लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी? एकनाथराव शिंदेंची मोठी घोषणा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, योग्य वेळ आल्यावर 2100 रुपये देणार

- #महिला_कल्याण_योजना
- मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण
- LadkiBahinYojana
- EknathShinde
महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ती काय आहे, ते पाहूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. म्हणून जून 2024 मध्ये मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये देखील महिलांसाठी एखादी मोठी योजना असावी, असा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार राज्यातील महिलांना दीड हजार रुपये प्रतिमहा देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या योजनेला नाव देण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
हेही वाचा-दिवसाला किती पाणी प्यावे? वयानुसार पाण्याचे प्रमाण
हेही वाचा-टूथब्रशपासून टॉवेलपर्यंत… रोजच्या वापरातील वस्तू कधी बदलायच्या? आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती
या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली. यामध्ये राज्यातील लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये प्रतिमहा देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी तीन महिन्यांचे पैसे खात्यात टाकण्यात आले.
https://www.facebook.com/share/v/17nKefZCKv/
त्याचा परिणाम हा निवडणुकीवर दिसून आला. महायुतीला राज्यामध्ये मोठे यश मिळाले. या यशामागे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद असल्याचे एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट केले.
या योजनेमुळेच महायुतीला यश मिळाले, तसेच विधानसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये या योजनेचा प्रभाव पाहायला मिळाला. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान करू लागला. मध्यंतरीच्या काळामध्ये या योजनेचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यामधून काही नावे वगळण्यात आली.
याच वेळेला विरोधी पक्षांनी ही योजना लवकरच बंद होणार आहे, असे सांगायला सुरुवात केली. पण ही योजना चालूच राहिली आणि लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये प्रतिमहा येऊ लागले.
लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला 2100 रुपये?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बरीच टीका-टिप्पणी झाली. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीने देखील आम्ही सत्तेत आलो तर आम्ही 2100 रुपये प्रतिमाहा देऊ, असे जाहीर केले. महायुतीने देखील आपण सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, अशी घोषणा केली.
महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना वारंवार पत्रकार परिषदांमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ लागले. विरोधक देखील 2100 रुपये देण्याचे काय झाले? असा प्रश्न विचारू लागले.
काल कोल्हापूरमध्ये झालेल्या एका जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली.
यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ही योजना कधीच बंद होणार नाही, असे स्पष्ट केले. तर दीड हजार ऐवजी 2100 रुपये हे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही देणारच, असा शब्द देखील एकनाथराव शिंदे यांनी दिला.
पण ही घोषणा करत असताना एकनाथराव शिंदे यांनी तारीख मात्र सांगितली नाही. योग्य वेळ आल्यानंतर देऊ, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आणखी काही दिवस तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाट पाहावी लागणार आहे.
तसेच याप्रसंगी बोलताना एकनाथराव शिंदे यांनी अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवत आहे, याबाबत देखील माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार, अशी अफवा देखील विरोधक पसरवत आहेत. पण काही झाले तरी आम्ही ही योजना बंद करणार नाही, असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले.







