Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

POK मध्ये वाढला तणाव! भारताकडे मदतीची हाक, JAAC वर पाकिस्तानची बंदी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसक आंदोलन, JAAC संघटनेवरील बंदी, राजकीय घडामोडी आणि भारताबाबत होत असलेल्या चर्चांमुळे परिस्थिती अधिक चिघळली आहे. संपूर्ण घटनाक्रम आणि POK चा इतिहास जाणून घ्या.

Advertisment

POK News marathi 

पाकव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सध्या जबरदस्त तणाव आहे. POK मधील काही

Advertisement

नेत्यांनी भारताला मदत मागितली आहे. सीमारेषा हटवा आणि आम्हाला भारतात येऊ द्या,

Advertisement

अशी मागणी सध्या येथील जनता करत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी,

JAAC या संघटनेवर पाकिस्तानने बंदी का घातली, हिंसाचारात

आतापर्यंत किती जणांचा बळी गेला, याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया.

POK News marathi 
POK News marathi

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जबरदस्त तणाव पाहायला मिळत आहे.

या हिंसाचारात गेल्या महिन्यामध्ये 30 जणांचा बळी गेला आहे. भारताने देखील आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेपाची मागणी केली होती.

 

POK मधील जनतेची मागणी आहे की, भारत आणि POK मधील सीमारेषा हटवा. ही मागणी सध्या जोर धरत आहे.

 

पीओके (PoK) चा इतिहास

पीओके (Pakistan-occupied Kashmir) म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला

काश्मीरचा भाग. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर जम्मू-काश्मीर संस्थानावर पाकिस्तान समर्थित कबायली आक्रमण झाले.

हेही वाचा-सावधान! पाकिस्तानी गोरी क्रीमचा मोठा धोका; 18 महिलांना किडनीचे विकार, महाराष्ट्रात विक्रीवर बंदी?

त्यानंतर तत्कालीन महाराजा हरिसिंह यांनी भारताशी विलिनीकरणाचा करार (Instrument of Accession) केला आणि

भारतीय सैन्याने कारवाई सुरू केली. 1948 मध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतर काश्मीरचा काही भाग

हेही वाचा-ई-रिक्षा चालक सावधान! व्हायरल BAT-BMS ॲपमागील सत्य काय?

पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. पाकिस्तान या प्रदेशाला “आझाद जम्मू आणि काश्मीर”

तसेच “गिलगिट-बाल्टिस्तान” अशा प्रशासकीय भागांमध्ये विभागून प्रशासन चालवतो.

भारत मात्र हा संपूर्ण प्रदेश जम्मू-काश्मीरचा अविभाज्य भाग मानतो आणि पाकिस्तानच्या

ताब्यातील भागाला “पाकव्याप्त काश्मीर (PoK)” असे संबोधतो. हा मुद्दा आजही

भारत-पाकिस्तान संबंधांतील सर्वात संवेदनशील आणि वादग्रस्त विषयांपैकी एक आहे.

 

JAAC संघटनेबद्दल जाणून घ्या

JAAC अर्थात जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती हे या संघटनेचे नाव आहे.

या संघटनेची स्थापना शौकत नवाज मीर या 50 वर्षीय व्यक्तीने 2023 मध्ये मालमत्ता

कर लादण्याच्या विरोधात केली. पण थोड्याच काळामध्ये ही संघटना POK मध्ये

जबरदस्त लोकप्रिय झाली. मे 2024 मध्ये या संघटनेने गव्हाच्या अनुदानाच्या विरोधात

आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व शौकत नवाज मीर यांनी केले.

या आंदोलनापुढे पाकिस्तान सरकारला नतमस्तक व्हावे लागले आणि 23 अब्ज रुपयांचे

पॅकेज POK ला देण्यात आले. या संघटनेच्या माध्यमातून पाच लाख लोकांना एकत्र करून

लढा उभारणार असल्याचे शौकत नवाज मीर यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातून 50 हजार कार्यकर्ते जमा होतील व पांढऱ्या

रंगाच्या झेंड्याखाली सर्वजण एकत्र येऊन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतील.

भारतानेदेखील आम्हाला मदत करावी, असे आवाहनदेखील मीर यांनी केले.

 

पाकिस्तान सरकारने JAAC संघटनेवर घातली बंदी

POK मधील आंदोलनामुळे पाकिस्तान सरकारने JAAC या संघटनेवर 5 जून 2026 रोजी बंदी घातली.

