GST कपात”22 सप्टेंबर पासून : जाणून घ्या कोणत्या वस्तू होणार स्वस्त

- कोणत्या वस्तू होतील स्वस्त?
- घरगुती वापराच्या वस्तू
- घरगुती वापराच्या वस्तू
- औषधे व आरोग्यसंबंधी वस्तू
अमेरिकेने भारतावर लावलेले 50% टेरिफ यामुळे भारतामध्ये महागाई प्रचंड वाढेल अशी शक्यता अर्थतज्ञ असं भाकीत करत होते पण उलट 22 सप्टेंबर पासून देशांमधील महागाई आणखीन घटनेची शक्यता आहे कारण केंद्र सरकारने नवीन कर प्रणाली(GST) लागू करणार आहे ज्यामध्ये जीएसटी(वस्तू सेवा कर)(GST) यामध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत केंद्रीय अप्रत्यक्ष कर सीमाशुल्क मंडळाने(CBIC) यांनी जाहीर केलेल्या बदलांमुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि घरगुती दैनंदिन वापरातील वस्तू तसेच काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्वस्त होणार आहेत या नवीन करकप्रणालीमुळे घरगुती बजेट थोडे हलके व्हायची अपेक्षा आहे अमेरिकेने लावलेल्या टेरिफ नंतर भारतामध्ये महागाई वाढेल असं असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे हा जीएसटी दर(GST) अर्ध्यापेक्षाही कमी करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे
कोणत्या वस्तू होतील स्वस्त?
नवीन जीएसटी दर(GST) लागू झाल्यानंतर कोणत्या कोणत्या वस्तू या स्वस्त होतील त्यावर एक नजर टाकूया
जीएसटी(GST) परिषदेच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निर्णयांनुसार खालील वस्तूंच्या दरात घट होणार आहे

घरगुती वापराच्या वस्तू
सामान्य ग्राहकांना रोजच्या वापरण्यातील वस्तू या स्वस्त होणार आहेत यामध्ये
डिटर्जंट, साबण, टूथपेस्ट यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी(GST) दर १८% वरून १२% करण्यात आला आहे.म्हणजे तब्बल सहा टक्के एवढा जीएसटी(GST) आता कमी द्यावा लागणार आहे त्यामुळे या वस्तू निश्चित स्वस्त होतील व यामुळे दररोजच्या घरगुती खर्चात बचत होईल.

कपडे व फुटवेअर
कपडे सुद्धा आता स्वस्त होणार आहेत कारण की नवीन जीएसटी(GST)कर प्रणाली नुसार देशांमधील कापड हे स्वस्त होणार आहे तसेच चप्पल बूट म्हणजेच फुटवेअर देखील स्वस्त होणार आहे कारण
१,००० रुपयांखालील कपडे व चपलांवरील करदर १२% वरून ५% करण्यात आला आहे.
या ठिकाणी सुद्धा केंद्र सरकारने सात टक्के एवढा जीएसटी(GST)चा भार कमी केला आहे
मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू
मागील काही वर्षांमध्ये देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा व्यापार हा मोठ्या प्रमाणात होत आहे अनेक दिग्गज कंपन्या भारतामध्ये स्वतःचा व्यापार सुरू करत आहेत तसेच स्टार्टअप मध्ये अनेक भारतीय कंपन्या देखील या बाजारात उतरू पाहत आहेत अशातच केंद्र सरकारने नवीन जीएसटी(GST)करप्रणाली मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवरील जीएसटी(GST) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे
फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर यांसारख्या वस्तूंवरील करदर २८% वरून १८% करण्यात आला आहे.इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर सुद्धा तब्बल दहा टक्के एवढा कर कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या किमती या दहा टक्क्याने उतरतील
यामुळे आगामी सणासुदीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

खाद्यपदार्थ
खाद्यपदार्थ व दूध देखील आता स्वस्त होणार आहे यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे यामध्ये
पॅकेज्ड फूड, रेडी-टू-ईट प्रॉडक्ट्स, तसेच काही दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी(GST) कमी करण्यात आला आहे.या ठिकाणी सुद्धा जीएसटी(GST)कमी करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे कारण दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी(GST)कमी केल्यामुळे बाजारामध्ये दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढेल व त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील आर्थिक फायदा होईल व
त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना किराणा खरेदीत थोडा दिलासा मिळेल.

