बंडू “बॉस”चा “बंड्या” होणार का? पक्षांतरानंतर संजय जाधव यांच्या राजकारणावर मोठे प्रश्नचिन्ह
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केलेल्या खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या निर्णयामुळे परभणीच्या राजकारणात खळबळ; विकास, गद्दारी आणि २०२९ च्या निवडणुकीवर सविस्तर राजकीय विश्लेषण.

बंडू “बॉस”चा “बंड्या” होणार का?
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव अर्थात, बंडू बॉस हे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दोन वेळेस
विधानसभेचे सदस्य आणि आता तिसऱ्यांदा लोकसभेचे सदस्य झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आमदारांची फूट पडल्यानंतर, ” मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहील ”
अशी भीम गर्जना करणाऱ्या बंडु जाधव यांनी अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला
हे ही वाचा-“‘भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरेंची जहरी टीका, फडणवीसांबाबतही मोठा दावा”
जय महाराष्ट्र करीत परभणीच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची परंपरा कायम राखली.
मतदार संघाच्या विकासासाठी विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळत नाही.
ही सबब पुढे करून, बंडु जाधव यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन केले.
2014 ते 19 या कालावधीत बंडु जाधव हे सत्ताधारी पक्षाचे खासदार होते.
या कालावधीमध्ये सत्तेमध्ये राहून बंडु जाधव यांनी मतदार संघासाठी किती निधी मिळविला आणि त्यातून या
मतदारसंघाचा काय विकास साधला हे देखील बंडू जाधव यांनी सांगणे अपेक्षित होते.
तुलनात्मक दृष्ट्या २०१४ ते १९ आणि 2019 ते 2026 या कालावधीत त्यांच्या
हे ही वाचा-1 जुलै 2026 पासून बदलणार हे 7 मोठे नियम.
मतदारसंघासाठी मिळालेल्या निधीचे विवरण बंडु जाधव यांनी शिवसैनिकांसमोर
आणि मतदारांसमोर पुरावा म्हणून जर ठेवले असते तर, त्यावर जनतेचा विश्वास बसला असता.
त्याचबरोबर दोन टर्म आमदारकीच्या आणि तिसरी टर्म खासदारकीची या
कालावधीमध्ये मतदार संघामध्ये झालेल्या विकास कामांचा पाढा बंडू जाधव यांनी वाचायला हवा होता.
मात्र त्यांच्यात ही हिंमत नाही.
कारण विधान परिषदेचे माजी आमदार विप्लब बजोरिया यांनी तसा प्रयत्न केला. मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपये निधी ओतला.
असे जेव्हा विधान केले तेव्हा, या निधीतून झालेला अदृश्य विकास जनतेला दिसत नाही हे सत्य समोर आले.
तोच प्रकार बंडु जाधव यांच्या बाबतीत निश्चित झाला असता.
गेल्या 20-22 वर्षात बोट दाखवावे असे एकही विकासकाम बंडू जाधव यांच्या हातून घडलेले नाही.
उलट पक्षी या जिल्ह्यातून विविध प्रशासकीय कार्यालये इतर जिल्ह्यात स्थलांतरित होत असताना,
बंडु जाधव यांचासह सर्वच लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प होते. जिल्ह्यातील
कॅनॉलचा गाळ काढण्याच्या गुत्तेदारीवरून आपसात भांडत होते.
शेतकऱ्यांना विमा कंपन्या लुबाडत असताना आणि शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे मिळत नसताना,
शेतकरी त्रस्त होता. लोकप्रतिनिधी मात्र आपल्याच मस्तीत मग्न होते.
ताडपांगरी चा वीज निर्मिती प्रकल्प कोणामुळे बंद पडला? या वीज निर्मिती प्रकल्पाच्या
माध्यमातून शेतकऱ्यांच्या एग्रीकल्चर वेस्टला जसे की, तुराट्या, पराठ्या त्याचप्रमाणे
सोयाबीन ची गुळी आणि गव्हाचा भुसा या वेस्टेजला या कंपनीतून दाम मिळत होते.
वीज वितरण कंपनीमध्ये कोणाचे गुत्तेदार लूटमार करत आहेत?
वीज वितरण कंपनीच्या सिस्टम इम्प्रूव्ह मेंट प्रणालीला या नफेखोर
आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारांमुळे कीड लागली आहे.
याचे दुष्परिणाम परभणी जिल्ह्यातील जनतेला भोगावे लागत आहेत.
वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून भ्रष्ट गुत्तेदारांना कोण पाठीशी घालत आहे?
परभणी गंगाखेड हा तालुक्याहून जिल्ह्याला जोडणारा मार्ग कुणामुळे रखडला?
रस्ता विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या लोकप्रतिनिधीं विरुद्ध
इन्कम टॅक्स कारवाई करण्याची धमकी नितिन गडकरी यांना कोणामुळे द्यावी लागली?