दहशतवादी कारवायांविरोधात आम्ही बंदी घातल्याचे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले.

या संघटनेवर बंदी घातल्यामुळे POK मधील जनता आणखीनच नाराज झाली आणि

तीव्र आंदोलन उभे केले. याच आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला

व आंदोलकांनी शवागाराबाहेर आंदोलन सुरू केले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि हे

आंदोलन आणखीनच तीव्र झाले. या गोळीबारामध्ये सहा आंदोलक मारले गेले.

या घटनेला पाकिस्तान पोलिसांनी दहशतवादी कारवाई म्हटले. देशाच्या

सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते, असेही पाकिस्तान पोलिसांनी सांगितले.

 

दरम्यान, गिलगिट-बाल्टिस्ताननंतर 27 जुलै रोजी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये विधानसभा निवडणुका

होणार आहेत, अशी चर्चा आहे. POK विधानसभेमध्ये एकूण 53 जागा आहेत. यापैकी 45 जागांवर थेट निवडणूक होते, तर अन्य

आठ जागा महिला व धार्मिक विद्वानांसाठी राखीव असतात. मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इमरान खान यांच्या

पक्षाने 45 पैकी 25 जागा जिंकत तेथे सत्ता स्थापन केली. एप्रिल 2022 मध्ये हे सरकार कोसळले व सरदार अब्दुल कय्यूम

नियाजी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर PTI नेच सरदार तनवीर इलियास यांना नवीन पंतप्रधान केले. पण एप्रिल 2023 मध्ये

सरदार तनवीर यांनाही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर PTI चेच चौधरी अन्वरुल हक

पंतप्रधान झाले. नोव्हेंबर 2025 मध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे त्यांनादेखील पंतप्रधानपदावरून हटविण्यात आले. आता सध्या

पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे फैसल मुमताज राठौर हे पंतप्रधान आहेत.

 

सध्या POK ची स्थिती अत्यंत भयानक आहे. तेथे तीव्र हिंसक आंदोलने होत आहेत.

यामुळेच तेथील जनता भारताकडे मदतीची अपेक्षा करत आहे. दोन्ही देशांमधील

सीमारेषा रद्द करून POK पुन्हा एकदा भारतामध्ये घेण्याची मागणी जोर धरत आहे.

भारतानेदेखील आंतरराष्ट्रीय संघटनांकडे हस्तक्षेपाची मागणी केलेली आहे, तर पाकिस्तानदेखील या हिंसाचारामागे भारतच

असल्याचे वारंवार सांगत आहे. विशेष म्हणजे, या भागातील जनतेवर पाकिस्तान सरकारने कायमस्वरूपी अन्याय केलेला

आहे. येथे मोठ्या प्रमाणावर खनिजांचा साठा आहे, ज्यावर पाकिस्तानची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तरीदेखील

पाकिस्तान POK बाबतीत नेहमीच नकारात्मक भूमिका बाळगत आहे आणि त्याचा फटका तेथील जनतेला बसत आहे.

FAQ 1: पाकव्याप्त काश्मीर (PoK) म्हणजे काय?

उत्तर: पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागाला पाकिस्तानव्याप्त काश्मीर

(PoK) म्हटले जाते. भारत हा संपूर्ण जम्मू-काश्मीर प्रदेश आपला अविभाज्य

भाग मानतो, तर पाकिस्तान या भागाचे स्वतंत्र प्रशासन चालवतो.

 

FAQ 2: JAAC संघटना काय आहे आणि तिच्यावर बंदी का घालण्यात आली?

उत्तर: JAAC (जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती) ही POK मधील एक सामाजिक-राजकीय संघटना आहे. पाकिस्तान

सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत या संघटनेवर बंदी घातल्याचे सांगितले आहे,

तर संघटनेच्या समर्थकांचा दावा आहे की ही कारवाई आंदोलन दडपण्यासाठी करण्यात आली.

 

FAQ 3: सध्या POK मध्ये तणाव निर्माण होण्यामागील प्रमुख कारणे कोणती आहेत?

उत्तर: POK मध्ये राजकीय अस्थिरता, आंदोलन, संघटनांवरील कारवाई, आर्थिक प्रश्न

आणि प्रशासनाविरोधातील जनतेचा वाढता असंतोष यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे तेथील परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button