Advertisement
"आबा दाबी"

डॉ. विवेक नावंदर ठरणार ‘किंगमेकर’ की विजयी उमेदवार? निर्णायक मतांचे गणित काय सांगते?

महाआघाडीच्या हक्काच्या मतांपलीकडे अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करण्यात डॉ. नावंदर यशस्वी ठरणार का?

Advertisment

“डॉ. नावंदर निर्णायक मते जुळवतील” ?

परभणी हिंगोली विधान परिषद प्रचारात आघाडी घेतल्याचा दावा सर्वच तीनही उमेदवार करत आहेत.

उमेदवार जो दावा करत आहेत

Advertisement

त्यामागे, कागदावरील मतांचे गणित गृहीत धरले आहे की, त्या बाहेर जाऊन मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताय?

Advertisement
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक

याचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या वाचकांना आणि दर्शकांना साद घातली.

 

सईद खान यांच्याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नाला वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

 

पक्षीय बलाबला व्यतिरिक्त अतिरिक्त मते मिळतील.असा अंदाज बऱ्याच वाचकांनी व्यक्त केला.

हेही वाचा-LPG वापरकर्त्यांनो सावधान! 30 जूनपूर्वी e-KYC पूर्ण करा, अन्यथा गॅस अनुदान बंद होऊ शकते

 

महाआघाडी चे उमेदवार, डॉक्टर विवेक नावंदर हे देखील विजयी होणार असल्याचा दावा करत आहेत.

हे ही वाचा-आईस्क्रीम की फ्रोजन डेझर्ट? चवीच्या मोहात आरोग्याशी खेळ तर करत नाही ना?

 

डॉक्टर नावंदर यांना अपेक्षित असलेली पहिल्या पसंतीची मते याप्रमाणे गृहीत धरली आहेत.

1. परभणी हिंगोली जिल्ह्यातील ऊबाठा. सेनेची मते : 42

2. काँग्रेसची मते. : 59

3. एकूण महायुतीची मते : 102

महायुती एकसंघ राहिल्यास,

 

किमान 102 मते पहिल्या पसंतीची डॉक्टर नावंदर यांना हक्काची मानली जातात.

 

राष्ट्रवादी काँग्रेसची युतीमधील फुसफुस चर्चिली जात आहे. याचा लाभ घेत

डॉक्टर नावंदर राष्ट्रवादीची मते आपल्याकडे वळवू शकतात का?

 

त्याचबरोबर जातीय समीकरण आणि सामाजिक समीकरण यातून मतांची फाटा फूट करून आपल्या पारड्यात डॉक्टर

नावंदर काही मते मिळवून निर्णायक मतांचा आकडा घाटतील काय?

जातीय समीकरण आणि सामाजिक समीकरणातून मतांचे ध्रुवीकरण होणे या निवडणुकीमध्ये अपेक्षित आहे.

https://www.facebook.com/share/p/1M9uro3v35/

मात्र, अशा प्रकारचे ध्रुवीकरण झाल्यास हे ध्रुवीकरण कोणाच्या झोळीत जाईल?

त्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

त्यासोबतच धनलक्ष्मीचा वापर हा देखील घटक तीतकाच महत्वाचा राहणार आहे.

लक्ष्मी अस्त्राचा लाभ फक्त मतदारांनाच नव्हे तर, संबंधित पुढाऱ्यांना देखील होणार असल्याचे बोलले जात आहे.

उमेदवाराला, मतदारांच्या झोळीपेक्षा नेत्यांच्या झोळीमध्ये लक्ष्मीचे झुकते माप रीते करावे लागेल! अशी ही चर्चा

समाजामध्ये आणि समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर डॉक्टर विवेक नावंदर आपल्या सृजनशील आणि सज्जनतेच्या बळावर मतदारांना दान मागत आहेत.

त्यांचे प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत.

लक्ष्मी अस्त्र वापरण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांचा हात जास्त मोकळा असेल अशीही चर्चा रंगत आहे.

अशा परिस्थितीत डॉक्टर नावंदर त्यांच्या स्पर्धकांसमोर किती सशक्त आव्हान उभे करतात?

त्याचप्रमाणे या लढतीमध्ये ते किती ताकतीने उतरतात?

यावर त्यांचे या निवडणुकीतील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

वाचकांना आणि दर्शकांना विनंती आहे. आपण देखील या चर्चेत सहभाग घ्यावा.

चोखंदळ आणि अभ्यासू वाचकांना निवडणुकीचे विश्लेषणाबद्दल आमच्यापेक्षा जास्त

अनुभव आणि त्यांचा अभ्यास आहे. यावर आमचा विश्वास आहे.

या आधीच्या ब्लॉगमध्ये आम्ही सईद खान यांच्या विषयी विश्लेषण सादर केले होते.

त्यावर चोखंदळ आणि अभ्यासू प्रेक्षकांनी अभ्यासपूर्ण टिप्पणी नोंदविली आहे.

त्याबद्दल धन्यवाद.

पुढील भागात अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्या निवडणूक विषयी विश्लेषण आम्ही देणार आहोत.

त्यानंतर तीनही उमेदवारांचे क्रमाक्रमाने

 

त्यांच्या समोरील आव्हाने आणि त्यांची बलस्थाने.

यावर आपण विस्तृत चर्चा याच पेजवर करणार आहोत.

तेव्हा कृपया आपण आमच्या पेजला फॉलो करत राहा.

आमचे विश्लेषण आपणास आवडले असल्यास आपल्या ग्रुप वर नक्की शेअर करावे.

त्याचप्रमाणे आमच्या पेजला फॉलो करावे.

धन्यवाद!

आपला,

आबा शिंदे

(राजकीय आणि सामाजिक विश्लेषक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button