Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

31 तारखेचा योगायोग: राजीव गांधी आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी, दुःखातून नेतृत्वाची जबाबदारी

नेतृत्व बदलले, काळ बदलला; पण 31 तारखेला देशसेवेची शपथ घेण्यामागची पार्श्वभूमी मात्र सारखीच

Advertisment

सुनेत्रा पवार यांनी काल, 31 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.  31 ऑक्टोबर 1984 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून स्वर्गीय राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्या दिवशी देखील तारीख 31 होती आणि या शपथविधीच्या मागील कारणे देखील जवळपास सारखीच होती.

 

Advertisement
31 तारखेचा योगायोग
राजीव गांधी

https://en.wikipedia.org/wiki/Rajiv_Gandhi

Advertisement

 

राजीव गांधी यांचा शपथविधी

31 ऑक्टोबर 1984 रोजी नवी दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या स्वतःच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्यानंतर लगेच पंतप्रधान पद रिक्त ठेवता येत नसल्याने, तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधी यांचे सुपुत्र स्वर्गीय राजीव गांधी यांची नेता म्हणून निवड केली.

 

 

त्याच दिवशी, म्हणजेच 31 ऑक्टोबर 1984 रोजी, राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी राजीव गांधी यांचे वय फक्त चाळीस वर्षे होते.

 

त्यानंतर, इंदिरा गांधी यांच्यावर 3 नोव्हेंबर 1984 रोजी नवी दिल्लीमधील शांतीवन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या मृत्यूनंतर लगेचच शोकाकुल वातावरणात राजीव गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद तसेच पंतप्रधानपद स्वीकारले. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून देशसेवेसाठी राजीव गांधी पुढे आल्याची चर्चा त्याकाळी प्रसारमाध्यमांमध्ये होती.

 

 

यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. 541 जागांपैकी तब्बल 414 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या. आईच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांना पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती.

31 तारखेचा योगायोग
सुनिता ताई पवार यांचा शपथविधी

 

सुनेत्रा ताई पवार यांचा शपथविधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामती येथे विमानाने येत असताना, बारामती विमानतळाच्या बाजूला त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये अजितदादा पवार यांचे निधन झाले. अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या अपघातावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

 

अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते होते. कामाबाबत तत्परता हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य होते. सामान्यातील सामान्य माणसाचे काम देखील अजितदादा स्वतः लक्ष घालून करत असत. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती.

हे ही वाचा-घड्याळ ठरली अजित दादांची शेवटची ओळख

हेही वाचा-शुगर पेशंट ने दर सहा महिन्याला कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे?

 

 

त्यांच्या अपघाती जाण्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती केली. त्यानंतर सुनेत्राताई पवार यांनी यास संमती दिली.

31 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथे त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही जनसेवेसाठी सुनेत्राताई पवार पुढे आल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.

 

 

स्वर्गीय इंदिरा गांधी आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी देशसेवेसाठी पुढाकार घेतला. या दोन्ही शपथविधींमध्ये तारीख मात्र सारखीच होती — 31 तारीख.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button