्वतःची त्वचा तसेच
किडनी खराब करून घेऊ नका. हा कदाचित पाकिस्तानचा एक डाव देखील असू शकतो.
त्यामुळे कुठलेही ब्युटी प्रॉडक्ट विकत घेताना त्यावर मॅन्युफॅक्चररचे नाव,
उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि कंपनीचा पत्ता याची सविस्तर माहिती वाचूनच ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करा.
अन्यथा गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. पाकिस्तानी गोरी क्रीम
आपल्याला कुठे आढळल्यास आपण तक्रारदेखील करू शकतो.