या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य मतदारांना बंडू जाधव यांना द्यावी लागतील.
विकास निधीच्या बुरख्याआडून तुम्ही तुमच्या बंडखोरीचे आणि गद्दारीचे समर्थन करत असताना,
या जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही काय कष्ट उपसल?
हे देखील जनतेला सांगावे लागेल.
आतापर्यंत खासदार संजय जाधव यांना लोक आदराने बंडू बॉस म्हणत होते.
मात्र त्यांच्या पक्ष बदलाच्या भूमिकेने सच्चा शिवसैनिक त्याचप्रमाणे शिवसेना
प्रेमी जनता दुःखी आणि कष्टी झाली आहे. त्यांचा विश्वास आणि भावना
दुखावल्या गेल्यामुळे लोक आता बंडू जाधव यांचा “बंड्या”असा उल्लेख करू लागले आहेत.
बंडू जाधव तसे नशीबवानच. 2014 सली मोदी हवेत. म्हणून बंडू जाधव निवडून आले.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जातीय समीकरणातून आणि मतांच्या
ध्रुवीकरणातून ओबीसी आणि मुस्लिम मतांच्या बळावर बंडु जाधव यांना विजय खेचून आणता आला.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा जातीय समीकरण आणि मतांचे
ध्रुवीकरण यातून मराठा आणि मुस्लिम मतांच्या आधारावर बंडू जाधव पुन्हा निवडून आले.
आता बंडु जाधव यांनी पक्षांतर केले असल्याने या जिल्ह्याची गद्दारीची परंपरा त्यांनी कायम राखली असल्याचे बोलले जात आहे.
त्याचबरोबर गद्दारांचे राजकारण संपते. नव्हे,शिवसैनिक आणि मतदार ते संपवतात. ही ही परंपरा या जिल्ह्याची आहे.
हीच परंपरा 2029 च्या निवडणुकीत कायम राहील. असा विश्वास उद्धव ठाकरे
यांचे समर्थक आणि शिवसेना प्रेमी मतदार बोलून दाखवत आहेत.
दुसऱ्या बाजूला 2029 ला पुन्हा बंडू जाधव निवडून येतील! असा विश्वास बंडु जाधव यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
बंडू जाधव यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक कार्यकर्ते जोडले.
राजे संभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांच्याकडे केडर आहे.
वारकरी संप्रदायांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे.
येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांच्या पाठीशी आता महायुतीचे पाठबळ असणार आहे.
म्हणजेच शिंदे सेने सोबतच भाजपाच्या एक गठ्ठा मतांची रसद देखील त्यांच्या गाठीला आहे.
त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे
पहिल्या फळीतील त्याचप्रमाणे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील देखील आक्रमक नेतृत्व नाही.
अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे 2029 च्या निवडणुकीमध्ये केवळ
सहानुभूतीच्या बळावर त्यांचा उमेदवार लोकसभेत पाठवू शकतील का?
हा खरा प्रश्न आहे.
तुलनेत बंडु जाधव यांची बाजू भक्कम दिसत असून 2029 च्या निवडणुकीत,
पुन्हा विजयी होणार असल्याचा बंडू जाधव यांच्या समर्थकांचा विश्वास सार्थ वाटत आहे.
मात्र यात एक गोम आहे. 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी
करत असताना, भाजपाने ” शतप्रतिशत भाजप ” चा नारा दिला आहे.
2029 पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असणारआहे.
शतप्रतिशत भाजप या भूमिकेतून आगामी निवडणूक भाजपाने लढविली तर
बंडु जाधव यांना देखील कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल!
तशा परिस्थितीमध्ये कमळ चिन्हावर निवडणूक लढवून बंडु जाधव लोकसभेत पुन्हा जाण्याची सुतराम शक्यता नाही.
मात्र आगामी सार्वत्रिक निवडणूक, भाजपाने महायुतीतून, घटक पक्षांच्या सहकार्याने
त्यांच्या उमेदवारांना त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढविण्याची मुभा
दिल्यास, बंडु जाधव यांची पुन्हा लोकसभेत जाण्याची शक्यता बळावते.
बंडू जाधव “थप्पी” ला लागणार! हा जो दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून आणि शिवसेना प्रेमी जनतेकडून केला जात आहे.
यावर आम्ही हे राजकीय विश्लेषण केले आहे.
आपणास काय वाटते?
हे जाणून घेणे औत्सुक्याचे आहे.
तेव्हा नक्की व्यक्त व्हा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत नोंदवा.
हे विश्लेषण आवडल्यास आपल्या फेसबुक अकाउंट वर अवश्य शेअर करा. आम्हाला फॉलो नक्की करा.
धन्यवाद,
आबा शिंदे( पत्रकार)
राजकीय सामाजिक विश्लेषक.







