Advertisement
शेती

Cotton prices-“यावर्षी कापसाचे भाव कुठे जाणार? शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की आव्हान?”

यावर्षी कापसाचे भाव कसे राहतील?

Story Highlights
  • पुढील काही महिन्यांचा अंदाज
  • भावावर परिणाम करणारे इतर मुद्दे
  • उत्पादनाचा अंदाज
  • जागतिक व्यापारातील तणाव
Advertisment

कापूस हा भारतातील “पांढरे सोने” म्हणून ओळखला जाणारा महत्त्वाचा नगदी पीक आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या कापूस उत्पादक देशांपैकी एक असून महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांत याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. कापसाच्या किमतीतील(Cotton prices) चढ-उतारांचा थेट परिणाम शेतकरी, व्यापारी आणि वस्त्रोद्योगावर होतो. त्यामुळे “यावर्षी कापसाचे भाव कसे राहतील?” या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यातच अमेरिकेने लावले टेरिफ आणि अमेरिका आणि भारताचे ताणलेले संबंध आणि मागील काही दिवसांमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटनेची शक्यता निर्माण झाली आहे

Advertisement

यामुळे सद्यस्थितीला शेतकरी प्रचंड चिंता दूर आहे कारण की शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही बऱ्याच प्रमाणामध्ये कापसाच्या भावावर(Cotton prices)अवलंबून असते पण मागील तीन-चार वर्षांपासून कापसाला योग्य भाव(Cotton prices)मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे नेमकं यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी आणि देशांतर्गत कापसाचे भाव(Cotton prices)नेमके काय राहतील याचा एक अंदाज घेण्याचा हा प्रयत्न असेल

Advertisement

हे हि वाचा-GST कपात”22 सप्टेंबर पासून : जाणून घ्या कोणत्या वस्तू होणार स्वस्त

आंतरराष्ट्रीय परिस्थिती
१) जागतिक मागणी-पुरवठा

जागतिक स्तरावर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि आफ्रिकी देश हे कापसाचे मोठे उत्पादक आहेत. यंदा अमेरिकेत उष्णतेमुळे आणि दुष्काळामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चीनकडून वस्त्रोद्योगासाठी कापसाची मागणी वाढताना दिसत आहे. भारताप्रमाणेच अमेरिका आणि चीनचे संबंधही चांगलेच ताणले आहेत जर चीन मधील वस्त्र उद्योगासाठी लागणारा कापूस जर चीनने भारताकडून आयात केला तर निश्चित याचा फायदा हा भारतीय शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहेया घटकांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव(Cotton prices)तुलनेने जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

२) क्रूड ऑईलचे दर

कृत्रिम तंतू (synthetic fibers) हे क्रूड ऑईलवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जर क्रूड महागले, तर कृत्रिम तंतू महाग होतात आणि नैसर्गिक कापसाची मागणी वाढते. सध्या क्रूडचे दर अस्थिर आहेत, पण वाढीच्या दिशेने आहेत. यामुळे कापसाच्या दरांना(Cotton prices)अप्रत्यक्ष आधार मिळणार आहे.

 

३) रुपया व डॉलर विनिमय दर

रुपया जर डॉलरच्या तुलनेत कमजोर राहिला तर भारतातून होणारी निर्यात स्वस्त ठरते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांकडून कापसाला चांगली मागणी येते. यामुळे देशांतर्गत भाव वाढतात.(Cotton prices)

हे हि वाचा-वराह पालनासाठी शेतकऱ्यांना ३० लाखांपर्यंत अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू

४) जागतिक व्यापारातील तणाव

अमेरिका-चीन व्यापार युद्ध, मध्यपूर्वेतील अस्थिरता किंवा आफ्रिकेतील हवामान बदल यांचा थेट परिणाम जागतिक कापूस व्यापारावर(Cotton prices) होतो. उत्पादन कमी झाल्यास भारताला निर्यातीसाठी मोठी संधी मिळू शकते.

