Advertisement
"आबा दाबी"

ऑपरेशन टायगर फसणार? ओमराजे निंबाळकर यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

सहा खासदारांच्या बंडानंतर ओमराजे निंबाळकर यांनी घेतली वेगळी भूमिका; त्यांच्या निर्णयावर पाच खासदारांचे भवितव्य अवलंबून

Advertisment

Operation Tiger Maharashtra

ऑपरेशन टायगर अयशस्वी? ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

 

Advertisement

 

Advertisement

शिवसेनेतील विद्यमान सहा खासदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटामध्ये

विलीन होण्याचा निर्णय घेतला. तशा स्वरूपाचे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिले. या घडामोडी घडत

असताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली व या बैठकीसाठी सर्व

खासदारांना व्हिपदेखील बजावण्यात आली होती.पण या बैठकीला नऊ खासदारांपैकी फक्त तीनच खासदार उपस्थित होते

 

ही व्हिप सहा खासदारांनी धुडकावली असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती मुख्य प्रतोद यांनी

दिली. उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका मानला जात आहे. कारण त्यांच्या

गटाचे नऊ खासदार आहेत व त्यापैकी सहा खासदार पक्ष सोडून गेले अशी चर्चा आहे.

 

बंडखोरी करणाऱ्या खासदारांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी दोन-तृतीयांश खासदार एकत्र असणे आवश्यक असते. नऊपैकी

किमान सहा खासदारांनी हा निर्णय घेणे अपेक्षित होते. याचप्रमाणे सहा खासदारांनी निर्णय घेतला असून त्यामध्ये

संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.

 

ओमराजे निंबाळकर यांचे सूचक वक्तव्य

 

ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची निर्घृण हत्या वीस वर्षांपूर्वी करण्यात आली होती. याच

खटल्याचा निकाल काल लागला. महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह इतरांवर या हत्येचा आरोप

करण्यात आला होता. मात्र, काल लागलेल्या निकालामध्ये माननीय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मी माझ्या मतदारसंघात जाऊन

मतदारांशी चर्चा करूनच दोन दिवसांनंतर माझा राजकीय निर्णय जाहीर करणार आहे.”

 

आज त्यांनी कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणे टाळले. मात्र, एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, “मी माननीय उद्धव ठाकरे

साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही

आणि भविष्यातही त्यांच्या विरोधात कोणताही शब्द काढणार नाही.”

 

या सूचक वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

 

जर ओमराजे निंबाळकर यांनी सहा खासदारांसोबत जाण्यास नकार दिला तर काय होईल?

 

याविषयी आम्ही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की,

जर सहापैकी एखादा जरी खासदार फुटला, तरी उर्वरित पाच खासदारांवर

शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. कारण पक्षाचा व्हिप सर्व सदस्यांना लागू असतो.

पण अद्यापही बंडखोर 6 खासदारांनी कुठल्याही पक्षात अधिकृत

प्रवेश केलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर शिस्तबंगाची कारवाई होणे अवघड आहे असे तज्ञांचे मत आहे

 

जर ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका बदलली, तर उर्वरित पाच खासदारांना अडचणींचा सामना करावा लागू

शकतो. आता ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात यासाठी किमान दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

 

उबाठा गटाचा बडा नेता ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीला?

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उबाठा गटाचा एक बडा नेता ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीस गेला असल्याची चर्चा

आहे. आता संपूर्ण राज्याचे लक्ष ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

 

ओमराजे निंबाळकर जो निर्णय घेतील, त्यावर उर्वरित पाच खासदारांचे

भवितव्य अवलंबून असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button