“पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सामान्यांना दिलासा मिळणार!”
कच्च्या तेलाच्या जागतिक दरात मोठी घसरण झाली आहे.
- जीएसटी कपातीनंतर सामान्यांना आणखी एक दिलासा; पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार?
- कच्च्या तेलात दरामध्ये मोठी घसरण
- कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणीची आकडेवारी
- रशियाकडून तेल खरेदी भारतासाठी फायदेशीर
- सर्वसामान्यांना दिलासा मिळेल का?
जीएसटी कपातीनंतर सामान्यांना आणखी एक दिलासा; पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार?
भारतीय नागरिकांना लवकरच आणखी एक दिलासा मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कच्च्या तेलात दरामध्ये मोठी घसरण
सध्या जगभरात युद्धसदृश परिस्थिती आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेतील सरकारी कामकाज ठप्प झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतींवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.
सध्या कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 64 डॉलर इतका असून, हा दर 16 आठवड्यांतील नीचांकी स्तरावर पोहोचला आहे.
भारताने अमेरिकेकडून आयात कमी करून रशियाकडून स्वस्त दरात तेल घेणे सुरू केले आहे, ज्यामुळे देशाच्या खर्चात मोठी बचत होत आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणीची आकडेवारी
7 ऑक्टोबर 2024: $81 प्रति बॅरल
16 जानेवारी 2025: $82 प्रति बॅरल
31 मार्च 2025: $74 प्रति बॅरल
8 एप्रिल 2025: $61 प्रति बॅरल
5 मे 2025: $60 प्रति बॅरल
18 जून 2025: $77 प्रति बॅरल
2 ऑक्टोबर 2025: $64 प्रति बॅरल
रशियाकडून तेल खरेदी भारतासाठी फायदेशीर
अमेरिका-भारत टॅरिफ वादानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे.
सध्या भारत रशियाकडून दररोज 18 लाख बॅरल कच्चं तेल खरेदी करतो, तर अमेरिकेकडून फक्त 3 लाख बॅरल एवढीच खरेदी केली जाते.
रशियन तेल स्वस्त असल्याने भारताला याचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
ओपेकच्या निर्णयाकडे लक्ष
नोव्हेंबरमध्ये ओपेक देशांकडून उत्पादनवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सौदी अरेबिया बाजारातील आपला हिस्सा वाढवण्यासाठी दररोज 5 लाख बॅरल उत्पादनवाढीवर विचार करत आहे.
या निर्णयाचा जागतिक तेलदरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे हि वाचा-भारतातील दहा “असुरक्षित शहरांची” यादी,महाराष्ट्रतिल किती शहरांचा समावेश?
हे हि वाचा-२ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका – सरकारचा इशारा
खाजगी कंपन्यांचा नफा
सरकारी कंपन्यांसोबतच खाजगी कंपन्यांनाही या घसरत्या दरांचा फायदा झाला आहे.
उदा., रिलायन्स कंपनीने आपली कच्च्या तेलाची आयात वाढवून 9.7 लाख बॅरल प्रतिदिन इतकी केली आहे. यातील सुमारे 60% तेल रशियाकडून आयात केले जाते.
या तेलावर प्रक्रिया करून इतर देशांना विक्री केल्याने खाजगी क्षेत्रालाही मोठा फायदा होत आहे.
GST कपात”22 सप्टेंबर पासून : जाणून घ्या कोणत्या वस्तू होणार स्वस्त
सर्वसामान्यांना दिलासा मिळेल का?
आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले असले तरी भारतात इंधनदरात फारसा फरक दिसला नाही.
5 मे 2025 रोजी कच्चं तेल $60 प्रति बॅरल असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच राहिले.
मात्र, आता केंद्र सरकारकडून थोड्याफार दरकपातीची अपेक्षा आहे.
जर केंद्राने करात थोडी सूट दिली, तर सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.







