Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, E-KYC कशी कराल? कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या सर्व प्रोसेस
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, E-KYC कशी कराल?

- इ के वाय सी(E-KYC)करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
- ई केवायसी (E-KYC)कशी करायची
- ई केवायसी करणे आवश्यक का आहे ?
महाराष्ट्रातील बहुचर्चित योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana)या योजनेमध्ये एक बदल करण्यात आला आहे या योजनेसाठी आता ई केवायसी( E-KYC)अनिवार्य करण्यात आली आहे आणि ज्या भगिनींनी ई केवायसी( E-KYC )केली नाही त्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे(Ladki Bahin Yojana)पैसे बंद होती अशी माहिती मंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे व मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली आहे नेमकी ही ई केवायसी (E-KYC)कशी करायची याविषयी आपण जाणून घेऊया
WhatsApp Audio 2025-09-20 at 09.44.21
मंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही ई केवायसी(E-KYC) करणे अनिवार्य आहे जर आपण ई केवायसी(E-KYC)नाही केली तर या योजनेचे पैसे बंद होतील त्यामुळे लवकरात लवकर आपण ही ई केवायसी(E-KYC)करून घ्यावे असे आवाहन सौ मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी केली आहे
ई केवायसी करणे आवश्यक का आहे ?
याविषयी बोलताना मेघनाताई बोर्डीकर यांनी सांगितले की ई केवायसी(E-KYC)केल्यामुळे या योजनेतील खोटे लाभार्थी आपोआप बाहेर जातील त्यांचे पैसे बंद होतील आणि खऱ्या लाभार्थ्यांना याचा संपूर्ण लाभ मिळेल शासनाने जे निकष घालून दिलेले आहेत त्या निकषात बसणाऱ्यांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे(Ladki Bahin Yojana)पैसे मिळतील जे निकषात बसणार नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत
ई केवायसी(E-KYC)केल्यामुळे या आणि बाकी शासकीय योजनेमध्ये पारदर्शकता व सुरक्षितता येईल तसेच भविष्यात शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांमध्ये आणि अनुदान मिळविण्यासाठी ही ई केवायसी(E-KYC)उपयुक्त ठरेल आणि महत्वाचे म्हणजे दरमहा पात्र लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मिळतील
हे हि वाचा –GST कपात”22 सप्टेंबर पासून : जाणून घ्या कोणत्या वस्तू होणार स्वस्त
इ के वाय सी(E-KYC)करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(Ladki Bahin Yojana)योजने च्या ई केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
मोबाईल नंबर(हा मोबाईल नंबर आधार कार्डशी सलग्नित असावा)
चालू असलेल्या बँकेचा खाते क्रमांक व आयएफसी कोड
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड
वर दिलेली ही कागदपत्रे घेऊन सीएससी सेंटर मधून किंवा मोबाईल वरून सुद्धा आपण अगदी सहजरीत्या ई केवायसी(E-KYC)करू शकतो
ई केवायसी कशी करावी ?


इ के वाय सी(E-KYC)आपण दोन पद्धतीने करू शकतो एक तर आपण ऑनलाइन सेंटरमध्ये जाऊन ई केवायसी(E-KYC)करून घेऊ शकतो तसेच आपण मोबाईल मधून सुद्धा ई-केवायसी(E-KYC)अगदी सहजरीत्या करू शकतो यासाठी प्रक्रिया काय आहे ते पाहूया
सर्वप्रथम या वेबसाईटला भेट द्या यासाठी या https://lbyadmin.maharashtra.gov.in/ लिंक वर क्लिक करा
वेबसाईट वर आल्यानंतर प्रथम लॉगिन करून घ्या व त्यानंतर मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपी ची पडताळणी करून घ्या
यानंतर वेबसाईट मध्ये दर्शविल्याप्रमाणे तुमचे संपूर्ण नाव
संपूर्ण पत्ता व बँकेचे तपशील आयएफसी कोड सह व्यवस्थित भरा
यानंतर आपल्याला आपले वर सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला अपलोड करावयाची आहेत यामध्ये आधार कार्ड,बँकेचे पासबुक(या पासबुक अपलोड करताना यावर आयएफसी कोड आणि तुमचा खाते क्रमांक हा स्पष्ट दिसत असावा अशा पद्धतीने अपलोड करा),फोटो या गोष्टी अपलोड करा
हे हि वाचा –वराह पालनासाठी शेतकऱ्यांना ३० लाखांपर्यंत अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू
सर्व गोष्टी अपलोड केल्यानंतर एकदा संबंधित भरलेला पूर्ण अर्ज व्यवस्थित तपासून घ्या नाव मोबाईल नंबर आधार क्रमांक बँकेचा खाते क्रमांक या सर्व गोष्टी एकदा पुन्हा एकदा तपासून घ्या आणि त्यानंतर सबमिट या वर क्लिक करा लगेच तुम्हाला तुमचे इ केवायसी(E-KYC)प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल
ई केवायसी केले नाही तर काय होणार?
इ केवायसी(E-KYC)करण्यासाठी आपल्याला दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे या मुदतीमध्येच आपल्याला ईकेवायसीची(E-KYC)प्रक्रिया पूर्ण करायची आहे जर आपण इ के वाय सी(E-KYC)केली नाही तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे(Ladki Bahin Yojana)जे दीड हजार रुपये मिळत आहेत ते पैसे बंद होणार दिलेल्या मुदतीचे ई केवायसी(E-KYC)केले नाही तर त्यानंतर पडताळणी होणार नाही अर्थात इ केवायसी(E-KYC)करता येणार नाही तसेच ई केवायसी(E-KYC)न केल्यामुळे पैसे बंद झाले तर यासाठी संपूर्ण लाभार्थी जबाबदार असेल
अशा सोप्या पद्धतीने आपण देखील अगदी सहजरीत्या घरी बसून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ती ई केवायसी(E-KYC)ची प्रक्रिया पूर्ण करू शकतो यासाठी लक्षात ठेवा दोन महिन्यांची फक्त मुदत दिलेली आहे त्यामध्येच आपल्याला ई केवायसी(E-KYC)करून घेणे अनिवार्य आहे त्यानंतर कुठलीही तक्रार चालणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सर्व भगिनींनी ई केवायसी(E-KYC)प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल वरून सुद्धा ही ई केवायसी(E-KYC)प्रक्रिया पूर्ण करू शकतो आणि कळत नसेल तर ऑनलाईन सेंटरला जाऊन सुद्धा आपण ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतो







