Advertisement
राजकीय बातम्या

परभणी-हिंगोली विधान परिषद जागेवरून महायुतीत रस्सीखेच; विप्लब बाजोरियांवर नाराजीचा दावा

आबा शिंदे यांच्या ओपिनियन पोलमुळे राजकीय चर्चांना उधाण; स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याची मतदारांची भूमिका

Advertisment

विप्लब बाजोरिया यांच्यावरून महायुतीत रस्सीखेच; आबा शिंदे यांच्या ओपिनियन पोलची जोरदार चर्चा

सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून अर्ज दाखल करण्यापासून

Advertisement
आबा शिंदे यांच्या ओपिनियन पोलची जोरदार चर्चा
आबा शिंदे यांच्या ओपिनियन पोलची जोरदार चर्चा

ते उमेदवार निश्चितीपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Advertisement

 

महायुतीतील जागावाटपावरूनही विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली.

https://www.facebook.com/share/p/1cFvW8Xd5B/

या भेटीत परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे.

 

हेही वाचा-रोज एक महिना लिंबू पाणी पिल्यास शरीरात काय बदल होतात?

हेही वाचा-बाजारातील 850ML तेलाची पाकिटे बंद होणार? सरकार आणणार नवा नियम; ग्राहकांना काय फायदा होणार?

 

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार विप्लब बाजोरिया हे शिवसेनेचे असल्याने या जागेसाठी एकनाथ शिंदे आग्रही

 

असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रसिद्ध पत्रकार आबा शिंदे आणि जेएनसीसीटी न्यूज यांनी केलेल्या ओपिनियन पोलमुळे

राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.

 

कोण आहेत विप्लब बाजोरिया?

विप्लब गोपिकिशन बाजोरिया (जन्म १५ मार्च १९८६) हे महाराष्ट्र विधान परिषदेत परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था

 

मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत. मे २०१८ मध्ये निवडून आल्यानंतर ते विधान परिषदेतील सर्वात तरुण

 

आमदारांपैकी एक ठरले. ते जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.

 

मूळचे विदर्भातील असलेल्या विप्लब बाजोरिया यांनी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.

जेएनसीसीटी न्यूजचा ओपिनियन पोल

प्रसिद्ध पत्रकार आबा शिंदे यांनी केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे की परभणी-हिंगोली

 

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, यासाठी भाजप आग्रही आहे.

 

मात्र ही जागा शिवसेनेची असल्याने शिंदे गटानेही दावा कायम ठेवला आहे.

आबा शिंदे यांनी केलेल्या ओपिनियन पोलमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की विप्लब बाजोरिया हे स्थानिक उमेदवार

 

नसल्याची भावना मतदारांमध्ये आहे. तसेच मागील पाच वर्षांत त्यांचा जनसंपर्क मर्यादित राहिल्याने काही प्रमाणात नाराजी

असल्याचेही या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

संकल्प टुडेशी बोलताना आबा शिंदे यांनी दावा केला की, जर या जागेसाठी पुन्हा विप्लब बाजोरिया यांनाच उमेदवारी दिली गेली,

 

तर महायुतीला ही जागा गमवावी लागू शकते. यावेळी मतदार स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत असल्याचेही

 

त्यांनी सांगितले. त्यामुळे परभणी किंवा हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

परभणी-हिंगोली मतदारसंघातील पक्षीय बलाबल

या मतदारसंघात नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य हे

 

मतदार असतात. मात्र हिंगोली जिल्हा परिषद निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने मतदारसंख्या काही प्रमाणात घटली आहे.

पक्षीय आकडेवारी:

भारतीय जनता पक्ष – ९९

शिवसेना (शिंदे गट) – ७७

राष्ट्रवादी काँग्रेस – १३१

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ४३

काँग्रेस – ५९

वंचित बहुजन आघाडी – १

यशवंत सेना – २७

जनसुराज्य पक्ष – १३

रासप – ५

अपक्ष – ६

पूर्णा शहर आघाडी – २

जनता दल – २

वरील आकडेवारीनुसार ही जागा महायुतीसाठी तुलनेने सोपी मानली जात असली, तरी जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे

 

गटाला मिळते की भारतीय जनता पक्षाला, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button