Advertisement
राजकीय बातम्या

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीची गोची? डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारीने बदलले राजकीय समीकरण

महाआघाडीच्या डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत संभ्रम; विप्लब बाजोरिया आणि खोतकर यांच्या नावांवर चर्चा, मतविभाजनाची शक्यता वाढली

Advertisment

परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा युतीचा उमेदवार निवडीचा घोळ मिटेना! 

 

Advertisement

आबा शिंदे-डॉक्टर विवेक नावंदर यांच्या उमेदवारीने विप्लब बाजोरिया यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

Advertisement
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक
डॉक्टर विवेक नावंदर

महाआघाडीने डॉक्टर विवेक नावंदर यांच्यासारखा तगडा उमेदवार या निवडणुकीत उतरवल्यामुळे

 

महायुतीची गोची झाली असल्याचे दिसून येत आहे.

महायुतीकडून यापूर्वी विद्यमान आमदार विप्लब बाजोरिया यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र महाआघाडीच्या वतीने डॉक्टर

 

विवेक नावंदर यांची उमेदवारी घोषित झाल्यामुळे आता त्यांच्यासमोर गैर मराठा उमेदवार रिंगणात उतरविणे महायुतीला सोयीचे होणार नाही.

परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक
विप्लब बाजोरिया

मुस्लिम उमेदवार शिवसेनेकडून अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रिंगणात उतरणे दुरापास्त आहे.

यामुळे महायुतीकडून मराठा उमेदवार रिंगणात उतरवून सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून या निवडणुकीत डॉक्टर विवेक

 

नावंदर यांना आव्हान उभे करण्याच्या मानसिकतेत महायुती असल्याचे समजते.

 

 

अर्जुन खोतकर यांच्या चिरंजीवांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे.

 

मात्र खोतकर यांची उमेदवारी नावंदरांसमोर कितपत आव्हान उभे करू शकेल याबद्दल मतदारांमध्ये शंका आहे.

 

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे 131 मते आहेत  तर भाजपाकडे 93 आणि शिंदे सेने कडे 77 मते आहेत.

 

मात्र वाटाघाटीत ही जागा शिंदे सेनेला सुटल्यामुळे भाजप आणि विशेषतःराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मतदार नाराज आहेत.

 

महायुतीच्या वतीने बाहेरचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे डॉक्टर विवेक नावंदर यांची बाजू भक्कम होताना दिसत आहे.

 

 

मुस्लिम मतदार महायुतीकडे जाण्याची सुतराम शक्यता नाही .भले ते भाजप किंवा शिंदे सेना अथवा राष्ट्रवादीचे मतदार असले तरी.

 

त्याचबरोबर राष्ट्रवादीला ही जागा न सुटल्यामुळे राष्ट्रवादीचे मतदार आता या निवडणुकीत मतदान करण्यास मुक्त आहेत.

 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत अँटी डिफेकशन कायदा लागू होत नाही.

 

त्यामुळे महायुतीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट आढळून आल्यास त्याचे नवल वाटायला नको.

 

डॉक्टर नावंदरांच्या उमेदवारीने महाआघाडीने राजकीय खेळीमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

एकतर डॉक्टर नावंदर हे कट्टर शिवसैनिक आहेत त्याचबरोबर नावंदर हे स्थानिक उमेदवार आहेत त्या तुलनेत विप्लब

 

बाजोरिया अथवा खोतकर हे उपरे मानले जातात. भलेही अर्जुन खोतकर हे, मी परभणी लोकसभा मतदारसंघातील आहे आणि

 

म्हणून स्थानिक असल्याचा दावा करत असले तरी ,त्यांचा घनसावंगी मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघात येतो

मात्र घनसावंगी तालुका परभणी जिल्ह्यात येत नाही.

अगदी पूर्वीचा संयुक्त परभणी हिंगोली जिल्हा जरी गृहीत धरला तरी, या जिल्ह्यात परतुर तालुका समाविष्ट होता घनसांगी

 

तालुका समाविष्ट नव्हता. यामुळे खोतकर हे आपल्यावरचा बाहेरचा उमेदवाराचा शिक्का पुसू शकणार नाहीत. त्याचबरोबर

 

खोत कारांची या निवडणुकीत पक्षाकडून अर्थात एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळणाऱ्या रसदीवर भिस्त आहे असे बोलले जाते.

 

त्यामुळे एकतर रसद पुरवली गेली पाहिजे. त्याचबरोबर बाहेरचा उमेदवार हा शिक्का घेऊन खोतकर किंवा विप्लब बाजोरिया हे

 

निवडणूक रिंगणात उतरत असतानाच काहीशा पराभूत मानसिकतेतून रिंगणात उतरणार आहेत.

 

खोतकर हे मराठा ब्रँड घेऊन जरी रिंगणात उतरले तरी बाहेरची रसद यावर ते अवलंबून असणार आहेत.

 

 

मराठा हा ब्रँड असला तरी, परभणी हिंगोली जिल्ह्यांसाठी अर्जुन खोतकर यांचे योगदान काय असाही प्रश्न परभणी हिंगोली करांना पडतो.

 

अर्जुन खोतकर युती सरकारच्या काळात मंत्री राहिलेले असताना देखील परभणी हिंगोली जिल्ह्याला त्यांच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून काही मिळाल्याचे परभणीकरांना स्मरत नाही.

तुलनेत डॉक्टर विवेक नावंदर हे परभणी हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत एक डॉक्टर म्हणून सदैव तत्पर राहिलेले आहेत.

 

कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी सतत पक्ष कार्य केलेले आहे. महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून देखील राहिलेले आहेत.

 

त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला जे घवघवीत यश मिळाले त्याचे

 

शिल्पकार डॉक्टर विवेक नावंदर मानले जातात. ही बाब खासदार संजय जाधव यांनी कुठेही जाहीर मान्य केलेली नसली

 

तरी देखील पक्षश्रेष्ठींना याची पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळेच या विधानपरिषद निवडणुकीसाठी डॉक्टर विवेक नावंदर यांना

उमेदवारी देण्यात आलेली आहे.

एकंदर या निवडणुकीच्या पूर्वार्धात महाआघाडीने डॉक्टर विवेक नावंदर यांची उमेदवारी घोषित करून निवडणुकीत आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

 

डॉक्टर विवेक नावंदर यांच्या उमेदवारीने महाआघाडीने एकाच दगडात अनेक पक्षी घायाळ केलेले दिसतात.

नंबर एक स्थानिक उमेदवार, नंबर दोन उच्च विद्या विभूषित, नंबर तीन अल्पसंख्यांक, नंबर चार कट्टर शिवसैनिक आणि

 

विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात सभासद म्हणून योग्य भूमिका पार पाडण्याची क्षमता असलेला उमेदवार. त्याचबरोबर

 

अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे वाढलेला कल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

 

यांच्या गटाची प्रचंड नाराजी यासोबत डॉक्टर विवेक नावंदर यांची वैयक्तिक प्रतिमा ह्या

 

डॉक्टर विवेक नावंदर यांच्या या निवडणुकीमध्ये जमेच्या बाजू आणि बलस्थान आहेत.

 

प्रत्यक्षात निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे असले तरी आज मीतीला डॉक्टर विवेक नावंदर

 

यांच्या उमेदवारीने महाआघाडीची सरशी झाली असल्याचे चित्र समोर आले आहे.

 

सदरील लेख हा प्रसिद्ध पत्रकार आबा शिंदे यांनी लिहिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button