Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

भारत-पाकिस्तान अणुयुद्ध थांबविल्याचा ट्रम्प यांचा दावा

भारताचा स्पष्ट नकार

Advertisment

भारताने पाकिस्तानवर केलेले ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor Trump Claim)त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक पोस्ट खूप गाजले होते. त्यामध्ये त्यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील युद्धबंदी मीच घडवून आणली.

peration Sindoor Trump Claim

Advertisement

याविषयी नंतर बऱ्याच चर्चा झाल्या. कालही डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अणु युद्ध होणार होते, पण मी ते थांबवले, असा खळबळजनक दावा देखील केला.

Advertisement

 

ऑपरेशन सिंदूर?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला. यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले(Operation Sindoor Trump Claim) आणि पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या आतंकवादी तळांवर थेट हवाई हल्ले केले.

हेही वाचा-भेसळयुक्त दूध घरच्या घरी ओळखण्याचे सोपे उपाय

हे ही वाचा-हातपाय सुन्न होणे: सामान्य कारणे की गंभीर आजार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. निष्पाप लोकांचा बळी गेल्यामुळे भारत चांगलाच आक्रमक झाला होता. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पोस्टद्वारे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील युद्धबंदीची घोषणा केली आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबले. भारताने अशा कुठल्याही युद्धबंदी झाली असल्याचे जाहीर केले नव्हते.

 

जेव्हा जेव्हा आमच्यावर आतंकवादी हल्ला होईल तेव्हा तेव्हा आम्ही चोख उत्तर देऊ, असे भारताने पाकिस्तानला ठणकावले होते. पण वारंवार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हाच दावा करतात की हे युद्ध मीच थांबवले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक दावा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा दावा केला आहे की मी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अणु युद्ध होणार होते ते मी थांबविले. डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी आम्ही भारताच्या विरोधात अणुयुद्ध करणार आहोत,(Operation Sindoor Trump Claim)

 

यामध्ये साडेतीन कोटी लोकांचा बळी जाणार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते, असाही दावा ट्रम्प यांनी केला.

 

शाहबाज शरीफ यांनी अलिकडेच गाझा शांतता परिषदेत ट्म्पचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की ट्रम्पने ३५ दशलक्ष लोकांचे प्राण वाचवले. त्यांनी देशाच्या संसदेत दावा केला होता की शाहबाज शरीफ यांनी त्यांना सांगितले होते की जर त्यांनी हस्तक्षेप केला

 

नसता तर गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ३५ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला असता. ते म्हणाले, “माझ्या पहिल्या १० महिन्यांत मी आठ युद्धे संपवली… पाकिस्तान आणि भारत यांच्यात अणुयुद्ध झाले असते.”

 

अमेरिकन संसदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये बोलताना स्टेट ऑफ द युनियन भाषणाच्या वेळी हा दावा करण्यात आला आहे.

 

भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान असीम मुनीर आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी एका बंकरमध्ये लपल्याच्या बातम्या आल्या होत्या. नंतर झरदारी यांनी कबूल केले की लष्कराने त्यांना बंकरमध्ये लपण्यास सांगितले होते. तथापि, शाहबाज शरीफ यांच्याबाबत ट्रम्पचा दावा नवीन आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा शंभराहून अधिक वेळा केला आहे. आज गुरुवारी (१९ फेब्रुवारी २०२६) काँग्रेसमध्ये भाषण करण्यापूर्वी त्यांनी असेही म्हटले आहे

 

की जर भारत आणि पाकिस्तानने लढाई थांबवली नाही तर त्यांनी गेल्या उन्हाळ्यात २००% कर लादण्याची धमकी दिली होती आणि दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील युद्ध थांबवल्याचा त्यांचा दावा पुन्हा एकदा त्यांनी सांगितला.

भारताने हा दावा वारंवार फेटाळला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर भारताने मात्र अशा कुठल्याही पद्धतीची मध्यस्थी अमेरिकेने केली नव्हती, असे मागेही स्पष्ट सांगितले होते.

 

 

आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतरच ऑपरेशन सिंदूर काही काळासाठी थांबले, पूर्णपणे थांबले नाही, असाही दावा त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला होता. आता याविषयी भारत सरकारकडून काय स्पष्टीकरण येते ते पाहावे लागेल.

 

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार थायलंड-कंबोडिया, इराण-इस्रायल, भारत-पाकिस्तान यांचे युद्ध मीच थांबविल्याचा दावा करतात. नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून ते असे दावे करत आहेत, अशीही चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button