 

देशातील परिस्थिती
१) उत्पादनाचा अंदाज

महाराष्ट्र व मध्य भारतात यंदा पावसाचा पॅटर्न काहीसा अनियमित आहे. सुरुवातीला उशीर झालेला पाऊस आणि नंतर जादा पावसामुळे पिकावर ताण आला. तरीसुद्धा मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन सरासरी राहील, असा अंदाज आहे.

२) कीड आणि रोगांचा धोका

गेल्या काही वर्षांत पिंक बॉलवर्म या कीडीने कापसाचे मोठे नुकसान केले आहे. यंदाही शेतकरी सावध असले तरी जर कीड प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात घट होऊ शकते. उत्पादन घटले की भाव वाढतात.(Cotton prices)

 

३) सरकारी धोरणे

केंद्र शासनाने यावर्षी कापसासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. Cotton Corporation of India (CCI) आणि NAFED यांच्याकडून थेट खरेदी केल्यामुळे बाजारात दर MSP खाली जाण्याची शक्यता कमी आहे.

४) वस्त्रोद्योगातील मागणी

भारतामध्ये वस्त्रोद्योगाला मागणी वाढत आहे. रेडीमेड कपडे, घरगुती कपडे, आणि निर्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर कापसाची गरज आहे. कोरोनानंतर वस्त्रोद्योग पुन्हा वेगाने उभा राहिल्यामुळे कापसाच्या दरांना(Cotton prices) चांगला आधार मिळत आहे.

 

५) साठा व्यवस्थापन

मागील वर्षातील न विकलेला कापूस जर मोठ्या प्रमाणावर बाजारात आला, तर हंगामाच्या सुरुवातीला थोडीशी नरमी जाणवू शकते. मात्र ही नरमी दीर्घकाळ टिकणार नाही.

 

भावावर परिणाम करणारे इतर मुद्दे

  • शेतीतील उत्पादन खर्च – खत, बियाणे, मजुरी यांचे दर वाढल्याने शेतकरी कमी भावात विक्री करणार नाहीत.
  • सिंथेटिक तंतूंची स्पर्धा – जर पॉलिस्टर किंवा नायलॉनचे दर कमी झाले, तर कापसाची मागणी थोडी घटू शकते.
  • निर्यात धोरण – भारताने यावर्षी कापूस निर्यातीचे लक्ष्य वाढवले आहे. जर निर्यात चांगली झाली, तर दर(Cotton prices)आणखी चढतील.
  • हवामान बदल – सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत जर अति पाऊस किंवा उष्णता वाढली, तर उत्पादन घटून दर वाढतील.

पुढील काही महिन्यांचा अंदाज

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नवीन माल येणार – बाजारात कापूस मोठ्या प्रमाणात आल्यामुळे दर(Cotton prices)काहीसे नरम होऊ शकतात.

जानेवारीनंतर दर वाढीची शक्यता – आंतरराष्ट्रीय मागणी, निर्यात आणि वस्त्रोद्योगातील मागणी यामुळे जानेवारी-फेब्रुवारीपासून दर चढत्या दिशेने जाऊ शकतात.

दराचा सरासरी पट्टा – महाराष्ट्र आणि मध्य भारतात कापूस दर(Cotton prices) ७,५०० ते ९,००० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

निष्कर्ष

यावर्षी कापसाचे भाव(Cotton prices) तुलनेने स्थिर आणि शेतकऱ्यांसाठी समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी, अमेरिकेतील उत्पादन घट, चीनकडून वाढती खरेदी, रुपयाचे अवमूल्यन आणि देशांतर्गत वस्त्रोद्योगाची चांगली मागणी या सर्व घटकांचा दरांवर सकारात्मक परिणाम होईल. मात्र हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा धोका, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी यावर पुढील काही महिन्यांचे भाव(Cotton prices) अवलंबून असतील.

शेतकऱ्यांनी योग्य वेळी विक्री करून, तसेच सरकारी खरेदी केंद्रांचा लाभ घेऊन आपला फायदा जास्तीत जास्त करून घ्यावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button