औषधे व आरोग्यसंबंधी वस्तू
आजारांमध्ये सर्वात जास्त खर्च हा औषधांवर होतो देशांमध्ये औषधांवर मोठ्या प्रमाणात आधी जीएसटी(GST) लागत होता पण केंद्र सरकारच्या या नवीन कर प्रणालीमुळे जनरिक व इतर औषधी देखील स्वस्त होणार आहेत यामध्ये
जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी(GST)शून्य करण्यात आला आहे.
काही आरोग्य उपकरणांवरील करदर देखील १२% वरून ५% करण्यात आला आहे.या निर्णयामुळे सुद्धा सामान्य ग्राहकांना आता औषध गोळ्यांसाठी कमी पैसे मोजावे लागतील व मेडिकल सुविधा आता आणखीन स्वस्त होईल
हे हि वाचा-वराह पालनासाठी शेतकऱ्यांना ३० लाखांपर्यंत अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू
उद्योग-व्यवसायांवर परिणाम
जीएसटी(GST) दरकपातीचा परिणाम फक्त ग्राहकांवरच नव्हे तर व्यापाऱ्यांवर व उत्पादकांवरही होणार आहे.
कमी दरामुळे विक्रीत वाढ होईल आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांची खरेदीक्षमता वाढल्यामुळे बाजारपेठेत चैतन्य येईल.
लघु व मध्यम उद्योगांनाही याचा फायदा होईल.
सरकारचा उद्देश
सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे काही ठळक कारणे आहेत –
महागाईवर नियंत्रण ठेवणे.
ग्राहकांना दिलासा देणे.
रोजगार व उत्पादन वाढवणे.
देशातील आर्थिक चक्र अधिक गतीमान करणे.
हे हि वाचा-Trump Tariff-भारत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी आपली बाजारपेठ का उघडत नाही? हे खरे कारण आहे
तज्ज्ञांचे मत
अर्थतज्ज्ञांच्या मते, जीएसटी कपातीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. मात्र, दीर्घकालीन पातळीवर सरकारला कर महसुलात काहीसा तोटा होऊ शकतो. तरीसुद्धा वाढलेल्या खपामुळे आणि विक्रीतून हा तोटा भरून निघेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ग्राहकांचा फायदा
दररोज लागणाऱ्या वस्तूंवर बचत
कपडे व फुटवेअर स्वस्त
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर कमी दरामुळे खरेदीस प्रोत्साहन
औषधे व आरोग्य उपकरणांवर मोठा दिलासा
https://youtube.com/shorts/bAa41CgJLGc?si=Eg16m7ybUYhsQxP8
निष्कर्ष
जीएसटी(GST)दरांमध्ये झालेला बदल हा सामान्य जनतेसाठी मोठा दिलासा मानला जातो. महागाईच्या काळात हा निर्णय ग्राहकांना दिलासा देणारा ठरणार आहे. आगामी सणासुदीत याचा फायदा सर्वसामान्यांना तसेच व्यापाऱ्यांना होईल. सरकारने घेतलेला हा निर्णय देशाच्या आर्थिक परिस्थितीला गती देणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे
हे नवीन जीएसटीचे(GST)दर 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहेत पण त्याआधी ज्या दुकानदारांकडे जुना स्टॉक आहे तो स्टॉक 22 सप्टेंबर नंतर नवीन जीएसटी(GST)प्रमाणेच विकावा लागणार आहे 22 सप्टेंबर नंतर जे दुकानदार ग्राहकांना जुन्या करप्रणालीप्रमाणे वस्तू विकतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील केंद्र सरकारने दिला आहे



