Advertisement
आध्यत्म

तिरुपती बालाजी दर्शनासाठी नवीन पर्याय: ₹300 मध्ये मिळणार झटपट दर्शन, जाणून घ्या पूर्ण माहिती

आता 10-15 तास रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

Advertisment

Tirupati Balaji Darshan

तिरुपती बालाजी दर्शनासाठी मोठी खुशखबर! आता 10-15 तास रांगेत उभं राहण्याची गरज नाही

Advertisement

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी(Tirupati Balaji Darshan)  आता भाविकांना 10 ते 15 तास रांगेत उभे राहण्याची किंवा 2 ते 3 महिने आधी ऑनलाइन बुकिंग करण्याची गरज नाही.

Advertisement

 

एक असा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला कमी वेळात सहज दर्शन घेता येईल. मात्र हा पर्याय अनेक भाविकांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया हा पर्याय नेमका कोणता आहे.

 

ऑनलाइन दर्शन बुकिंग पद्धत

TTD (तिरुमला तिरुपती देवस्थानम) मार्फत ऑनलाइन दर्शन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.(Tirupati Balaji Darshan)  साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान पुढील तीन महिन्यांसाठी बुकिंग सुरू होते.

 

बुकिंग सुरू होताच काही मिनिटांतच तिकीटे संपतात, त्यामुळे सकाळी लवकर उठून मोबाईल किंवा लॅपटॉपवरून बुकिंग करावे लागते. अनेक भाविकांना तिकीट मिळत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो.

हे ही वाचा-Income Tax Rule Change 2026: 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, नोकरदारांचा पगार वाढणार

हे ही वाचाभारत-अमेरिका करारावर फडणवीसांचा खुलासा; अमेरिकन कृषी उत्पादनांबाबत अफवा?

 

 

 सर्वदर्शन (Free Darshan) पर्याय

जर ऑनलाइन तिकीट मिळाले नाही, तर भाविकांना तिरुमलामध्ये जाऊन 5 ते 6 तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर सर्वदर्शनासाठी टोकन मिळते आणि पुढे मंदिरात पुन्हा रांगेत उभे राहावे लागते.

 

या प्रक्रियेत दर्शनासाठी 10 ते 15 तास लागू शकतात. अनेक वेळा टोकन मिळत नसल्यामुळे काही भाविकांना कळसाचे दर्शन घेऊनच परतावे लागते.

 

https://ttdevasthanams.ap.gov.in/

 

 ₹300 मध्ये झटपट दर्शन – खास पर्याय

 

तिरुपती तिरुमला देवस्थानमने भाविकांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्ही आंध्र प्रदेश राज्य परिवहन महामंडळ (APSRTC) किंवा तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ (TSRTC) यांच्या बसने तिरुपतीला प्रवास केला, तर तुम्हाला ₹300 मध्ये स्पेशल दर्शन (Special Entry Darshan) मिळते.(Tirupati Balaji Darshan)

 

या पर्यायाचे फायदे:

2-3 महिने आधी बुकिंग करण्याची गरज नाही

5-6 दिवस आधीही तिकीट बुक करता येते

कमी वेळेत दर्शन मिळते

तिकीट बुकिंग कसे कराल?

बस आणि दर्शन तिकीट बुक करण्यासाठी खालील पद्धत वापरा:

www.tsrtconline.in या वेबसाइटला भेट द्या

“Special Entry Darshan” पर्याय निवडा

प्रवासाची माहिती भरा

₹300 शुल्क भरून तिकीट बुक करा

गर्दीच्या काळात हा पर्याय अत्यंत फायदेशीर ठरतो.

आता दुसऱ्याच्या तिकिटावर दर्शन शक्य नाही

पूर्वी काहीजण दुसऱ्याच्या तिकिटावर दर्शन घेत होते. मात्र आता TTD ने (Facial Recognition System )सुरू केले आहे. यामुळे तिकिटावरील व्यक्तीच दर्शन घेऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button