Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

भेसळयुक्त दूध घरच्या घरी ओळखण्याचे सोपे उपाय

भेसळयुक्त दुधाने कहर! ४८ तासांत ४ जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात

Advertisment

भेसळयुक्त दुधाने(Adulterated milk) कहर केला! ४८ तासांत ४ जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात

आजकाल खाण्यापिण्याच्या अनेक वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेश राज्यात समोर आला आहे. भेसळयुक्त दूध(Adulterated milk) पिल्यामुळे अवघ्या ४८ तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जणांवर उपचार सुरू आहेत.

Adulterated milk
भेसळयुक्त दूध ओळखायचे कसे

 

Advertisement

नेमका प्रकार काय घडला?

पूर्व गोदावरी जिल्हा मधील राजमुंद्री परिसरातून ही घटना दिनांक 23 फेब्रुवारी रोजी समोर आली आहे. गेल्या ४८ तासांत किडनी (मूत्रपिंड) निकामी झाल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, इतर १२ जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या सर्व बाधितांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

https://fssai.gov.in/upload/knowledge_hub/1878035b34b558a3b48DART%20Book.pdf

 

तपासात असे आढळून आले की, भेसळयुक्त दूध(  Adulterated milk)पिल्याने गावातील अनेक लोकांची तब्येत अचानक बिघडू लागली. विशेषतः वृद्ध नागरिकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर झाली.

हे ही वाचा-हातपाय सुन्न होणे: सामान्य कारणे की गंभीर आजार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

ही ही वाचा-तिरुपती बालाजी दर्शनासाठी नवीन पर्याय: ₹300 मध्ये मिळणार झटपट दर्शन, जाणून घ्या पूर्ण माहिती

 

दूध विक्रेत्याला अटक या प्रकरणी कोरुकोंडा मंडळातील नरसापुरम गावातील एका दूध विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान त्याचा बेकायदेशीर डेअरी युनिट जप्त करण्यात आला आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या विक्रेत्याकडून दूध घेणाऱ्या १०५ कुटुंबांपैकी ७५ कुटुंबांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

भेसळ युक्त दूध ओळखण्याचे सोपे घरगुती उपाय

दूध हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे दूध शुद्ध आहे की नाही हे घरच्या घरी तपासणे आवश्यक आहे.

✔ रंग आणि वास तपासा

शुद्ध दूध पांढरे आणि हलक्या गोड वासाचे असते. जर दुधाला विचित्र किंवा रासायनिक वास येत असेल, तर ते भेसळयुक्त असू शकते.

✔ थेंब चाचणी करा

स्टीलच्या पृष्ठभागावर दुधाचा थेंब टाका. तो हळूहळू वाहत खाली येऊन पांढरा ठसा ठेवत असेल तर दूध शुद्ध असते. लगेच वाहून गेले तर त्यात पाणी मिसळलेले असू शकते.

✔ उकळण्याची चाचणी

शुद्ध दूध उकळल्यावर जाड मलई तयार होते. मलई कमी तयार होत असेल तर दूध भेसळयुक्त असू शकते.

✔ स्टार्च चाचणी

दुधात आयोडीनचे काही थेंब टाकल्यावर रंग निळा झाला तर त्यात स्टार्च मिसळलेले आहे.

✔ डिटर्जंट तपासणी

दूध हलवून पाहा. जास्त फेस तयार होत असेल तर त्यात डिटर्जंट असण्याची शक्यता आहे.

✔ सुरक्षिततेसाठी काय करावे?

नेहमी विश्वासार्ह विक्रेत्याकडून दूध घ्या आणि शक्यतो पॅकेज्ड दूध वापरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button