Advertisement
"आबा दाबी"

गद्दार कोण, इमानदार कोण?’ सईद खान यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत नवा राजकीय वाद

राजेश विटेकर आणि रत्नाकर गुट्टे यांच्यावर 'गद्दारी'चा आरोप; सईद खान यांच्या वक्तव्यावरून राजकीय परिपक्वतेवरही उपस्थित झाले प्रश्न.

Advertisment

Parbhani Hingoli MLC Election

कौन गद्दार कौन इमानदार *?

परभणी हिंगोली विधान परिषदेची निवडणूक,(Parbhani Hingoli MLC Election)

Advertisement

 

Advertisement

महायुतीचे उमेदवार सईद खान अर्थात “गब्बर” यांनी 242 मते मिळून जिंकली.

 

या निवडणुकीत महायुतीची 100 च्या वर मते फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीतील घटक पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि गंगाखेड मतदार संघाचे

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी केला आहे.

 

“महायुतीचा धर्म न पाळता युतीसोबत या दोन आमदारांनी गद्दारी केली.” असे जाहीर वक्तव्य आमदार सईद खान यांनी केले आहे.

“भविष्यातील सार्वत्रिक निवडणुकीत या आमदारांना गद्दारीची किंमत मोजावी लागेल”.

असाही इशारा आमदार सईद खान यांनी दिला आहे.

 

या अशा अपरिपक्व ( राजकीय) वक्तव्यामुळे सर्वसामान्यांचे मनोरंजन होत असताना दिसत आहे.

 

मुळात सईद खान यांच्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा जन्मच गद्दारी या अधिष्ठानावर झालेला आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कृतीला बंड असे नाव दिले असले तरी, उद्धव ठाकरे

 

आणि सर्वसामान्य जनता देखील या बंडाला गद्दारी म्हणून संबोधत आहे.

मग गद्दारीच्या अधिष्ठानावर अरुढ झालेल्या नवनिर्वाचित आमदार सईद खान

यांना, गद्दारी बद्दल एवढी चीड आणि संताप का यावा?

असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

 

या गद्दारीबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त करताना सईद खान यांनी 2024 च्या निवडणुकीत कितपत युतीधर्म पाळला?

 

याचेही आत्मपरीक्षण करावे. त्याचबरोबर त्यांच्या भूमिकेबद्दल आमदार विटेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली होती?याचाही अभ्यास करावा.

आमदार राजेश विटेकर हे विधान परिषद आणि विधानसभेचेही सदस्य झालेले आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी स्वबळावर विजयाला गवसणी घातली आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड मतदार संघातून सलग दोन वेळेस निवडून

आलेले आहेत. निवडणूक गणिक त्यांचे मताधिक्य वाढले आहे.

त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी त्यांच्या बळावर दखलपात्र

संख्येने त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळवून दिलेले आहे.

एकूणच दोन्हीही आमदारांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.

तुलनेत नवनिर्वाचित आमदार सईद खान यांना आमदारकी महायुतीच्या मेहेरबानीने प्राप्त झाली आहे.

या विजयासाठी त्यांनी लक्ष्मी अस्त्राचा वारे माप वापर केला हे खरे आहे.

त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी देखील लक्ष्मी अस्त्राचा वापर करण्यात कसूर केली नाही.

मात्र सईद खान यांना युतीमुळेच विजयाला गवसणी घालता आली. हे आमदार सईद खान यांना विसरता येणार नाही.

निवडणुकीचा निकाल लागला आहे. तुम्ही विजयी झाला आहात.

निवडणुकीतील हेवे दावे आता विसरून आपल्या आमदारकीचा परभणी हिंगोली स्थानिक

स्वराज्य मतदार संघासाठी आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी कसा वापर करता येईल?

यावर आमदार सईद खान यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

राजकीय सूड उगवण्यासाठी काय भूमिका घ्यावी? हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे.

मात्र राजकारणामध्ये राजकीय भूमिका प्रत्येक वेळेस जाहीर करावीच लागते, असे नाही.

किंबहुना बऱ्याच वेळा आपले पत्ते योग्यवेळी उघड करणे यालाच परिपक्व राजकारण म्हणतात.

ज्याला हा खेळ जमला त्याला मुरब्बी राजकारणी म्हणतात.

आमदार रत्नाकर गुट्टे आणि आमदार राजेश विटेकर हे आता राजकारणात बऱ्यापैकी मूरले आहेत.

हेही वाचा –बनावट औषधांवर सरकारचा मोठा प्रहार! आता औषधांवर QR कोड अनिवार्य; एका स्कॅनमध्ये मिळणार संपूर्ण माहिती

 

आधी म्हटल्याप्रमाणे रत्नाकर गुट्टे यांनी सलग दोन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमदारकी जिंकली आहे.

 

आमदार राजेश विटेकर यांना राजकीय वारसा आहे. त्यांनी लोकसभा देखील लढविलेली आहे

 

आणि तुल्यबळ लढत दिलेली आहे. विधान परिषदे नंतर ते आता विधानसभेचे सदस्य आहेत.

हे ही वाचा-किडनीचा आजार टाळायचा आहे? डॉक्टरांनी सांगितलेल्या या 3 सवयी आजपासूनच अंगीकारा

तुलनेने आमदार सईद खान यांना राजकीय वारसा नाही.

आधी तत्कालीन खासदार भावना गवळी यांचे बोट धरून ते राजकारणात उतरले.

त्यांच्याच सोबत आर्थिक गुन्हेगारीत आरोपी ठरले. आमदार होऊन जुम्मा जुम्मा आठ दिवस झालेले असताना,

सईद खान यांनी केलेल्या वक्तव्यातुन त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते.

निवडणुकीत कोणी गद्दारी केली? हे जरी “गब्बर”ला कळले असले तरी, त्यावर काय

भूमिका घ्यायची आणि तिची कुठे वाच्यता करायची किंवा करायची नाही.

हे मात्र “गब्बर”ला समजलेले दिसत नाही.

 

आमच्या विचाराशी आपण सहमत आहात का?

 

सईद खान यांनी आमदारांविषयी केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का?

कॉमेंट बॉक्स मध्ये अवश्य व्यक्त व्हा. त्याचप्रमाणे आम्हाला फॉलो करा.

आणि हा ब्लॉग आवडला असल्यास शेअर नक्की करा.

धन्यवाद,

आपला आबा शिंदे

आबा शिंदे हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button