जुलैमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद! व्यवहार करण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहाच
जुलै 2026 मध्ये दुसरा-चौथा शनिवार, चार रविवार आणि विविध सणांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. कोणत्या दिवशी, कुठे सुट्टी आहे आणि डिजिटल बँकिंगवर काय परिणाम होईल, जाणून घ्या.

Bank Holidays July 2026
जुलै महिन्यामध्ये(Bank Holidays July 2026) तब्बल बारा दिवस बँका बंद राहणार आहे त्यामुळे बँकेचे कुठले व्यवहार करण्यापूर्वी ही यादी पाहून जा

जुलै महिन्यामध्ये बारा दिवस बँका बंद राहणार आहे नेमके कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहे
व देशातील कुठल्या भागामध्ये किती सुट्ट्या आहेत जुलै २०२६ मधील बँकेची सुट्टी :
जुलै २०२६ मधील रथयात्रा अनेक स्थानिक सुट्ट्या येत आहेत, ज्यामुळे विविध ठिकाणी
बँकेचे कामकाज थांबवले जाईल. याशिवाय, देशभरात दुसऱ्या आणि चौथ्या
शनिवारी आणि रविवारी देखील सुट्ट्या असतील.याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया
हे ही वाचा-जुलैपासून 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद होणार? PIB ने सांगितले संपूर्ण सत्य
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या
शनिवारी बँकांना सुट्टी असते म्हणून त्या दिवशी बँका बंद राहतील त्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत
11 जुलै–दुसरा शनिवार
25 जुलै–चौथा शनिवार
हे ही वाचा-1 जुलै 2026 पासून बदलणार हे 7 मोठे नियम.
चार रविवारी बँका बंद
चार रविवार असल्यामुळे या चारीही रविवारी जुलै महिन्यामध्ये बँका बंद राहतील त्या तारखा खालील प्रमाणे आहे
5 जुलै
12 जुलै
19 जुलै
26 जुलै
जुलै महिन्यातील बाकी सुट्ट्या या दिवशी बँका बंद
५ जुलै – रविवार – देशव्यापी
६ जुलै – एमएचआयपी दिन – आयझॉल
९ जुलै – बेहदिएनखलाम – शिलाँग
११ जुलै – दुसरा शनिवार – देशव्यापी
१२ जुलै – रविवार – देशव्यापी
16 जुलै – रथयात्रा, कांग (रथ यात्रा) आणि हरेला उत्सव – भुवनेश्वर, डेहराडून आणि इंफाळ
१७ जुलै – यू तिरोट सिंग यांची पुण्यतिथी – शिलाँग
18 जुलै – दुक्पा त्शे-जी महोत्सव – गंगटोक
१९ जुलै – रविवार – देशव्यापी
22 जुलै – खारची पूजा – आगरतळा
२५ जुलै – चौथा शनिवार – देशव्यापी
२६ जुलै – रविवार – देशव्यापी
सुट्टी असली तरी डिजिटल बँकिंग थांबणार नाही.
बँकेच्या शाखा बंद असूनही, ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ मिळत राहील.
तुम्ही इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमद्वारे सहजपणे
पैसे हस्तांतरित करू शकता, बिले भरू शकता, शिल्लक तपासू शकता, रोख रक्कम काढू
शकता आणि इतर आवश्यक बँकिंग कामे करू शकता. तथापि, सुट्टीच्या दिवशी चेक
क्लिअरन्स, रोख रक्कम जमा करणे, लॉकरचा वापर आणि इतर शाखा-संबंधित व्यवहार शक्य होणार नाहीत.







