Advertisement
"आबा दाबी"

अपक्ष उमेदवार सुशील देशमुख ठरणार का गेमचेंजर? 300 मतांच्या दाव्याने रंगली राजकीय चर्चा

महाआघाडीच्या मतांमध्ये फूट, महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि जातीय-सामाजिक समीकरणांवर सुशील देशमुख यांची भिस्त; विजयाच्या दाव्यामुळे निवडणुकीत वाढली उत्सुकता

Advertisment

परभणी विधान परिषद निवडणूक

Sushil Deshmukh Election Analysis

परभणी विधान परिषद निवडणूक मध्ये सध्या रंगत आली आहे. मागील भागात

आपण सईद खान आणि डॉक्टर विवेक नावंदर यांना मिळू शकणाऱ्या मतांची चर्चा केली. 

Advertisement

या भागात आपण अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना मिळू शकणाऱ्या मतांची चर्चा करणार आहोत.

Advertisement

सुशील देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असली तरी, त्यांचे सूचक आणि अनुमोदक काँग्रेसचे नगरसेवक आहेत.

https://www.facebook.com/share/p/19EqmPatL9/

 

याचाच अर्थ सुशील देशमुख हे अपक्ष उमेदवार महाआघाडीच्या विरुद्ध निवडणूक लढवीत आहेत.

आणि त्यांना काँग्रेसचे समर्थन आहे. असा याचा अर्थ लावला जातो.

सर्वसामान्य आणि राजकीय विश्लेषकांना या निवडणुकीत सर्वात मोठा प्रश्न जो सतावतो आहे.

तो म्हणजे सुशील देशमुख यांना मते कुठून मिळणार?

काँग्रेसची मते सुशील देशमुख यांच्या पाठीशी आहेत.

हे आता स्पष्ट झाले आहे. म्हणजेच, महाआघाडीच्या मतात फूट अटळ आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात देखील एकसंघता दिसून येत नाही.

राज्य पातळीवर या दोन पक्षांमध्ये त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेना यांच्यात धुसफुस सुरूच आहे.

 

अर्थात, भाजपा आणि राष्ट्रवादीची मते युतीतून बाहेर काढता येऊ शकतात!

या गृहितकावर सुशील देशमुख आपल्या विजयाचा दावा ठोकत असावेत.

माजी आमदार तथा गेल्या निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांचे सुशील देशमुख हे चिरंजीव आहेत. सुशील देशमुख यांच्या निवडणुकीची सूत्रे पूर्णपणे सुरेश देशमुख यांनी हाती घेतली आहेत.

465 मतांपैकी 300 च्या जवळपास मते आपल्या वाट्याला येतील आणि उर्वरित

मतांमध्ये महाआघाडी व महायुती अशी वाटणी होईल. असा विश्वास सुरेश देशमुख बोलून दाखवत आहेत.

सामाजिक आणि जातीय त्याचप्रमाणे राजकीय कारणावरून मतांचे ध्रुवीकरण अटळ असल्याचा विश्वास सुशील देशमुख बोलून दाखवत आहेत.

या सर्व राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा फायदा केवळ आपल्याला मिळेल.

असा विश्वास सुशील देशमुख बोलून दाखवत आहेत.

हिंगोली मधून देखील मतांमध्ये मोठी फूट होईल. आणि ही फुट आपल्या पथ्यावर पडेल.

असा विश्वास व्यक्त करताना, सुरेश देशमुख हे त्याचे योग्य विश्लेषण करतात.

शिवसेनेचे आमदार आणि आमदार मुटकुळे त्याचप्रमाणे आमदार राजू नवघरे यांच्यात सुंदोप सुंदी आहे.

आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार गजानन घुगे यांचे देखील सुत जमत नाही.

या राजकीय धुसफुशीचा आणि सुंदोप सुंदीचा राजकीय लाभ सुशील देशमुख यांच्या वाट्याला कसा मिळवता येईल यासाठी

सुरेश देशमुख प्रयत्न करत असताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत असल्यामुळेच

सुरेश देशमुख हे सुशील देशमुख यांच्या विजयाबद्दल आश्वस्त आहेत.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लक्ष्मी अस्त्रा सोबतच, जातीच्या आधारावर मतांचे

ध्रुवीकरण हे देखील प्रभावी ठरणार असल्याचे आता सर्वसामान्य लोक देखील बोलू लागले आहेत.

या ध्रुविकरणाचा लाभ सुशील देशमुख यांना नक्कीच होईल. असा विश्वास सर्वसामान्य लोक देखील व्यक्त करू लागले आहेत.

कारण, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने परभणीच्या महापौरपदी अल्पसंख्यांक अर्थात,

मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड, भाजप आणि शिंदेसेना यांनी उठविली होती.

आता महायुतीच्या वतीने शिंदे सेनेचे सईद खान हे उमेदवार असल्यामुळे

महायुतीला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

इतके दिवस, “खान पाहिजे की बाण पाहिजे?” अशी हाळी देऊन मतदारांना भावनिक

साद घालणाऱ्या दोन्ही सेनेने आता मतदारांना काय उत्तर द्यावे?

या घडामोडींमुळे शिवसेना आणि उद्धवसेना त्याचबरोबर भाजपा यांनीही हिंदुत्वाशी

फारकत घेतली असल्याचा आता बोलबाला होऊ लागला आहे.

महायुतीतील मतदारांची या मुद्द्यावर होणारी कुचंबना आणि घुसमट!

याला वाट करून देण्यासाठी, सुशील देशमुख हे योग्य पर्याय असल्याची वातावरण

निर्मिती आतापासूनच करायला सुरुवात झाली आहे.

सुशील देशमुख हे अपक्ष उमेदवार असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत यश आल्यास

निवडणुकीनंतर त्यांच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत. ते महायुतीतील घटक पक्षाचे सभासद होऊ शकतात!

यासोबतच या निवडणुकीत, सर्व ताकदीनिशी आणि सर्व पर्याय हाताळत ही निवडणूक लढवायची.

असा निर्धार सुशील देशमुख आणि सुरेश देशमुख त्याचप्रमाणे त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

अशीही चर्चा समाज माध्यमात जोरात सुरू आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सुशील देशमुख हे या निवडणुकीत एक तगडे उमेदवार म्हणून समोर आले आहेत.

आणि त्यांनी महायुती व महाआघाडीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

सुशील देशमुख यांना या निवडणुकीत 300 मते मिळतील असा दावा सुरेश देशमुख करत आहेत.

आपण सुरेश देशमुख यांच्या मताशी सहमत आहात का?

आपणास काय वाटते, या निवडणुकीत सुशील देशमुख किती मते मिळवतील?

सुशील देशमुख या निवडणुकीत यशाला गवसणी घालतील का?

यावर आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.

हे विश्लेषण आपणास आवडल्यास शेअर नक्की करा.

त्याचप्रमाणे अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा.

पुढील भागात आपण तीनही उमेदवारां समोरील या निवडणुकीतील आव्हाने

आणि त्यांची बलस्थाने यावर विस्तृतपणे स्वतंत्र भागात चर्चा करणार आहोत.

आबा शिंदे

(राजकीय व सामाजिक विश्लेषक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button