E-20 पेट्रोलबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण!जाणून घ्या 10 महत्त्वाची उत्तरे
E-20 पेट्रोलबाबत पसरत असलेल्या अफवांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; मायलेज, इंजिन, वॉरंटी, विमा, पाणी, इथेनॉल आणि शेतकऱ्यांच्या फायद्याबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे.

E-20 Petrol
सध्या E-20 पेट्रोलबाबत अनेक चर्चा चालू आहेत. या चर्चांवर केंद्र सरकारने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
E-20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात का, मायलेज कमी होते का, विमा मिळतो का,
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली आहेत. आपण पाहूया सरकारने कोणत्या दहा प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

E-20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात, विमा मिळत नाही, इंजिन लवकर खराब होते,
अशा अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात आहेत. याच प्रश्नांची उत्तरे सरकारने स्पष्ट केली आहेत.
यामध्ये एकूण दहा प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना E-20 पेट्रोलबाबत अनेक शंकांची उत्तरे मिळणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान हा वाद अधिकच वाढला.
कारण ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी केलेल्या एका विधानामुळे ‘E-20’ हे इंधन अजूनही
‘प्रायोगिक’ टप्प्यावर असल्याचे संकेत मिळाले आणि त्यावरून चर्चा सुरू झाली. नंतर त्यांनी स्पष्ट केले की,
त्यांचे ते विधान प्रत्यक्ष इंधनाच्या चाचणीबाबत नसून इथेनॉल पुरवठा यंत्रणेबाबत होते. त्यानंतर,
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यांचे खंडन करणारे सविस्तर स्पष्टीकरण जारी केले.
E-20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होते का?
E-20 पेट्रोल वापरल्यामुळे गाडीचे मायलेज कमी होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की,
हेही वाचा-POK मध्ये वाढला तणाव! भारताकडे मदतीची हाक, JAAC वर पाकिस्तानची बंदी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
हो, काही प्रमाणात गाडीचे मायलेज कमी होऊ शकते. मात्र, हे प्रमाण अत्यल्प असल्याचे सांगण्यात आले आहे.
विविध परीक्षणांवरून असे लक्षात आले की, E-20 पेट्रोल वापरल्यामुळे गाडीचे मायलेज २% ते ६% पर्यंत कमी होऊ शकते.
E-20 पेट्रोल वापरल्यामुळे गाडीचे इंजिन खराब होते का?
सरकारने दिलेले उत्तर असे होते की, मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ARAI, इंडियन ऑइल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम
आणि वाहन उत्पादक कंपन्यांनी संयुक्तपणे केलेल्या चाचण्यांमध्ये इंजिन किंवा धातू व प्लास्टिकच्या भागांचे
हेही वाचा-सावधान! पाकिस्तानी गोरी क्रीमचा मोठा धोका; 18 महिलांना किडनीचे विकार, महाराष्ट्रात विक्रीवर बंदी?
कोणतेही गंभीर नुकसान झाल्याचे आढळून आले नाही. तथापि, काही जुन्या
वाहनांमधील रबरचे विशिष्ट भाग नेहमीपेक्षा लवकर बदलावे लागू शकतात.
E-20 या इंधनाची तपासणी झाली आहे का?
यावर सरकारने उत्तर दिले की, काही युरोपीय देशांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरले जाते.
जपान, ब्राझील, थायलंड, कॅनडा आणि अमेरिका या देशांचा त्यामध्ये समावेश आहे.
या देशांमध्ये या इंधनावर परीक्षण झाले आहे. तसेच भारतामध्येही ARAI (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया)
या भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख ऑटोमोटिव्ह
संशोधन आणि चाचणी संस्थेद्वारे चाचणी घेण्यात आली आहे. ही संस्था
१९६६ मध्ये स्थापन झाली असून पुणे (कोथरूड आणि चाकण) येथे स्थित आहे.
E-20 वापरल्यामुळे गॅरंटी आणि विमा समाप्त होईल का?
E-20 पेट्रोल वापरल्यामुळे जर गाडीचे इंजिन खराब झाले, तर गाडीची गॅरंटी किंवा
विमा पॉलिसीचे पैसे मिळण्याबाबत काही समस्या निर्माण होऊ शकतात का, या प्रश्नाचे
उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, E-20 साठी मान्यताप्राप्त किंवा डिझाइन केलेल्या
वाहनांसाठी कंपनीची वॉरंटी आणि विमा या दोन्ही गोष्टी पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.
E-20 तयार करण्यासाठी जास्त पाणी लागते का?
E-20 पेट्रोलसाठी लागणारे इथेनॉल तयार करण्यासाठी एका लिटरसाठी १०,००० लिटर पाणी लागते,
अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावर उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, या
दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. एवढे पाणी लागत नाही. एक लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी
जास्तीत जास्त दोन ते तीन लिटर पाणी लागते आणि ते पाणीही रिसायकल केले जाऊ शकते.
E-20 पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळला जातो का?
सध्या याविषयीही जोरदार चर्चा सुरू आहे की, E-20 पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचा
रस मिसळला जातो. यावर उत्तर देताना केंद्र सरकारने स्पष्ट केले की, त्यामध्ये थेट उसाचा रस मिसळला जात नाही.
इंधन म्हणून वापरले जाणारे इथेनॉल एका औद्योगिक प्रक्रियेतून तयार
होते आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या मानकांप्रमाणे ते पेट्रोलमध्ये मिसळले जाते.
E-20 पेट्रोलमुळे गाड्याजवळ मधमाश्या आणि मुंग्या येतात का?
अशी अफवा सतत ऐकायला मिळते की, E-20 पेट्रोल वापरल्यामुळे
त्या गाड्याजवळ मधमाश्या तसेच मुंग्या येतात. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा
असल्याचे सरकारने नमूद केले आहे. इंधन-दर्जाच्या इथेनॉलमध्ये साखर नसते
आणि त्यात कीटकांना दूर ठेवणारी रसायने (डिनेचरंट्स) मिसळलेली असतात.
तसेच E-20 मध्ये ८० टक्के पेट्रोल असते आणि त्याचाच वास प्रामुख्याने जाणवतो.
E-20 पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी जमा होते का?
या प्रश्नाचे उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले आहे की, नवीन गाड्यांचे डिझाइन
अशा प्रकारे करण्यात आले आहे की, टाकीमध्ये पाणी जाणार नाही. त्यामुळे टाकीत पाणी जमा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
E-20 पेट्रोलमुळे सरकारचा फायदा काय होतो?
सरकारच्या म्हणण्यानुसार, इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे २०१४-१५ पासून
१.९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली आहे. शेतकऱ्यांना १.६ लाख
कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या
आयातीत लक्षणीय घट झाली आहे आणि कार्बन उत्सर्जनातही उल्लेखनीय घट झाली आहे.
डिसेंबर २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट वेळेच्या आधीच साध्य झाले आहे.
केंद्र सरकारने जनतेच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये E-20 पेट्रोल स्वस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच, यामुळे वाहनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होणार असल्याचे सरकार वारंवार सांगत आहे.







